आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करमध्ये प्रथमच भारताचा असा जलवा:3 नामांकने, 2 पुरस्कार, 1 प्रेझेंटर; सोहळा फिका पडल्यानेच ऑस्करचा भारतीयांवर फोकस?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सकाळी ऑस्कर सोहळ्याची अशी बातमी आली की पूर्ण देश 'नाटू-नाटू' करत आहे. यावेळी ऑस्कर पुरस्कारांत भारताला 3 नामांकने मिळाली आणि दीपिका पदुकोणला विशेष सादरकर्ती म्हणून बोलावण्यात आले होते.

RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्तम मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. 'द एलिफंट व्हिस्परर्सला' सर्वोत्तम डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. तथापि, डॉक्युमेंट्री फिचर फिल्म 'ऑल दॅट ब्रिथ्स' शर्यतीच्या बाहेर झाली. यावेळी ऑस्कर पुरस्कारांत आशियाई देशांच्या नामांकनाची खूप चर्चा आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की ऑस्करपासून सहसा अस्पृश्य राहणाऱ्या आशियाई देशांना यावेळी बंपर नामांकन का मिळाले? ऑस्कर पुरस्कारांचा घटता प्रेक्षकवर्ग आणि रेटिंग वाढवण्याचा हा प्रयत्न आहे का?

इतिहासात प्रथमच 4 आशियाई वंशाच्या अभिनेत्यांना नामांकन

ऑस्कर 2023 मध्ये आशियाई वंशाच्या 4 अभिनेत्यांना नामांकन मिळाले. सुमारे 94 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच झाले. यापूर्वी 2004 मध्ये आशियाई वंशाच्या 3 अभिनेत्यांना नामांकन मिळाले होते.

याशिवाय प्रथमच ऑस्करमध्ये एखाद्या आशियन अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मलेशिया-चीन वंशाच्या मिशेल यिओहला Everything Everywhere All At Once’ या चित्रपटासाठी मिळाला.

ऑस्करमध्ये अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालेली ती दुसरी आशियाई महिला आहे. यापूर्वी 1936 मध्ये भारतीय वंशाची अभिनेत्री मर्ली ओबेरॉनला नामांकन मिळाले होते, मात्र पुरस्कार मिळाला नव्हता.

ऑस्करमध्ये भारताला प्रथमच एकदाच तीन नामांकने

ऑस्कर 2023 मध्ये प्रथमच भारताला तीन नामांकने मिळाली. एसएस राजामौलींच्या RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्तम मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. कार्तिकी गोंसाल्विस यांच्या दिग्दर्शनातील 'द एलिफंट व्हिस्परर्स'ला बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर डॉक्युमेंट्री फिचर फिल्म 'ऑल दॅट ब्रीथ्स' रेसच्या बाहेर झाली. यापूर्वीच्या 94 वर्षांत भारतीय वंशाच्या केवळ 5 कलाकारांनाच पुरस्कार मिळाले.

आशियाई देशांच्या वाढत्या नामांकनामागे आहेत ऑस्करविषयीचे वाद आणि सोहळ्याचे घटते प्रेक्षक

2015 मध्ये ऑस्करमध्ये अभिनय श्रेणीतील सर्व 20 नामांकने गौरवर्णीय कलाकारांना मिळाल्यानंतर खूप वाद झाला होता. अमेरिकन अॅक्टिव्हिस्ट एप्रिल रेन यांनी #OscarsSoWhite नावाने सोशल मीडियावर मोहीम चालवली होती. ऑस्कर आयोजित करणाऱ्या अकादमीत बहुतांश गौरवर्णीय पुरूष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

पुढच्या वर्षी पुन्हा नामांकनात विविधता कमी दिसल्यावर ऑस्करविरोधात मोहीम पुन्हा तीव्र झाली. ऑस्कर पुरस्कारांत आशियाई चित्रपट आणि कलाकारांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही झाले. यादरम्यान ऑस्कर सोहळ्याचा प्रेक्षकवर्ग कमालीचा घटत गेला.

#OscarsSoWhite मोहिमेनंतर अकादमीने वैविध्यावर काम केले. 2020 मध्ये अकादमीने घोषणा केली की त्यातील सदस्यांत 45% महिला, 36 टक्के अल्पसंख्याक एथनिक आणि रेशियल कम्युनिटीजचे सदस्य असतील, ज्यांना नामांकनात मतदानाचा अधिकार असेल.

हा हॅशटॅग आणि बदलांचा परिणामही दिसायला लागला. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनातील एका थिंक टँकने 2008 ते 2015 आणि 2015 ते 2023 दरम्यान एक तुलनात्मक अभ्यास केला. यानुसार ऑस्करमध्ये अल्पसंख्याक व एथनिक ग्रुपची नामांकने 8 टक्क्यांवरून वाढून 17 टक्के झाली. ऑस्करमध्ये महिलांची नामांकने 21 टक्क्यांवरून वाढून 27 टक्के झाली. कदाचित याचाच परिणाम आहे की यावेळी ऑस्करमध्ये आशियाई नामांकने वाढली आहेत.

