आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Only 61 Covid Warriors Across The Country Get Rs 50 Lakh Compensation, Maharashtra Leads In 'Covid Kavach' Scheme

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:देशभरातील फक्त 61कोविड योद्ध्यांना 50 लाखांची भरपाई प्राप्त, ‘कोविड कवच’ संरक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

दीप्ती राऊत | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड कवचसाठी सर्वाधिक 91 अर्ज महाराष्ट्रातून गेले असून त्यापैकी 32 मृतांच्या वारसांना मदत मिळाली आहे

कोरोनाकाळात सेवा करताना संसर्ग झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या देशभरातील केवळ ६१ कोविड योद्ध्यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाखांची मदत मिळाली आहे. ६५ कोविड योद्ध्यांच्या कुटुंबीयांचे विमा दावे अमान्य करण्यात आले आहेत. मदत मिळालेल्या ६१ पैकी ३२ कुटुंबीय महाराष्ट्रातील आहेत. हे विशेष. तसेच देशातील १५६ मृत कोविड योद्ध्यांच्या वारसांचे अर्ज अद्याप विमा कंपनीच्या पातळीवर पडताळणीसाठी प्रलंबित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ४१ कुटुंबे आहेत.

कोरोनाकाळात आरोग्यसेवा बजावताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक यांच्या कुटुंबांसाठी ५० लाखांच्या विम्याचे कवच जाहीर करण्यात आले होते. या योजनेस १८० दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी मार्च ते सप्टेंबर या पहिल्या सहा महिन्यांत देशभरातून २८२ अर्ज विमा कंपनीकडे पोहोचले आहेत. त्यापैकी ६१ योद्ध्यांच्या वारसांना मदत मिळाली असून ६५ अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे बाद झाले आहेत. ही सेवा बजावताना दगावलेल्या १५६ कोविड योद्ध्यांच्या वारसदारांचे अर्ज विमा कंपनीकडे पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत मंजूर झालेल्या ६१ अर्जांपैकी महाराष्ट्रातील लाभार्थी सर्वाधिक आहेत.

सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातील :

याअंतर्गत सर्वाधिक म्हणजे ९१ अर्ज महाराष्ट्रातून गेले असून त्यापैकी ३२ मृतांच्या वारसांना मदत मिळाली आहे. १८ अर्ज बाद झाले आहेत तर ४१ अर्ज विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. यात मुंबई महापालिकेतील सर्वाधिक म्हणजे २९, त्याखालोखाल पुणे महानगरपालिका क्षेत्रातील २० कोविड योद्ध्यांचे अर्ज आहेत. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा क्रमांक असून, तेथून ९ कुटुंबांचे अर्ज विमा कंपनीकडे गेले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश ६, तामिळनाडू ५ असे अर्ज कंपनीला प्राप्त झाले असून, ६७ अर्ज राज्य सरकारांकडेच प्रलंबित आहेत.

कोविड कवच योजनेअंतर्गत दगावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा भरपाई देण्यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार हे संरक्षण कोविड वॉर्डांमध्ये सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच आहे. मात्र, याच्या पात्रतेबद्दल अनेक संभ्रम असल्याने त्यात न बसणारे बरेच अर्ज येत आहेत. त्यामुळे ते बाद होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ९१ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३२ कुटुंबांना मदत मिळवून देण्यात आली आहे. डॉ. नंदकुमार देशमुख, सहसंचालक व कोविड कवच तांत्रिक समिती सदस्य, महाराष्ट्र

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser