आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुपूर शर्मांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शुक्रवारी देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला. आता या हिंसाचारामागे पाकिस्तानचाही हात असल्याचे समोर येत आहे. DFRACने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानचे 7 हजारांहून अधिक ट्विटर अकाउंट्स फेक न्यूजच्या मदतीने भारतात दंगल भडकवण्याचा कट रचत होते.
अशा परिस्थितीत आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, पाकिस्तानात बसलेल्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात हिंसाचार पसरवण्याचे काम कसे केले आहे...
सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान कसा पसरवतोय हिंसाचार?
सोशल मीडियावर या वाद आणि हिंसाचाराशी संबंधित जे काही हॅशटॅग सुरू आहेत, त्यात सर्वाधिक कॉमेंट करणारे पाकिस्तानचे आहेत. म्हणजेच पाकिस्तान याप्रकरणी भारतीय मुस्लिमांना भडकवण्यात गुंतलेला आहे.
डिजिटल फॉरेन्सिक रिसर्च अँड अॅनालिटिक्स सेंटर (DFRAC)च्या नवीन अहवालात ही बाब समोर आली आहे. DFRAC ने आपल्या अहवालात 60 हजारांहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांच्या पोस्ट आणि कॉमेंटच्या वर्तनाचे विश्लेषण केले आहे.
विश्लेषणात असे आढळून आले की या 60,000 युझर्समध्ये बहुतेकांची नॉन-व्हेरिफाइड खाती होती, ज्यांनी या प्रकरणाशी संबंधित बहुतेक हॅशटॅगवर कॉमेंट केली होती. त्यापैकी सुमारे 7,100 लोक किस्तानचे होते. हे स्पष्ट आहे की, प्रेषितांशी संबंधित वादासाठीचे हॅशटॅग पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंट्सकडून वाढवले जात आहेत. आणि 3,000 खाती सौदी अरेबियाची होती, 2,500 खाती भारतातून, 1,400 इजिप्तमधून आणि 1,000 हून अधिक खाती अमेरिका आणि कुवेतमधून होती.
डीएफआरएसीच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या ARY न्यूजसह अनेक वाहिन्यांनी भारताशी संबंधित खोट्या बातम्या चालवल्या आहेत. ओमानच्या ग्रँड मुफ्तींनी भारतीय उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याचे ARY न्यूजने सांगितले, परंतु रिपोर्ट्समध्ये आढळले की, मुफ्तींनी प्रेषितांवरील वक्तव्यावर टीका केली होती आणि त्याविरोधात सर्व मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांचा बॉयकॉट इंडियाचा ट्रेंड सुरू करण्याचा दावा भ्रामक आहे.
याशिवाय पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनीही भाजपचे निष्कासित नेते नवीन जिंदाल यांच्याबाबत खोटा दावा केला आहे. त्यांनी नवीन जिंदाल हे उद्योगपती जिंदाल यांचे बंधू असल्याचे सांगितले.
यासोबतच इंग्लंडचा क्रिकेटर मोईन अलीच्या नावाने ट्विटरवर एक बनावट स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मोइन आयपीएलवर बहिष्कार टाकण्याबाबत बोलत आहे. हा स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे. यामध्ये सर्वाधिक वापरलेले काही हॅशटॅग #Stopinsulting_ProphetMuhammad, #boycottindianproduct आहेत.
मुस्लिमांना कसे भडकावण्यात आले?
प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर भारताच्या कारवाईनंतर इराण आणि कतारसारख्या देशांनी निवेदने जारी करून समाधान व्यक्त केले. असे असूनही काही लोक मुस्लिमांना भडकावण्यात गुंतले आहेत. डीएफआरएसीच्या अहवालातही अशाच प्रकारचे द्वेष पसरवणारे घटक उघड झाले आहेत. खालिद बेदुइन, मोइनुद्दीन इब्र नसरुल्ला आणि अली सोहराब यांसारखे लोक यापैकी प्रमुख आहेत.
खालिदने #BoycottIndianProduct सह पोस्ट करण्यास सुरुवात केली. मधल्या काळात काश्मीरचा मुद्दाही त्याच्याशी जोडला गेला. त्याचवेळी मोईनुद्दीन इब्रा नसरुल्लानेही अनेक घृणास्पद ट्विट केले.
भारतातील हिंसाचाराला सोशल मीडिया कसा जबाबदार आहे?
नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचारासाठी सोशल मीडियाला जबाबदार धरले जात आहे. रांची, प्रयागराज आणि मुरादाबादमध्ये 10 जून रोजी सोशल मीडियावरून 'भारत बंद' संदर्भात असेच संदेश आणि हॅशटॅग पसरवले गेले.
रांचीमध्ये असे संदेश केवळ फेसबुक आणि ट्विटरवरूनच नव्हे, तर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातूनही वेगाने पसरत होते. प्रयागराजमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर केला गेला.
प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनीही हे मान्य केले आहे. या घटनेनंतर ते म्हणाले, 'सोशल मीडियावरून फिरणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवले जात आहे. ज्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
यापूर्वीही हिंसाचार पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आहे. ORFच्या अहवालानुसार, सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या हिंसाचाराच्या संख्येत 30% वाढ झाली आहे. एखाद्या वर्गाच्या नाराजीचा फायदा घेऊन हिंसाचार पसरवून त्याचे पद्धतशीरपणे हिंसाचारात रूपांतर केले जात असल्याचेही संशोधनात आढळून आले आहे.
पाकिस्तानने यापूर्वीही भारताविरुद्ध कट रचले
याआधीही भारतात असा अपप्रचार करण्यात पाकिस्तानचे नाव समोर आलेले आहे. एका अहवालानुसार, फेसबुकने 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाकिस्तानी लोक त्यावेळच्या निवडणुकांवर कसा प्रभाव टाकत होते, याचा खुलासा केला होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयही निवडणुकांदरम्यान भारतात खोट्या बातम्या पसरवत होती, असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अशी सुमारे 687 इंस्टाग्राम पेजेस काढून टाकण्यात आली.
20 डिसेंबर 2021 रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हिंसाचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील 20 यूट्यूब आणि 2 वेबसाइट बंद केल्या होत्या. या चॅनेल आणि वेबसाइट्सना खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल आणि भारताविरुद्ध कट रचल्याबद्दल गुप्तचर यंत्रणेने पकडले होते.
मंत्रालयाने माहिती दिली होती की, 20 पैकी 15 यूट्यूब चॅनेल पाकिस्तानच्या 'नया पाकिस्तान ग्रुप'द्वारे चालवले जातात. या 20 चॅनेलचे एकूण 35 लाख सदस्य होते. तपासात भारतात वेगवेगळ्या प्रसंगी हिंसाचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याची चर्चा समोर होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.