आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलोंग यांनी त्यांच्या खास शैलीत म्हटले की पाणीपुरीची चवच अशी होती की जपानचे पंतप्रधानही स्वतःला रोखू शकले नाही.
ज्या पाणीपुरीने जपानच्या पंतप्रधानांचे आदरातिथ्य केले, त्याविषयी महाभारतातील एक कथाही प्रचलित आहे.
असे म्हटले जाते की नवी नवरी द्रौपदीच्या सासरच्या घरातील पहिल्या स्वयंपाकादरम्यान सासू कुंतीने तिला थोडेसेच पीठ आणि उरलेल्या भाज्या देत म्हटले की तुझ्या नवऱ्यांसाठी काहीतरी बनव. द्रौपदीने यातून पाणीपुरी बनवली. ती चवदार आणि पौष्टिक तर होतीच, सोबतच सर्वांचे पोटही भरले.
चाटच्या गाड्यांवर येणाऱ्या चवीच्या रसिकांचे स्वागत आधी पाणीपुरीच करते. नंतर त्यांच्या सेवेत चाट वाढला जातो.
चाट शब्द चाटणे यापासून बनला आहे. जो आधी पानांच्या द्रोणात खाल्ला जायचा. चव अशी असायची की लोक बोटही चाटायचे. म्हणजे तो चाटच काय ज्यानंतर खाणारा बोटे चाटणार नाही.
प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार म्हणतात की पाणीपुरी किंवा चाट आपला आहार ब्रेक करतात, जे चांगली खुराक आणि आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्यांचे मत आहे की आपल्या शरीराला अनेक मसाले हवे असतात. जसे की जिरे, ओवा आणि हिंग.
बदलत्या हवामानामुळे किंवा खराब पाण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी याच मसाल्यांची गरज असते. बदलत्या हवामानाचे जंक्शन वसंत ऋतूमध्ये मसाल्यांनी भरलेली आंबड-गोड चटकदार चव हवी असेल तर ती पानीपुरी आणि चाटमधून मिळते.
हंगेरियन भौतिकशास्त्रज्ञ निकोलस कुर्ती आणि फ्रेंच केमिस्ट हार्वेंना जुने स्वयंपाकघर नव्या विज्ञानाशी जोडण्याचे श्रेय जाते. जेवण बनवणे आणि जुन्या व नव्या पद्धतींच्या फ्युजनसाठी त्यांनी 'मॉलिक्युलर गॅस्ट्रोनॉमी' टर्म विकसित केली.
या पद्धतीत अन्न एखाद्या गोष्टीत भरून दिले जाते. जे खाल्ल्यावर जीभेला पाणी सुटते किंवा असे म्हणा की चवीचा स्फोट होतो. याला स्फेरिफिकेशन म्हणतात.
रणवीर ब्रार म्हणतात की परदेशात जेव्हा याविषयी सांगितले जाते तेव्हा त्यांना हसू येते. कारण भारतात अनेक शतकांपासून पानीपुरी याच चवदार स्फोटासाठी खाल्ली जाते.
पानीपुरी तोंडात जाताच मसाल्यांच्या चवीचा स्फोट होतो. तिखट, आंबट आणि गोड, सर्व सोबतच.
मस्कतमधील एका प्रसिद्ध हॉटेलच्या शेफ पल्लवी निगम वूमन भास्करसोबत बोलताना पानीपुरीच्या रेसिपीविषयी म्हणतात की यात वापरले जाणारे मसाले वात, कफ आणि पित्त दोष दूर करतात.
पानीपुरीचा प्राण पाणी
पानीपुरी तिच्या तिखट, आंबट पाण्याविना अपूर्ण आहे. जलजिरा पानीपुरीचा पूर्वज आहे. जलजिरा किंवा जिऱ्याचे पाणी हिंगासोबतच पचनात मदत करते.
म्हणूनच नव्या आईचे पोट फुगल्यावर हिंगाचे पाणी दिले जाते. हेच हिंगाचे पाणी बत्ताशाचे पाणी बनले. म्हणूनच पानीपुरी खाल्ल्यानंतर लोक याचे पाणी वेगळे मागतात.
ताज महाल बनवणाऱ्या शाह जहानच्या शाही स्वयंपाकातून प्रसिद्ध झाले चाट
खाण्या-पिण्याच्या इतिहासात विशेष रस असलेल्या रसिकांत चाटच्या उत्पत्तीविषयी शाह जहानच्या काळातील एक चटकदार कहाणी लोकप्रिय आहे.