2023 मध्ये ऑस्करची रेटिंग आणि प्रेक्षकवर्ग वाढण्याची अपेक्षा

अकादमीने भारतीय आणि आशियाई कलाकारांची नामांकने वाढवून एक मोठा प्रेक्षकवर्ग ऑस्करला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दीपिका पदुकोणचे प्रेझेंटेनश आणि नाटू-नाटूच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा सोहळा अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्नही झाला. याचा सकारात्मक परिणाम प्रेक्षकांची संख्या आणि रेटिंगवर बघायला मिळू शकतो.

comScore मध्ये वरिष्ठ माध्यम विश्लेषक पॉल यांच्यानुसार, 'यावर्षी अवतार, एल्व्हिस अँड टॉप गनः मॅव्हरीक तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांना नामांकन मिळाले होते. यापैकी दोन चित्रपटांनी 4100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.'

सर्वाधिक बघितले गेलेले ऑस्कर पुरस्कार त्या वर्षांतील आहेत, जेव्हा ब्लॉकबस्टर चित्रपटांना नामांकन मिळाले होते. जसे-1993 (गांधी), 1998 (टायटॅनिक), 2004 (लॉर्ड ऑफ द रिंग्स). 2021 मध्ये लॉकडाऊनमुळे कोणताही मोठा चित्रपटा नव्हता. त्यामुळे या वर्षीचा प्रेक्षकवर्ग आणि रेटिंग डाऊन होती.

आता अखेरीस ऑस्कर पुरस्कारांविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

ऑस्कर पुरस्कारांचा पाया 1927 मध्ये घातला गेला होता. अमेरिकेच्या एमजीएम स्डुटिओचे प्रमुख लुईस बी मेयर यांनी आपले तीन मित्र अभिनेता कॉनरेड नागेल, दिग्दर्शक फ्रॅड निबलो आणि निर्माते फीड बिटसोन यांच्यासोबत एक असा ग्रुप बनवण्याची योजना आखली, ज्यामुळे पूर्ण इंडस्ट्रीला फायदा होईल. एक असा पुरस्कार सुरू करावा ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल. ही कल्पना पुढे नेण्यासाठी लोकांना जोडणे गरजेचे होते.

यासाठी हॉलीवूडच्या 36 सर्वात नामांकित व्यक्तींना लॉस एंजेलिसमधील अँबेसॅडर हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर 'इंटरनॅशनल अकादमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ आर्ट अँड सायन्स' बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सर्व लोक तयार झाले. मार्च 1927 पर्यंत याचे अधिकारी निवडण्यात आले. ज्याचे अध्यक्ष हॉलीवूड अभिनेता व निर्माते डग्लस फेअरबँक्स बनले. आजही ते अकादमी ऑस्कर पुरस्कार देतात.

11 मे 1927 मध्ये 300 प्रतिष्ठित व्यक्तींना मेजवानी देण्यात आली. ज्यात 230 लोकांनी 100 डॉलरमध्ये अकादमीचे अधिकृत सदस्यत्व घेतले. सुरुवातीला पुरस्कार 5 श्रेणी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ व लेखक यात विभाजित करण्यात आला होता. या पुरस्कारांना अकादमी पुरस्कार असे नाव देण्यात आले.

1956 पर्यंत हा पुरस्कार केवळ हॉलीवूड चित्रपटांसाठीच होता. 1957 मध्ये अकादमीने सर्वोत्तम परदेशी भाषेची श्रेणी तयार केली. यानंतर भारतासह सर्व देश आपल्या चित्रपटांचे नामांकन पाठवायला लागले.

अकादमीकडे सध्या 10 हजार सदस्य आहेत. हे सर्व चित्रपट उद्योगातील आहेत. अकादमी गैर-फिल्मी व्यक्तींना सदस्यत्व देत नाही. याचा अर्थ आहे की केवळ चित्रपट बनवणारेच पुरस्कारासाठी चित्रपटांची निवड करतात.

अकादमीचे सदस्यत्व दोन प्रकारचे असते. पहिले जर एखादा अभिनेता, दिग्दर्शक किंवा तंत्रज्ञानाल एखाद्या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले असेल तर अकादमी त्याला स्वतःहून सदस्यत्व देते.

जर एखाद्या अशा व्यक्तीला सदस्यत्व हवे असेल ज्याला कधीही ऑस्कर नामांकन मिळाले नाही. तर अकादमीतील दोन सदस्य त्यांच्या नावाची शिफारस करतात. जर अकादमीला ते पात्र वाटले तर त्यांना सदस्यत्व मिळते. जसे एखाद्या दिग्दर्शकाला सदस्यत्व हवे असेल तर त्याला किमान दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव असावा. त्याचा शेवटचा चित्रपट अलिकडील 10 वर्षांच्या कालावधीतील असावा.

ही बातमीही वाचा...

ऑस्करमध्ये चीन वरचढ ठरेल की भारत, आधीच ठरलेले:अमेरिकन सरकारच्या धोरणांनुसार बदलते ऑस्कर डिप्लोमसी

झ्विगाटो चित्रपटामुळे कपिल शर्मा चर्चेत:लाफ्टर चॅलेंजच्या प्राइज मनीतून बहिणीचे लग्न केले, आज एका एपिसोडसाठी घेतो 50 लाख