आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:उस्मानाबाद प्रशासनाची अपुऱ्या सुविधांवर मात; कोरोनाचा मृत्यूदर आलेख आला खाली

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात टेली आयसीयूच्या माध्यमातून बंगळुरू येथील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. - Divya Marathi
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात टेली आयसीयूच्या माध्यमातून बंगळुरू येथील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
  • उस्मानाबादने केलेले नियोजन खऱ्या अर्थाने इतर जिल्ह्यांसाठीही नक्कीच पथदर्शी ठरणारे आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात मार्च महिन्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर उपचारावरून आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा, अडचणी आदी बाबी समोर आल्या. त्यातच सुरुवातीच्या काळात केवळ तज्ञ डॉक्टर व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कोविड रुग्णांचा मृत्युदर चिंताजनक बदला होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन विकास निधीच्या खर्चाच्या मिळालेल्या अधिकारातून आवश्यक उपचार साहित्याची उपलब्धता करता आले. तसेच काेरोना रुग्णाच्या वर्गवारीद्वारे उपचाराचे केलेले नियोजन देशभरासाठी मार्गदर्शक ठरले आहे. त्यामुळे दररोजचा मृत्यूचा आठ ते नऊ रुग्णांचा आकडा सध्या शून्य ते एकवर पोहोचला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा मोठा वानवा होता. त्यामुळेच वर्षानुवर्षे रुग्णांची थोडीही परिस्थिती गंभीर बनत चालली की त्यांना सोलापूरकडे पुढील उपचारासाठी पाठवले जाते. त्यातच कोरोनामुळे तर आरोग्य सुविधांची वानवा आणखीनच ठळकपणे समोर आणली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांपैकी बहुतांश जणांचा मृत्यू हा अपुऱ्या आरोग्य सुविधा व तज्ञांअभावी झाल्याचेही आरोग्य यंत्रणेच्याच ऑडिटमधून समोर आले. त्यानंतर येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यासाठी आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधत विशेष प्रयत्न करून नव्याने आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, तज्ञ डॉक्टर, रुग्णांची वर्गवारी करून त्यांचे मॉनिटरिंग, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी स्क्रीनिंग करून कोरोना संशयितांना वेळेत उपचारासाठी आणणे असे प्रयत्न करून मृत्युदर कमी करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीतील निधीतून ३३ निधी कोविड उपाययोजनेत खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अधिकार हा महत्त्वाचा ठरला. यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या ४५ वरून १०६० तर व्हेंटिलेटर बेडची संख्या १६ वरून १११ वर नेण्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेला यश आले. ही यंत्रणा केवळ जिल्हा पातळीवर न ठेवता ती उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांपर्यंत पोहोचवल्याने जिल्हा रुग्णालयावरील ताणही कमी झाला. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादने केलेले नियोजन खऱ्या अर्थाने इतर जिल्ह्यांसाठीही नक्कीच पथदर्शी ठरणारे आहे.

टेली आयसीयूची सुविधा

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गंभीर कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत याकरता महिनाभरापूर्वी टेली आयसीयू ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पाच आयसीयू वॉर्डमधील तब्बल ५० बेड कॅमेऱ्यांद्वारे बंगळुरू येथील तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. तेथून नियमित येथील डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून उपचाराबाबत सहकार्य केले जाते. विशेष म्हणजे प्रशासनाने एक रुपयाही न खर्चता ही सुविधा क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या सीएसआर फंडातून उभारली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser