आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Mantra Of The Founder Of Snapdeal काय What Will Happen, Will Fail; Believe That You Can Do Something About It

युनिकॉर्न ड्रीम्स:स्नॅपडीलच्या संस्थापकाचा मंत्र-काय होईल, अयशस्वी होताल; त्यातही काहीतरी करून दाखवाल, असा विश्वास ठेवा

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार्टअप, Google मध्ये प्रविष्ट करताच सुमारे 3,01,00,00,000 परिणाम (0.61 सेकंद) समोर आले . तुम्ही आणखी एकदा हा शब्द एंटर केल्यास, या पेक्षा कमी सेकंदात यापेक्षा जास्त पर्याय तुमच्या समोर येतील. हा शब्द आहेच असा... त्या बद्दल सर्वांना माहित आहे, तरीही जाणून घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही स्टार्टअप सुरू केले तर युनिकॉर्न बनण्याचे स्वप्न, म्हणजेच 1 बिलियन डॉलर पेक्षा जास्त किमतीची कंपनी बनण्याची इच्छा तर आहेच.

हे एक अतिशय मेहनतीने पूर्ण होणारे स्वप्न आहे. या स्वप्नांमध्ये आमचा वाटा सत्य माहिती देण्याचा आहे. म्हणून आम्ही 'युनिकॉर्न ड्रीम्स विथ कुशान अग्रवाल' ही नवी मालिका सुरू करत आहोत. आणि याची सुरुवात करुयात रोहित बन्सल यांच्या पासून. तेच रोहित स्नॅपडीलवाले. गोष्टी कंपनीची तर आहेच, पण त्याआधी ज्या मुळे कंपनी तयार झाली, वाढली आणि यशस्वी झाली त्या गोष्टींची चर्चा करुयात. तर करायची सुरुवात?…

कुशान: तुम्ही जेव्हा दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरममध्ये कुणालसोबत शिकत होता, तेव्हा तुम्ही स्नॅपडील बनवण्याचा विचार केला होता का?

रोहित बन्सल: मी पंजाबमध्ये लहानाचा मोठा झालो. अकरावीत दिल्लीला आले. कुणालशी मैत्री झाली आणि हळूहळू आमची मैत्री घट्ट होत गेली. नंतर एकत्र काम करायचं असं आम्ही ठरवलं होतं, पण कधी आणि कोणतं काम करायचं ते कळत नव्हतं.

कुशान: तुम्ही आयआयटी दिल्लीत शिकलात आणि कुणाल पेनसिल्व्हेनियाच्या बिझनेस स्कूलमध्ये शिकले. वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्याही सुरू होत्या. एकत्र व्यवसाय करण्याची कल्पना कशी सुचली?

रोहित बन्सल : आम्हाला पहिल्यापासून एकत्र काम करायचे होते. कुणाल अमेरिकेला गेल्यावरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. ईमेलद्वारे बोलायचे. तो भारतात आला की आम्ही भेटायचो. त्यानंतर दोघांनीही अभ्यास पूर्ण केला आणि आम्ही कामाला लागलो.

तब्बल ६ महिन्यांनंतर कुणाल त्याच्या भावाच्या लग्नासाठी भारतात आला. आम्ही दोघे भेटलो. कुणालने मला विचारले की आपल्याला एकत्र व्यवसाय करायचा आहे, मग तुझा काय प्लान आहे, कधी सुरू करायचा.

मी म्हणालो कि आता मला 2-3 वर्षे नोकरी करायची आहे, मग अमेरिकेला जाऊन MBA करायचा बेत आहे. त्यानंतर व्यवसायाचा विचार करु. तेव्हा कुणाल म्हणाला की, जेव्हा स्वत:चं काम सुरू करायचच आहे, तर मग 7-7 वर्षांचा वेळ वाया का घालवायचा.

