आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Tokyo Olympics 2021 Updates, Neeraj Chopra Wins Athletics Gold; Neeraj Chopra Interview Divya Marathi

एक्सक्लूझिव्ह मुलाखत:ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने केला फायनलच्या व्यूहरचनेचा खुलासा, कोचने दिला होता कानमंत्र- पहिला थ्रो बेस्ट कर!

राजकिशोर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या 121 वर्षांच्या फील्ड अँड ट्रॅक इव्हेंट इतिहासात नीरज चोप्राने भालाफेकमध्ये प्रथमच गोल्ड मेडल मिळवून देशाचे नावलौकिक केले. टोकियो ऑलिम्पिक आटोपल्यानंतर टीम इंडियासह नीरज सुद्धा भारताच्या दिशेने निघाले आहेत. तत्पूर्वी भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्या आपले संपूर्ण लक्ष केवळ खेळ आणि नवीन रेकॉर्ड बनवण्याकडे असल्याचे नीरज चोप्राने सांगितले आहे. प्रश्नोत्तरांमध्ये नीरजने भास्करशी बातचीत करताना अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे.

लोक म्हणतात की तुझ्यावर बायोपिक बनवायला हवी आणि यात तूच भूमिका साकारावी, याबद्दल काय वाटते?
माझे करिअर आता सुरू आहे. त्यामुळे, मला वाटत नाही की यावर बायोपिक वगैरे बनवण्यात यावे. जेव्हा रिटायर होईल तेव्हा बनवता येईल. जेणेकरून मला सध्या फक्त खेळावर फोकस करता येईल. रिटायरमेंटनंतर बायोपिक झाल्यास त्यात आणखी नाविन्य मिळू शकेल.

फायनल सुरू असताना डोक्यात काय सुरू होते? गोल्ड मिळणारच याची खात्री कधी पटली?
फायनल सुरू असताना माझ्या डोक्यात फक्त बेस्ट करणे हेच सुरू होते. आमचा गेम खूप टेक्निकल आहे. यात थोडीही गडबड झाल्यास खूप फरक पडता. मी माझाच नॅशनल रेकॉर्ड मोडला आहे. पण, ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवणे याची अनुभूतीच वेगळी होती. सर्व स्पर्धकांनी शेवटचे थ्रो केले, तेव्हा मला खात्री झाली की आपल्याला गोल्ड नक्की मिळणार आहे.

फायनलसाठी कोच कोच डॉ. क्लॉस बार्टोनिएत्स यांनी काय म्हटले होते? फायनलपूर्वी कुटुंबियांशी किंवा कुणाशी बोलणे झाले होते का?
कोच क्लॉस यांनी सांगितले होते की पहिलाच थ्रो बेस्ट कर! क्वालिफाइंग राउंडमध्ये असेच केले होते. फायनलच्या वेळी माझी जास्त कुणाशीही बातचीत झालेली नाही. केवळ माझे छोटे काका आणि त्यानंतर सीनिअर जयवीर यांच्याशी बोललो होतो. सर्वांनाच माझ्यावर विश्वास होता की मी नक्कीच चांगले करेन. अशात मलाही वाटले होते की काही चांगले घडणार आहे.

आता गोल्डनंतर पुढचे लक्ष्य काय?
सध्या तरी गोल्ड मिळाल्याचा आनंद मी माझ्या कुटुंबासोबत सेलिब्रेट करू इच्छितो. यावर्षी काही इव्हेंट असल्यास आणि त्यासाठी माझा सराव चांगला राहिला तरच सहभाग घेईल. अन्यथा पूर्ण फोकस आगामी कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीवर करणार आहे.

ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिल्खा सिंग यांना समर्पित करणार असा विचार नेमका का आला, काही विशेष कारण?
मी मिल्खा सिंग यांचे व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामध्ये ते बोलतात की आपल्या देशातून कुणी तरी ऑलिम्पिकमध्ये जावे आणि ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी मेडल आणावे. ते बोलत होते, की कुणी तरी पोडिअम फिनिश करावे आणि राष्ट्रगीत ऐकायला यावे. आता मिल्खा सिंग आपल्यात नाहीत. त्यांची इच्छा होती की देशासाठी कुणी तरी मेडल जिंकावे. त्यामुळे, मी जिंकल्यानंतर हे मेडल त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. जे सीनियर खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पोहोचले परंतु, मेडल मिळवू शकले नाहीत. देशातील कुणी तरी मेडल जिंकावे अशी ज्यांची इच्छा होती त्या सर्वांना माझे हे गोल्ड मेडल समर्पित करतो.

तुझी ट्रेनिंग परदेशी गुरुंकडून झाली, त्या सर्व कोचचे तुझ्या परफॉर्मन्समध्ये किती वाटा राहिला आहे?
माझ्या परफॉर्मन्समध्ये सर्व परदेशी गुरुंचा खूप महत्वाचा वाटा राहिलेला आहे. सर्वांनी टेक्निक आणि वैशिष्ट्ये शिकवली. सर्वांनीच मला काही नवीन शिकण्याची संधी दिली. 2019 पासून मी क्लॉस बार्टोनिएत्स यांच्यासोबत प्रशिक्षण घेत आहे. त्यांची टेकनीक खूप वेगळी आहे. त्यांनी माझ्याकडून खूप मेहनत घेतली. त्यामुळेच, मी गोल्ड मिळवू शकलो.

तत्पूर्वी 2018 मध्ये मी कोच हॉन यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. त्यांची टेकनीक पण वेगळी होती. त्यांनी माझ्या स्ट्रेंथवर काम केले. 2016 मध्ये गॅरी कालवर्ट यांनी ट्रेनिंग दिली होती. या सर्व परदेशी कोचकडून मला नव-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या सर्वच गुरूंचे आभार व्यक्त करतो.

मेडल मिळाले तेव्हा तिरंगा फडकला आणि राष्ट्रगीत वाजत होते, त्यावेळी कसे वाटले?
पोडियममध्ये उभे राहून गळ्यात मेडल स्वीकारण्याचा अनुभव वेगळाच होता. राष्ट्रगीत वाजले आणि भारताचा झेंडा वर जात होता तेव्हा वाटले की आम्ही जी मेहनत घेतली ती यशस्वी झाली. आम्ही जो त्रास सहन करून घेतला तो आता कमी वाटत होता.

आईंनी संदेश दिला होता की घरात तुझ्यासाठी चूरमा बनवलेला आहे? भारतात परतल्यानंतर काय प्लान आहे?
भारतात जाताच आधी घरी जाणार, कुटुंबाला वेळ देणार आणि घरचे जेवण करणार आहे.

मेडलनंतर सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले का?
फायनलमध्ये गोल्ड मिळाल्यानंतर माझ्या फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. ज्यांनी मला फायनलमध्ये पाहिले ते आता मला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...