आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:नेटफ्लिक्सला बॉलीवूडमध्ये संधी, मल्टिप्लेक्स चालकांना अद्यापही पुनरागमन होण्याची अपेक्षा

पी.आर. संजय | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना निश्चित नफा मिळाला

मोठ्या पडद्यावरील चित्रपटांची मोहिनी भारतीय चित्रपट रसिकांवर कायम आहे. याच कारणामुळे दूरचित्रवाणी आल्यानंतरही बॉलीवूडचे महत्त्व कमी झाले नाही. एवढेच नव्हे तर, ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या विदेशी कंपन्या नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमही भारतात आपले पाय रोवू शकल्या नव्हत्या. मात्र, कोरोना संकटाने त्यांना एक संधी दिली आहे. यानंतरही एक पडदा चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स चालकांना वाटते की, कोरोना संकटानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा पडद्याकडे वळतील.

ओटीटी आधारित प्लॅटफॉर्म बॉलीवूडचे दिग्गज कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना आकर्षिक करत आहेत. अमिताभ बच्चन अभिनीत गुलाबो सिताबो चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता. मात्र, कोरोना विषाणूमुळे लोक घरांत कैद होते, त्यामुळे तो दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या प्राइम स्ट्रीमिंग सेवेवर प्रदर्शित करावा लागला. ओटीटीवर प्रदर्शित करण्यात गुलाबो सिताबोचे निर्माते फायद्यात राहिले. या दरम्यान ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना निश्चित नफा मिळाला. नेटफ्लिक्स इंक आणि वॉल्ट डिस्नेचे डिस्ने हॉटस्टारसारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्मही वेगाने आपले स्थान निर्मात करत आहेत. ते भारतीय ब्लॉकबस्टर्सच्या माध्यमातून भारताच्या १३० कोटी लोकांच्या मनावर पकड बसवू इच्छितात. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सहा नव्या अशा भारतीय चित्रपटांसोबत करार केला आहे, जे चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते. डिस्नेजवळही कमीत कमी सात असे चित्रपट आहेत.

नेटफ्लिक्स, डिस्ने आणि अॅमेझॉनला हे माहीत आहे की, भारतात सर्वात जास्त चित्रपट तयार होतात आणि सर्वात जास्त तिकिटातही विकतात. परिणामी, या वर्गाला छेद दिल्यास या कंपन्यांच्या व्ह्यूअरशिपमध्ये मोठी वाढ होईल. नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज यांनी डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यात सांगितले होते की, २०१९ आणि २०२० पर्यंत ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा आहे. डिस्ने आता क्रिकेटऐवजी ओटीटीवर लक्ष देत आहे. अॅमेझॉन शाहरुखसारख्या ताऱ्यांना प्राधान्य देत आहे.

आंतरराष्ट्रीय फर्म भारतात सब्सक्रिप्शनच्या वृद्धी दरावर अधिक विवरण देत नाहीत, भारताच्या मुख्य प्रवाहाचा चित्रपट उद्योग दीर्घकाळापासून ओटीटीविरोधी राहिला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे आलेल्या बदलामुळे डिजिटल ऑपरेटर्सना नव्या ग्राहकांना आकर्षित करण्याची अभूतपूर्व संधी देत आहे.

तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमाशी संबंधित इन्व्हेस्टमेंट बँक बीक्सली अॅडव्हायजर्सच्या म्हणण्यानुसार, समाजात अद्यापही चित्रपटाचे आकर्षण आहे.