आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्पेलनर:ज्या गोल्ड मेडलसाठी ऑलिम्पिकमध्ये जगभरातील खेळाडू एकत्र जमले आहेत, ते खरंच सोन्याचे आहे का? जाणून घ्या टोकियो ऑलिम्पिकमधील मेडल्सविषयी सर्व काही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर...

टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी खूप खास असणार आहे. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले आहे. 49 किलोग्राम महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले असून यासह भारत ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदकाच्या बाबतीत आपले खाते उघडण्यात यशस्वी झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. भारताकडे आणखी मेडल्स येण्याची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकतील अशीही आशा आहे.

चानूसह जेव्हा इतर खेळाडू आपल्या गळ्यात ऑलिम्पिक मेडल घालतील, तेव्हा त्याची किंमत काय आहे असे कोणी विचारणार नाही? कारण ते मेडल मौल्यवान आहे. हे त्यांच्या त्याग, समर्पण आणि परिश्रमाचे फळ आहे, ज्याची किंमत कुणीही लावू शकत नाही.

दर चार वर्षांनी होणा-या खेळाच्या या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू कठोर परिश्रम घेत असतो. पण ऑलिम्पिक गोल्ड मेडलमध्ये किती सोने असते, हा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडत असावा. ऑलिम्पिकचे गोल्ड किंवा इतर मेडल्स कसे बनवले जातात? हे तुम्हाला ठाऊक आहे का...

ऑलिम्पिक सुवर्ण पदक संपूर्ण सोन्याचे आहे का?

  • नाही. परंतु तरीदेखील ऑलिम्पिक गोल्ड ही जगातील सर्वात मोठी क्रीडा उपलब्धी आहे. त्यासमोर इतर कोणत्याही खेळाच्या विश्व विजेतेपदाची पदवी कमीच भासते. पण हे सुवर्ण पदक शुद्ध सोन्याचे बनलेले नाही. हे पदक चांदीचे असते, ज्यावर केवळ सोन्याचा मुलामा दिला असतो. 1912 च्या स्टॉकहोम गेम्समध्ये अखेरची शुद्ध सुवर्ण पदके देण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ने ठरवलेल्या नियमांच्या आधारे पदके तयार केली जात आहेत.

तर ऑलिम्पिक मेडल्स कसे बनवले जातात?

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ने नियमात म्हटले आहे की, सुवर्ण पदकात किमान 6 ग्रॅम सोने असले पाहिजे. उर्वरित भाग चांदीचा बनलेला असतो. आयओसीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, ऑलिम्पिक मेडल्सचे व्यास (डायमीटर) 60 मिमी आणि जाडी 3 मिमी असणे आवश्यक आहे.
  • यासह आयओसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदकाच्या एका बाजूला विजयाचे ग्रीक देव नाइकीचे चित्र असले पाहिजे. 1896 मध्ये पहिल्यांदा जिथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्या पनाथिनाईकोस स्टेडियमची झलकही त्यात असायला हवी. तसेच एका बाजूला खेळाचा अधिकृत लोगो (एकमेकांत गुंतलेली पाच वर्तुळे, ही पाच वर्तुळे संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करतात) आणि नाव असावे, म्हणजे XXXII ऑलिम्पियाड टोकियो 2020 असे लिहिलेले असावे.

टोकियो ऑलिम्पिकमधील मेडल्स विशेष का आहेत?

  • जपान त्यांच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांनी मेडल्सवरही आपली क्षमता दर्शविली आहे. जुने इलेक्ट्रॉनिक गॅझेट रिसाइकल करुन त्यामधून काही खास पदार्थ काढले गेले आहेत. त्याचा वापर मेडल्समध्ये करण्यात आला आहे. हे जपानच्या पर्यावरणपूरक असण्याची वचनबद्धता दर्शवते. ऑलिम्पिक मेडल्स बनवण्यासाठी जपानमधील सामान्य लोकांनी आपले गॅझेट दान केले आहेत. यामुळे ते खेळाशी जोडले गेले आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमधील पदकांची रचना कशी गेली आहे?

  • आयोजकांनी जास्तीत जास्त जपानी लोकांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात 400 प्रवेशिका आला होत्या. टोकियो 2020 च्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हे मेडल रफ स्टोनसारखे दिसत आहे, परंतु ते पॉलिश केले गेले आहेत आणि ते चमकत आहेत. 'लाईट' आणि 'ब्रिलियन्स' ही जपान गेम्सची एकंदरीत थीम आहे. हे मेडल्स प्रकाशात चांगल्या प्रकारे रिफ्लेक्ट होताता, जे अॅथलीट्सची ऊर्जा प्रतिबिंबित करतात.

टोकियो ऑलिम्पिक पदकांच्या रिबनने काय महत्त्व आहे?

  • जपानच्या पारंपरिक संस्कृतीला पदकांसह वापरल्या जाणा-या रिबनवर हायलाइट केले गेले आहे. हे पारंपरिक डिझाइन आहे. रिबनला जपानचे प्रतिबिंब म्हणून डिझाइन केले गेले आहे आणि सोबतच विविधतेमध्ये एकता दर्शविली गेली आहे. टोकिया 2020 चे ब्रँड व्हिजन इनोव्हेशन फ्रॉम हार्मनी देखील या डिझाइनमध्ये प्रतिबिंबित होते.
  • सिलिकॉन कॉन्वेन्स रेषा रिबनच्या पृष्ठभागावर वापरली गेली आहेत, जेणेकरून केवळ स्पर्शाने पदक सोने, चांदी किंवा कांस्यचे आहे का ते ओळखता येईल. रासायनिक प्रक्रियेचा वापर करून पॉलिस्टर फायबरला रिसाइकल गेले गेले आणि त्याचा वापर येथे केला गेला.
बातम्या आणखी आहेत...