आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Every 30 Hours A Person Becomes A Billionaire, The Top 10 Richest Have As Much Wealth As 40% Of The Poor

कोरोनामुळे वाढली गरीब-श्रीमंतामधील दरी:दर 30 तासांनी एक व्यक्ती अब्जाधीश, अव्वल-10 श्रीमंतांकडे 40% गरीबांइतकी संपत्ती

शुभम शर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2020 मध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर बरेच काही बदलले आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढलेली दरी होय. गेल्या दोन वर्षांत श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब झाले आहेत. ऑक्सफॅमच्या ताज्या अहवालातून हे उघड झाले आहे, ज्याचे नाव आहे- प्रॉफिटिंग फ्रॉम पॅन

या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे आम्ही या ठिकाणी सोप्या भाषेत मांडत आहोत….

कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धापूर्वी जे लोक दारिद्ररेषेच्या वर आले होते ही त्यांची परिस्थिती आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा सरकारी आणि खासगी भागीदारीचा आंतरराष्ट्रीय गट आहे. त्यांची बैठक यावर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होते. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर ही बैठक झाली आहे.

श्रीमंतांनी आपत्तीचे संधीत रूपांतर केले

ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचेर्की म्हणाल्या की, ‘कोरोनाचा काळ श्रीमंतांसाठी वरदान ठरला आहे, ज्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील असमानता वाढली आहे. यासोबतच खाद्यपदार्थ, तेल, औषधांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांची झोप उडवली आहे. मात्र असे असूनही त्याचा फायदा अब्जाधीशांना झाला आहे. त्यांची मालमत्ता झपाट्याने वाढत आहे.’

बातम्या आणखी आहेत...