चविष्टपणे ही कहाणी सांगितली जाते की शाह जहानच्या शाही स्वयंपाकघरात सर्वात आधी चाट बनले.
म्हटले जाते की जेव्हा शाह जहानने दिल्लीला आपली राजधानी घोषित केले, तेव्हा या आनंदाच्या प्रसंगी नवरोजच्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन झाले. मात्र सोहळ्यात हकीम अली दिसले नाही.
तेव्हा शाह जहानने दरबारींना हकीमच्या अनुपस्थितीचे कारण विचारले.
दरबारींनी सांगितले की हकीम नाराज आहेत. शाह जहानने हकीमला नाराजीचे कारण विचारले.
हकीम अली म्हणाले, 'महाराज, दरबार दिल्लीला गेला आणि तुम्ही दिल्लीला राजधानी बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी सल्ला-मसलतही केली नाही. आता तेच मोगलांचे घर होईल, तिथे यमुनेचे पाणी प्यावे लागेल. मात्र ते कठीण आहे कारण यमुनेचे पाणी पिण्यालायक नाही.'
हे ऐकून शाह जहान खूप चिंतित झाले आणि म्हणाले की आता काय करावे. बादशहांना चिंतित पाहून हकीमने स्वतः उपाय सुचवला.
हकीमने जेवणात मिरची आणि गरम मसाले वाढवण्याचा सल्ला दिला. मात्र याचे नुकसानही कमी नव्हते.
हकीमने सांगितले की जास्त मिरची आणि मसाल्यांच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्व पदार्थांत खूप तेल आणि दही टाकावे.
परिणाम असा झाला की चाट खाणाऱ्यांनी चाटमध्ये मिरची टाकायला सुरू केले आणि घरातील मांसाच्या पदार्थात मसाल्याचे प्रमाण वाढवले. दिल्लीत चाटची चव वाढली आणि इतर पदार्थही मसालेदार बनले.
इतिहास अभ्यासकांनी चाटच्या या कथेत ऐतिहासिक झोल असल्याचे सांगितले
मात्र इतिहास अभ्यासक सोहेल हाश्मी म्हणतात की, चाटच्या या प्रसिद्ध कथेत एक ऐतिहासिक उणीव आहे. या उणीवेविषयी त्यांचे म्हणणे आहे, पहिली गोष्ट, शाह जहानच्या कालखंडात दिल्लीत मिरची मिळत नव्हती.
पोर्तुगीजांसोबत मिरची मुंबईत पोहोचली. जी मराठ्यांनी देशाच्या दुसऱ्या भागात पोहोचवली.
दुसरी गोष्ट - दिल्लीत यमुनेचे पाणी कधीही पिण्यासाठी वापरले गेले नाही. दिल्लीला आधी शाहजहानाबाद म्हटले जात होते. यमुनेतून पाणी आणून दिल्लीत त्याच्या वापराची कोणतीही योजना बनली नाही.
ब्रजमधून चाट दिल्लीला पोहोचला, प्रत्येक भागातील चवीने आणखी समृद्ध झाला
सोहेल हाश्मी म्हणतात की दिल्ली तसे पाहिल्यास मथुरेसह राजस्थानच्या अनेक शहरांच्या जवळ आहे. मथुरा, वृंदावन म्हणजेच ब्रजमध्ये चाट बनवणे आणि खाण्याची समृद्ध परंपरा राहिली आहे. यात कसलिही शंका नाही दिल्लीवाल्यांनीच चाट चविष्ट बनवली.
राजस्थानी सर्वात जास्त मिरची खातात. राजस्थानचे मारवाडी मोठ्या संख्येने दिल्लीत राहतात. शक्य आहे की त्यांच्या माध्यमातूनच दिल्लीतील खाद्य पदार्थांत मिरचीचा तिखटपणा आला असेल.
प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रारही सोहेल हाश्मीसोबत सहमत दिसतात. त्यांचे म्हणणे आहे की कचालूसारख्या कंदाची चाट भारतातील लोक आधीपासून खात होते.
पोर्तुगीजांनी जेव्हा भारतात बटाटे आणले तेव्हा चाटच्या सर्व पदार्थांत आलू चाट किंवा आलू टिक्कीसारख्या गोष्टींचा समावेश झाला. मात्र मोगलांच्या शाही स्वयंपाकघराने आपल्या विविध मसाल्यांनी चाटमध्ये अनेक रंग भारले आणि ती आणखी चविष्ट बनवली.
चाटने दिल्लीकरांना जीभेचे रसिक बनवले, चाट घरांतही बनायला लागले
जुन्या दिल्लीत ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेल, गाड्यांवर जाऊन खाण्याची प्रथा कधीही नव्हती.
