आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 'Out of school' Reaches 3 Lakh 70 Thousand Children; Expansion To 17 Districts In The State After Success In Five Districts

मंडे पॉझिटिव्ह:3 लाख 70 हजार मुलांपर्यंत पोहोचली ‘शाळेबाहेरची शाळा’; पाच जिल्ह्यांतील यशानंतर राज्यातील 17 जिल्ह्यांत विस्तार

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पालडोह गावातील शिक्षक कारमधील रेडिओच्या माध्यमातून हा कार्यक्रम गावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. - Divya Marathi
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पालडोह गावातील शिक्षक कारमधील रेडिओच्या माध्यमातून हा कार्यक्रम गावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
  • रेडिओ आणि मोबाइलचा अभिनव उपयोग, 6 हजार गावांमधील 12 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

“हॅलो, बच्चे कंपनी, मी आरजे रेश्मा.. सगळ्या मंडळींचं स्वागत... ’

दर मंगळवार आणि शुक्रवारचे दहा वाजले की विदर्भातील साडेचार हजार गावांमधील बच्चे कंपनी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य सारे दक्ष होतात. कुणी एमडब्ल्यू ५१२.८ हे नागपूर आकाशवाणीचे केंद्र आपल्या रेडिओवर सेट करतात, तर कुणी आपल्या मोबाइलवरील “न्यूज ऑन एअर’ हे अॅप उघडतात आणि सुरू होते अर्ध्या तासाची “शाळाबाहेरची शाळा.’ नागपूर विभागीय कार्यालय, “प्रथम’ संस्था आणि नागपूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या

लाइव्ह मुलाखतींनी उत्साह वाढला

आदल्या दिवशी व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आठवड्यातील पाठ्यक्रम पालक आणि शिक्षकांच्या मोबाइलवर पाठवले जातात. त्यानुसार मुलांनी तो अभ्यास कसा केला यासाठी आरजे कोणत्याही तीन विद्यार्थ्यांना आणि तीन पालकांना अचानक फोन करून त्यांच्या लाइव्ह मुलाखती घेतात. यामुळे या शिक्षणात विद्यार्थी, पालक आणि गावकरी या साऱ्यांचा सहभागही वाढला आहे आणि उत्साहही.

अशी केली अडचणींवर मात :

स्मार्टफोन, रेडिओ, रेंज नसणे अशा अनेक अडचणी यात आल्या. त्यावर आकाशवाणीचे “न्यूज ऑन एअर’ हे अॅप, ग्रामपंचायतींनी लाऊडस्पीकर, शिक्षकांच्या गाडीतील स्पीकर्स, यूट्यूब आणि “प्रथम महाराष्ट्र’ हे अॅप याचे उपाय शोधले.

शिक्षणातील खंड टाळता आला

हा प्रयोग अत्यंत प्रभावी ठरला आहे. गावातून चांगला फीडबँक मिळतो आहे. मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा हा कायमस्वरूपी उपाय नाही, मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांची शिकण्याची प्रक्रिया निरंतर राहावी हा उद्देश यामुळे निश्चितच साध्य होत आहे. - डॉ संजीवकुमार, विभागीय आयुक्त, नागपूर

गावपातळीपासून प्रशासनाचा सहभाग

यात प्रशासनाचा ताण वाढवायचा नव्हता, परंतु गावपातळीपासून स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकीय यंत्रणा सहभागी व्हाव्यात हा हेतू होता. त्यामुळेच गावातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन सरपंच, गावकरी सहभागी झाले. महिला व बालविकास, ग्रामविकास यंत्रणांचे सहकार्य लाभले. - सोमराज गिरटकर, राज्यप्रमुख, प्रथम संस्था

बातम्या आणखी आहेत...