आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरकांद्याचे भाव पाकिस्तानमध्ये वर्षात 500% वाढले:तिजोरीत 21 दिवसांच्या खर्चाचा पैसा; दुर्दशेची संपूर्ण कहाणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी जानेवारीत पाकिस्तानमध्ये कांद्याचा भाव 36 रुपये प्रति किलो होता, तो यंदा जवळपास सहा पटीने वाढून 220 रुपये झाला आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 13% च्या दराने वाढत होती, सध्या ती 25% च्या दराने वाढत आहे. परकीय चलनाचा साठा 8 वर्षातील सर्वात कमी शिल्लक आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा जीडीपीच्या 78 टक्के झाला आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पाकिस्तानच्या दुर्दशेची संपूर्ण कहाणी जाणून घ्या, 5 सोप्या ग्राफिक्समध्ये…

पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टींच्या किमती वाढण्याची 4 प्रमुख कारणे आहेत.

  • गेल्या नऊ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
  • जून 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान, पुराने देशाच्या मोठ्या भागांना उद्ध्वस्त केले. याचा फटका दीड कोटींहून अधिक लोकांना बसला. यामुळे देशाचे 12.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.
  • वाढत्या आर्थिक तुटीमुळे पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 160.1 रुपये होता, डिसेंबर 2022 मध्ये तो 224.8 रुपयांवर कमजोर झाला.
  • जगभरात तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. पाकिस्तान आपल्या जीवनावश्यक वस्तूंपैकी बहुतांश वस्तू विदेशातून आयात करतो. त्यामुळेच येथे पामतेल, औषधे आणि खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत.

विविध विषयांवरील इतर एक्सप्लेनर देखील वाचा...

रक्त काढून ‘ब्लड पेंटिंग’ भेट देण्याचा ट्रेंड:तामिळनाडू सरकारने घातली बंदी; का वाढतेय त्याची क्रेझ?

स्वयंपाकी होऊ शकतो पुतीन यांचा उत्तराधिकारी:9 वर्षे तुरुंगात राहिले येवगेनी, हॉट डॉगचा स्टॉल लावला, खासगी सैन्यही बनवले

24 रशियन श्रीमंतांचा मृत्यू, पुतिन यांच्यावर संशय:कोणी डोंगरावरुन तर कोणी छतावरून पडले, भारतात 3 मृत्यू

'नोटाबंदी' निर्णयावर असहमत एकमेव न्यायमूर्तीची कहाणी:5 वर्षांपूर्वीही केंद्र सरकारचा निर्णय उलटला

ब्रेन-ईटिंग अमिबाने फस्त केले मानवी मांस:कोमट पाण्याद्वारे नाकातून शरीरात; 11 दिवसांत व्यक्तीचा मृत्यू

मुलगी कायमच स्वच्छता करत राहते:डॉक्टरांनी OCD सांगितले; उपचारासाठी न्यायालयाची परवानगी असलेला आजार नेमका काय?

बातम्या आणखी आहेत...