जर बाहेरचे काही खायची इच्छा असेल तर हॉटेलातून आणून घरी येऊन खाल्ले जायचे. मात्र चाटने दिल्लीकरांना घरातून बाहेर आणले.
दिल्ली राजधानी झाल्यावर चाट देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले आणि जगावरही याच्या चवीची नशा चढली.
चाट हा असा पदार्थ आहे जो लोक घरी नव्हे तर बाहेर जाऊन खाणे पसंत करतात.
लॉकडाऊनदरम्यानही लोकांना चाट आणि पानीपुरीची उणीव भासली. कोणताही उपाय नसल्याने सर्व घरीच चाट बनवायला लागले.
हेच कारण होते की कोरोना संकटादरम्यान गूगलवर चाट आणि पानीपुरीची रेसिपी शोधण्याचे प्रमाण 107 टक्क्यांनी वाढले.
दहीवड्याचे अपत्य आहे चाट
दक्षिण भारतातील फूड हिस्टोरियन के टी अचाया होते. तिथेच शिकले आणि प्रशिक्षणाने ऑइल केमिस्ट होते. पण भारतीय खाद्य पदार्थांवर त्यांनी खूप काम केले.
त्यांचे पुस्तक 'इंडियन कूसिनः अ हिस्टोरिकल कॅम्पेनियन'मध्ये भारतीय खाद्य पदार्थांची पूर्ण कुंडली मिळते.
केटी अचायांनी आपले दुसरे पुस्तक 'द डिक्शनरी ऑफ इंडियन फूड'मध्ये सांगितले आहे की 1000 वर्षांपूर्वी चाटचा शोध लागला.
धार्मिक ग्रंथांत हे वटाका किंवा वडा या नावाने याचा उल्लेख आहे. दही वडे आजच्या चाटचे पूर्वज असू शकतात.
मुंबईच्या चाटवर चढला युपी आणि सिंधच्या चवीचा रंग
देशातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमधील शेफ विनय कुमार म्हणतात की चाटचा इतिहास घोर शहरी आहे. सायंकाळी काहीतरी चटकदार खाण्याची आवड असलेल्या शहरी लोकांसाठी याची चव तयार करण्यात आली आहे.
स्ट्रीड फूडचे शौकिन आणि चवीच्या रसिक लोकांना हे ऐकून आश्चर्य होईल कि जी चाट आणि दही भल्ले किंवा चाट पपडी लोक चवीने खातात ती सुरुवातीच्या काळात श्रीमंतांची आवड राहिली आहे.
चाटचा पश्चिम आणि पूर्वेकडे विस्तार
मुंबई आणि कोलकातामध्ये काम करणाऱ्या युपीच्या कामगारांनी चाटला केवळ प्रसिद्ध बनवले नाही तर त्यात स्थानिक चवही मिसळली.
महाराष्ट्रातील भेल-पुरी चाट कुटुंबाचाच भाग आहे. मुंबईत मिळणाऱ्या चाटवर युपीची चटकदार चव आणि भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सिंधहून मुंबईला पोहोचलेल्या लोकांचा परिणाम दिसतो.
चाट मसाले तुमच्या-आमच्या आरोग्याची काळजी घेतात
चाट मसाले आयुर्वेद आणि युनानी उपचार पद्धतीत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. चाटमध्ये सामान्यपणे भाजलेले धने, काळे आणि सैंधव मीठ, जिरे, काळे मिरे आणि हिंग टाकले जाते.
पोर्तुगीज भारतात येण्याच्या खूप कालावधीनंतर मोगल शाही किचनमधून चाटमध्ये मिरचीचा वापर सुरू झाला. विशेष गोष्ट ही आहे की, प्रत्येक भागात वेगवेगळ्या मिरचीने चाटचा तिखटपणा वाढवला जातो.
तर दिल्लीच्या चाटमध्ये लाल नव्हे तर वाटलेली पिवळी मिरची टाकली जाते. तर देशाच्या इतर भागात चाटवर लाल मिरची पावडर टाकले जाते.
चाटच्या ताफ्यात सामील कांजी वडाची कहाणी मजेशीर
धर्मग्रंथांत आंबट पाणी, फर्मेटेड तांदळाच्या पाण्यात डाळीचे भजे टाकून खाण्याचाही उल्लेख आढळतो. मानले जाते की संभाव्यपणे इथूनच दिल्ली आणि युपीच्या कांजीवड्याची सुरुवात झाली असेल. जे हिंग आणि मोहरीसोबत फर्मेंटेड पाण्यात मूगडाळीचे भजे किंवा कोबी, गाजर शलजमसह तयार केले जाते.
