आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Our environment has a heart attack if pesticides are not sprayed on crops food spoilage and transportation is avoided 50 per cent of the problem will be solved

भास्कर ओरिजिनल :आपल्या पर्यावरणाला हृदयविकार जडलाय; जर पिकांवर कीटकनाशके फवारली नाहीत, अन्नाची नासाडी आणि त्याची वाहतूक टाळली तर 50 टक्के समस्या सुटेल

पवन सुखदेवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान बदल नव्हे, हे तर क्लायमेट ब्रेकडाऊन आहे, जग या समस्येकडे दुर्लक्ष करते आहे

जग दशकांपासून हवामान बदलाशी लढा देत आहे. मात्र, जगभरातील नेतृत्वाला यावर तोडगा शोधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना ही समस्या हाती घ्यावी लागणार आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की, सर्वसामान्यांनी काय करावे ? माझ्या दृष्टीने ही समस्या जेवढी मोठी आहे त्यावरचा तोडगाही तेवढाच सोपा आहे. सर्वसामान्यांना फक्त दोनच कामे करायची आहेत. पहिले- समस्या समजून घेणे. दुसरे- या समस्येच्या मुळाशी घाव घालणे. हे असे समजून घेऊ...

समस्या : आपण विषारी रसायनयुक्त हिरवाईस हरित क्रांती मानतो आहोत

मूळ समस्या हवामान बदल नावातच आहे. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर आपण हृदय बदलते आहे असे म्हणत नाही. हवामानाला हृदयविकार जडला आहे, आपण त्यास हवामान बदल म्हणतो आहोत. हे क्लायमेट ब्रेकडाऊन आहे. वातावरणात हानिकारक हरित गृह वायू (कार्बन डायऑक्साइड) वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. दुष्काळ, महापूर,वादळाच्या वाढत्या घटना याचाच परिणाम आहे. पर्यावरणाच्या मूळ समस्येचे कारण समाज निसर्गासोबत ज्या पद्धतीने वागतो आहे त्यात आहे. निसर्ग हवा, पाणी, जंगलसारख्या अनमोल सेवांसाठी आपल्याला बिल पाठवत नाही. कोळसा, तेल (जीवाश्म इंधन) वापराशिवाय शेती, खाण्यापिण्याच्या आपल्या पद्धतीही हरित गृह वायू वाढवत आहेत. उदाहरणार्थ- शेतीत कीटकनाशकांचा अविचारी वापर वाढला आहे. आपण यास हरित क्रांती मानले आहे. यामुळे जमीन नापीक होत आहे. पिकांत विष भिनते आहे आणि लोक ते खाऊन आजारी पडत आहेत. दुसरीकडे, आपण अन्न वाया घालवतो आहोत. अमेरिकेसारख्या देशात लोक निम्मे अन्न टाकून देतात. हा ट्रेंड भारतासह जगभर वाढतोय. एका अंदाजानुसार, जगात जेवढे अन्न बनते त्याच्या एक तृतीयांश फेकले जाते. अन्न नासल्याने मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस वायू बाहेर पडतो. हरित गृह वायूचे ५०% उत्सर्जन चुकीची शेती, पिकांची वाहतूक व अन्न नासाडीमुळे होते. कर्ब शोषणाऱ्या जंगलांची तोड होत आहे. हे घातक आहे. वातावरणात सुमारे ५०% हरित गृह वायूचे कारण अन्न उगवण्याची पद्धत आणि अन्नाची नासाडी आहे.

तोडगा : जे जवळपास उगवते तेच खा, पडीक जमिनीवर झाडे लावा

>  शेतकऱ्याला आपल्या जमिनीवर प्रेम करावे लागेल व रासायनिक शेती सोडावी लागेल. जंगलातील झाडेझुडपे रसायनाविनाच उगवतात ना.

>  सामान्यांनीही कीटकनाशक विरहित धान्य, फळे, भाजीपाल्याची शेतकऱ्यांकडे मागणी केली पाहिजे. मागणी होणार नाही तोवर शेतकरी तसे करणार नाहीत.

>  आपल्या परिसरात येणारी हंगामी फळे-भाजीपाला आणि धान्याचा वापर केला पाहिजे. बाहेरून या जिनसा मागवल्या तर महागाई वाढते. आणि जे महाग ते पौष्टिक हा समज चुकीचा आहे.

>  झाडे जमिनीचे वस्त्र आणि मानवाच्या निरोगीपणाची ढाल आहेत. पडीक जमीन विशेषत: नदी-तलावाच्या जवळ रुंद पानांची झाडे लावा. यामुळे जमिनीत ओलावा राहील. हवा शुद्ध होईल.

>  पर्यावरण रक्षणासाठी आपल्याला निसर्गाच्या जवळ जावे लागेल. निसर्गातून आपल्याला सर्व काही मोफत मिळत आहे त्यामुळे त्याची किंमत नाही. आज परागीकरणासाठी शेतकऱ्यांना मधमाशा भाडे देऊन आणाव्या लागत आहेत. वातावरणातील इतर जीवजंतंूची काळजी घेणे शिकावे लागेल.

>  भारतात समूहशक्ती हे मोठे भांडवल आहे. जगात खूप कमी देशांकडे ते आहे. लोकांचा सहभाग वाढवून जल, जंगल, जमिनीचे संरक्षण सुलभरीत्या करता येते. सर्वांनी मिळून पर्यावरणाची काळजी घ्यावी लागेल.

> झाडे जमिनीचे वस्त्र आणि मानवाच्या निरोगीपणाची ढाल आहेत. ते पर्यावरण व हवामान आपल्यासाठी पूरक बनवतात.

0