आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • NSA Level Meeting; Delhi News | Which Countries Attending After China Pakistan To Skip Meet On Afghanistan

एक्सप्लेनर:7 देशांची NSA दिल्लीत अफगाणिस्तानवर चर्चा करणार, बैठकीला पाकिस्तान-चीनने येण्यास का नकार दिला?

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

10 आणि 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 7 देशांच्या 'NSAs' ची बैठक होणार आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताने ही बैठक बोलावली आहे. मात्र, पाकिस्तानने या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. तालिबानने तीन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. सत्तापरिवर्तनानंतर भारत अफगाणिस्तानात मुत्सद्दी दृष्ट्या कमकुवत झाला आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भारत ही बैठक का घेत आहे? या बैठकीत कोणते देश सहभागी होतील? काय असेल बैठकीचा अजेंडा? जाणून घेऊया…

भारत ही बैठक का घेत आहे?
अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीनंतर, अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या सुरक्षेशी संबंधित चिंतेमुळे भारताने ही बैठक घेतली आहे. या बैठकीत सर्व प्रादेशिक भागधारक आणि महत्त्वाच्या अधिका-यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत अफगाणिस्तानची सद्यस्थिती आणि भविष्यावर चर्चा होणार आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय या इन पर्सन बैठकीचे आयोजन करत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण अफगाणिस्तानच्या सर्व शेजारी देशांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान तसेच रशिया आणि चीन यांचा समावेश आहे.

पाकिस्तान या परिषदेत सहभागी होणार आहे का?
नाही. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले होते की ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. अफगाणिस्तानमध्ये भारताची नकारात्मक भूमिका असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. याला विरोध करत ते या बैठकीला येणार नाहीत. पत्रकार परिषदेत युसूफ म्हणाले होते की, मी सहभागी होणार नाहीये. कारण गोष्टी बिघडवणारा कधीही शांतीदूत बनू शकत नाही. या भागातील समस्या सर्वांसमोर आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यास ती मोठी बाजारपेठ बनू शकते, असे युसूफ म्हणाले होते.

पाकिस्तानच्या नकारावर भारताची भूमिका काय आहे?

सरकारच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने नकार दिल्याने त्यांची अफगाणिस्तानबद्दलची मानसिकता दिसून येते. जिथे, त्याने विनाशकारी भूमिका निभावली आहे. पाकिस्तानने याआधी अशा बैठकीत कधीच भाग घेतला नव्हता.

पाकिस्तान सोडून इतर देश या बैठकीला उपस्थित राहतील का?
मध्य आशियातील पाच देशांनी तसेच रशिया आणि इराणनेही या बैठकीत सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मध्य आशियातील सर्व देश या फॉर्मेटमध्ये सामील होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 7 देशांनी या बैठकीत सहभागी होण्याचे मान्य केले आहे. यामध्ये इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.

चीनलाही बोलावले होते, चीनही सहभागी होणार नाही का?

सोमवारपूर्वी पर्यंत चीन सगभागी होण्याची शक्यता होती. मात्र सोमवारी चीनने या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली. त्याच्या प्रत्युत्तरात चीनने सांगितले की, शेड्युलिंगच्या समस्यांमुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. पण सूत्रांचे म्हणणे आहे की चीनने भारताला द्विपक्षीय चॅनलद्वारे या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

काय असेल या बैठकीचा अजेंडा?
वृत्तानुसार, या NSA बैठकीत सीमेपलीकडील दहशतवाद, दहशतवादी गटांच्या उपस्थितीशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाईल. यासोबतच अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे वाढते अतिरेकी धोके यावरही चर्चा होणार आहे.

तालिबान सत्तेवर आल्यानंतर सुरक्षा आव्हाने हा या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा असेल. अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारची स्थापना आणि मान्यता यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. गेल्या 20 वर्षांत भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक विकास कामे केली आहेत. मध्य आशिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील कनेक्टिव्हिटी प्रकल्पातही भारताची मोठी भूमिका आहे.

इराणमधील चाबहार पोर्ट प्रोजेक्ट असो किंवा तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट असो, या सर्वांमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यावरील ब्रेकवरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर या प्रोजेक्टचे भवितव्य ठरवले जाऊ शकते.

यापूर्वीही या फॉर्मेटवर बैठका झाल्या आहेत, त्यांचे काय झाले?

यापूर्वी इराणमध्ये या फॉर्मेटवर दोन बैठका झाल्या आहेत. सप्टेंबर 2018 आणि डिसेंबर 2019 मध्ये या बैठका झाल्या. तिसरी बैठक भारतात होणार होती जी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...