गाजराची कांजी पोटासाठी चांगली मानली जाते. दही वडा, जो नंतर दिल्लीत दही भल्ला बनला, अखेर यातूनच निघाला असेल.
कटलेटचा देसी अवतार आहे आलू टिक्की
आलू टिक्की इंग्रजांतील लोकप्रिय क्रोकेटस/कटलेट/चॉपचे भारतीय रुप आहे. ब्रिटिश भारताची राजधानी कोलकात्यात पहिल्यांदा याचे भारतीयीकरण झाले.
चाटच्या रसिकांनी फळांनाही सोडले नाही
चाटविषयीचे वेड असे की त्यांनी फळांनाही सोडले नाही. फळे कापून, त्यावर चटकदार मसाले टाकून खाण्याचीही प्रथा सुरू झाली.
दिल्ली-पंजाबसह पूर्ण उत्तर भारतात मोठ्या चवीने लोक ते खातात आणि चवीसह आरोग्यही चांगले ठेवतात.
चाटला सफेद मटारने चवदार बनवले
शेफ विनय कुमार सांगतात की मध्यकालीन भारतात चाटमध्ये डाळीची भूमिका महत्वाची असायची. या चाटमध्ये डाळीपासून बनलेले वडे आणि भजे असायचे. लखनौच्या चाटला पांढला मटार चवदार बनवतो.
असे म्हणा की उकडलेल्या मटारमध्ये चटणी आणि चाट मसाल्यांच्या मदतीने युती सरकारसारखा चवतदार चाट द्रोणातून दिला जातो.
अमेरिकनने 'उसना तांदळा'ची रेसिपी दिली आणि भारतीय कामगारांनी यातून चाटचा आणखी एक पदार्थ बनवला
शेफ विनय सांगतात की ब्रिटिशांच्या काळात भारतात जसजसे औद्योगिकीकरण झाले, मजूर वर्गाचे पलायन कोलकात्याच्या बंदरांवर झाले.
म्हणून चवदार पदार्थांच्या कुटुंबात तांदूळ नवा सदस्य बनला आणि कोलकात्यात एका नव्या चाटचा जन्म झाला.
वास्तवात मिन्नेसोटात वनस्पतीशास्त्रज्ञ अक्झेंडर पिअर्स अँडरसन यांनी 1901 मध्ये 'उसना तांदळा'विषयी सांगितले. अक्झेंडर पिअर्स अँडरसन साहेब 20 व्या शतकाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आले आणि त्यांनी आपला काही वेळ बंगालमध्ये घालवला.
'उसना तांदूळ' त्यांच्या आहाराच्या सवयीत होता. तो दुसऱ्या लोकांनीही स्वीकारला. उकडलेल्या धानातून मुरमुरे बनवणे शिकले.
कोलकात्यात काम करणाऱ्या मजुरांत झाल-मूडी खूप लोकप्रिय झाली. विचार करा मजुरांचे आवडीचे स्नॅक्स आत पंचतारांकित हॉटेलमधील डेलिकसी बनले आहे.
मसाले मिसळत गेले, चाटचा ताफा वाढत गेला
चाटच्या इतक्या सर्व कथा इतिहास अभ्यासक सोहेल हाश्मींची ती गोष्ट योग्य ठरवतात की चाटच्या उत्पत्तीविषयी कोणतेही ठोस उत्तर देणे कठीण आहे. कारण देशाच्या प्रत्येक भागात उपलब्ध गोष्टींपासून बनलेले स्नॅक्स सायंकाळी एन्जॉय केले जाते. आणि हेच स्थानिक स्नॅक्स मिळून चाट कुटुंबाचे सदस्य बनत गेले.
मात्र, मुंबईतील भेल-पुरी, बंगालची झाल-मुडी, युपीतील सफेद मटार, दक्षिण भारतापासून दिल्लीला पोहोचलेले दही भल्ले, कांजी वडे, राजस्थानची पपडी सर्वांनी मिळून भारताला चाटच्या चवींचा देश बनवले आहे.
म्हणजेच चाटचा हा चवदार प्रवास सांगतो की मसाले मिसळत गेले आणि ताफा वाढत गेला.
ही बातमीही वाचा...
चैत्र नवरात्रीच्या उपवासासाठी टिप्स:पचनक्रिया सुधारेल, योग्य रितीने उपवास करणे गरजेचे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.