आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 ने डेन्मार्कला आपल्या कचाट्यात घेतले आहे. अलीकडील संशोधनात, डॅनिश शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की, BA.2 ओमायक्रॉनचा पहिला सब व्हेरिएंट BA.1 पेक्षा 33% अधिक संसर्गजन्य आहे आणि ज्यांनी बूस्टर डोस घेतले आहे अशा लोकांनाही याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे.
सब व्हेरियंट हा एक प्रकारे व्हायरसच्या मूळ व्हेरिएंट कुटुंबाचा सदस्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ओमायक्रॉन (B.1.1.529) हा कोरोना विषाणूचा एक मूळ व्हेरिएंट आहे, ज्याचे तीन सब व्हेरिएंट किंवा स्ट्रेन आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3. ओमायक्रॉनप्रमाणे हे देखील लोकांमध्ये संसर्ग वेगाने पसरवण्याचे काम करतात.
BA.2 च्या संपर्कात आल्यास संसर्गाचा जास्त धोका
स्टेटन्स सीरम इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन, स्टॅटिस्टिक्स डेन्मार्क आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हा अभ्यास केला. संशोधनात, कोरोना विषाणूच्या 8,500 प्रकरणांची तपासणी करण्यात आली. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, या रुग्णांमध्ये ज्यांना BA.2 संसर्ग झाला होता, ते BA.1 रूग्णांपेक्षा इतरांना संसर्ग करण्यास 33% अधिक सक्षम होते.
या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ फ्रेडरिक प्लेसनर म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या घरातील BA.2 सब व्हेरिएंटच्या संपर्कात आला असाल, तर तुम्हाला पुढील सात दिवसांत संसर्ग होण्याची 39% शक्यता आहे. दुसरीकडे, तुम्ही BA.1 च्या संपर्कात असल्यास, संसर्ग होण्याची 29% शक्यता असते.
BA.2 सहजपणे रोगप्रतिकारक शक्तीला पराभूत करते
संशोधकांच्या मते, BA.2 स्ट्रेनमध्ये काही अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते ओमायक्रॉनच्या पहिल्या सब स्ट्रेनपेक्षा अधिक संसर्गजन्य बनतात. हे मानवी रोगप्रतिकारक शक्तीला सहज पराभूत करण्यास सक्षम आहे, त्यामुळे ज्यांनी पूर्णपणे लसीकरण केले आहे आणि बूस्टर घेतले आहेत त्यांना देखील याचा संसर्ग होत आहे.
लसीकरणाची गरज देखील अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या कोरोना लस ओमायक्रॉनच्या सर्व सब व्हेरिएंट्सवर प्रभावी आहेत. ते आपल्याला गंभीर आजारी होण्यापासून आणि हॉस्पिटलायझेशनच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत.
संशोधनात असेही आढळून आले की, ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 सब व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या जोखमीमध्ये कोणताही फरक नाही. सध्या, डेन्मार्कमधील 81% पेक्षा जास्त लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे आणि 61% लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
डेन्मार्कमध्ये BA.2 बनला डॉमिनेंट स्ट्रेन
जगभरातील बहुसंख्य ओमायक्रॉन प्रकरणे खरं तर BA.1 सबवेरिएंटची आहेत. मात्र BA.2 वेगाने बदलत आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, स्वीडन आणि नॉर्वेसह अनेक देशांमध्ये प्रकरणे नोंदवली जात आहेत. सध्या, डेन्मार्कमध्ये हा एक डॉमिनेंट स्ट्रेन बनला आहे. येथे 82% ओमायक्रॉन प्रकरणे BA.2 ची आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.