आम्ही दोघे वास्तविक बरेच लहान होतो, आमचा खर्चही कमी होता, दोघांचेही लग्न झालेले नव्हते आणि कसलेही आर्थिक दडपण नव्हते. म्हणून ठरवलं चला सुरुवात करूया.

त्यानंतर आपण काय करू शकतो याच्या काही कल्पनांचा विचार करू लागलो. गंमत म्हणजे आजची कंपनी स्नॅपडील हा आमचा पहिला व्यवसाय नव्हता. वर्ष 2008 मध्ये, आम्ही एका अमेरिकन कंपनीकडून प्रेरित होत मुद्रित कूपन बुकलेट विकायला सुरुवात केली. त्यावर आम्ही एक वर्ष काम केले. आम्हाला ते यशस्वी होईल अशी अपेक्षा होती, पण लाँच झाल्यानंतर लगेचच आम्हाला समजले की, कोणीही कूपन खरेदी करू इच्छित नाही.

त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत राहिलो आणि 3-4 वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये Srapdeal ची कल्पना समोर आली.

कुशान: तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात मोठी भीती कोणती होती? पैशाची काळजी होती का?

रोहित बन्सल: आम्ही दोघेही कॉलेजमध्ये चांगले शिकलो आणि चांगली नोकरी करत होतो. त्यामुळे माझा स्वतःवर विश्वास होता. सर्वात वाईट परिस्थितीत, जर तीन-चार वर्षे काहीच झाले नाही आणि व्यवसाय अपयशी ठरला. तरीही आपण आपल्या शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर काहीतरी करू शकू, असा विश्वास होता.

कुशान: एक सामान्य माणूस त्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे व्यवसायात रूपांतर कसे करू शकतो?

रोहित बन्सल: मला वाटते की व्यवसाय सुरू करणे अवघड नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करणे. त्याशिवाय काहीही साध्य करणे शक्य नाही. एकदा का तुम्ही एखादे काम सुरू केले आणि त्यात तुमचे 100% योगदान दिले की, मार्ग स्वतःच समोर येतो. त्यामुळे सुरू करण्यास फार वेळ लागू नका. जर तुम्ही जास्त विचार केलात तर तुम्ही काहीही करू शकणार नाही.

कुशान: नवीन व्यवसायाच्या सुरुवातीला निधी मिळणे कठीण आहे. तुम्ही गुंतवणूकदारांचा विश्वास कसा मिळवला?

रोहित बन्सल: आम्हाला मिळालेला पहिला गुंतवणूकदार कुणालचा वरिष्ठ होता, जो मायक्रोसॉफ्टमध्ये काम करते होता. तो कधीच भारतात आला नव्हता. आम्ही कधीही कल्पनाही केली नव्हती की कोणीतरी आम्हाला इतके पैसे देईल, ज्याच्याकडे आधीपासूनच कोणताही व्यवसायचा अनुभव नाही. तरी त्यांनी आम्हाला 40 लाख रुपयांचा निधी दिला.

कुशान: स्नॅपडीलचा प्रवास दोन टप्प्यात दिसतो. एक 2017 पूर्वीची स्नॅपडील आणि दुसरी 2017 नंतरची स्नॅपडील. 2017 नंतर Snapdeal मध्ये काय बदल झाले आहेत? तुमचे सध्याचे लक्ष कोणते? आणि आगामी काळात तुमच्या योजना कोणत्या आहेत?

रोहित बन्सल: 2017 नंतर, आम्ही व्हॅल्यू आणि लाइफस्टाइलवर लक्ष केंद्रित केले. कपड्यांपासून ते घरातील स्वयंपाकघर, सौंदर्य प्रसादने आणि वैयक्तिक काळजी घेणाऱ्या उत्पादनांपर्यंत. जर आपण भारताबद्दल बोललो तर ही सर्व उत्पादने स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यांची खरेदी मॉल्समध्ये कमी होते.

या श्रेणीतील मागणी जास्त आहे, बाजारपेठ मोठी आहे, परंतु गुणवत्तेचा मुद्दा आहे. या बजेटच्या श्रेणीमध्ये ब्रँडची कमतरता आहे. आतापासून ग्राहक हळूहळू ऑनलाइन स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांवर आमचे लक्ष्य आहे.

कुशान: कोणत्याही क्षेत्रातील मोठ्या उद्योगपतींसमोर लहान खेळाडूंनी कसे टिकून राहावे?

रोहित बन्सल: हे पाहा, भारतातील बाजारपेठ खूप मोठी आहे आणि संपूर्ण मार्केट शेअर एकाच कंपनीकडे आहे असे नाही. मला वाटते की तुमची कंपनी इतर कंपन्यांपेक्षा स्वतःला कशी वेगळी करते आणि स्वतःला अद्वितीय बनवते ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ग्राहकांना अशी कोणती गोष्ट ऑफर करता जी इतर कंपन्या देत नाहीत?

जर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आणि सतत त्यावर लक्ष केंद्रित ठेवले तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल आणि स्पर्धेची भीती राहणार नाही.

कुशान: स्नॅपडीलच्या आतापर्यंतच्या प्रवासात कधी अशी वेळ आली आहे का, की वाटत होतं, आता खूप झालं. त्या कठीण काळात तुम्ही स्वतःला कसे हाताळले?

रोहित बन्सल : हो असं अनेकदा झालंय. अनेक वेळा चढ-उतार आले आहेत, पण पाहिले तर बहुतांश व्यवसाय अडचणीतून जातात. अडचणी येत राहतील. त्यांना धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. यामध्ये माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली त्यांनी प्रत्येक पावलावर मला साथ दिली.

कुशान: आता थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. आपण व्यवसायाविषयी बोलत नसता, तेव्हा आपण काय करता? आपले छंद कोणते आहेत?

रोहित बन्सल : मला तीन छंद आहेत. प्रथम, आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत वेळ घालवणे. माझे कुटुंब मला दररोज प्रेरणा देते. दुसरे, मला आरोग्यामध्येही रस आहे. मी नियमित व्यायाम करतो. मला आरोग्याशी संबंधित पुस्तके वाचायला आवडतात. तिसरा छंद म्हणजे प्रवास करणे. मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःला शोधायला आवडते.

कुशान: व्यवसायाच्या जगात भारतामध्ये किती नाविन्यपूर्ण काम केले जात आहे, ते अमेरिका, युरोप आणि चीनच्या पुढे आहे की मागे?

रोहित बन्सल : 10-15 वर्षांपूर्वी प्रकरण नक्कीच वेगळे होते, पण आता भारतही या देशांमध्ये मागे नाही. मग बहुतेक व्यवसाय इतर देशांच्या कल्पनांनी प्रेरित होते, आता तसे नाही. असे अनेक व्यवसाय सुरू केले जात आहेत, जे केवळ भारतीय बाजारपेठेसाठी आहेत. दुसरे म्हणजे, असे अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यांची उत्पादने भारताबाहेर म्हणजेच जागतिक स्तरावरही वापरली जात आहेत.

कुशान: भारतात स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत. तरुण संस्थापक मोठ्या संख्येने येत आहेत. तरुणांना काय सल्ला द्याल?

रोहित बन्सल: भारतासाठी मोठी गोष्ट म्हणजे स्टार्टअप प्रणाली वाढत आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. अलीकडेच मी आयआयटी दिल्लीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रोफेसरने मला सांगितले की जेव्हा त्यांनी ग्रॅज्युएशननंतर विद्यार्थ्यांना काय करायचे आहे याचे सर्वेक्षण केले तेव्हा बहुतेक तरुणांची पहिली पसंती उद्योजक बनणे ही होती.

या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे हे जाणून मला आनंद झाला. मी अशा तरुणांना सल्ला देईन की त्यांनी कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घाबरू नका की ते यशस्वी होतील की नाही. सर्व यशस्वी उद्योगपती देखील माणसेच असतात.

बातम्या आणखी आहेत...