आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • My Father Persecuted Me For Another Woman, My Mother Sold Me To A Man Twice Her Age; What If I Don't Want To Run Away?

Sunday भावविश्व:वडिलांनी परस्त्रीसाठी माझा छळ केला, आईने दुप्पट वयाच्या माणसाला विकले; मी पळून जाऊ नको तर काय करू?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी कोल्हापूरची शिखा पवार. वय 18 वर्षे पुर्ण. माझ्या वडिलांनी दुसऱ्या महिलेसाठी माझा छळ केला, माझ्या खऱ्या आईने लग्नाच्या नावाखाली मला विकले. तेव्हा मी 16 वर्षांची होते, तर नवरदेवाचे वय दुप्पट होते. लग्नाच्या अर्धा तास आधी हे कळल्यावर मी आईला विचारले, तू काय करणार आहेस? आई म्हणाली की मी मजबूर आहे. मला ते नातं मान्य नव्हतं, पण तेव्हा माझ्याकडे लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे लग्नानंतर सासरच्या घरातून पळून जायचे असे ठरवले आणि दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींना चकमा देऊन मी पळून गेले.

आता मी माझी गोष्ट सांगते. माझे वडील मराठा आणि आई दलित. त्यांनी फक्त नववीपर्यंतच शिक्षण घेतले होते आणि ते मेकॅनिकचे काम करत असे. तर आई बीए पास, दिसायला सुंदर आणि चांगल्या कुटुंबातील होती. महाविद्यालयात समुपदेशक म्हणून काम केलेले. दोघांनी प्रेमविवाह केला होता. मला माहित नाही की, आईने माझ्या वडिलांमध्ये काय पाहिले आणि त्यांच्याशी लग्न केले. जेव्हा मी माझ्या आईबद्दल विचार करते, तेव्हा मला वाटते की, ज्या स्त्रिया प्रेम करतात त्या, मूर्ख असतात.

दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. वडिलांनी आईला घरात आणले तेव्हाच, आजीने विरोध केला. तुझी बायको दलित आहे, असे ती म्हणायची. समाज काय म्हणेल, लोक आम्हाला टोमणे मारतील. ती अनेकदा वडिलांना आईविरुद्ध भडकावायची. मात्र, वडिलांनी आईची बाजू घेत आजीला स्पष्टपणे सांगितले की, मी माझ्या पत्नीला घराबाहेर काढू शकत नाही. अशा रीतीने एक वर्ष भांडणात आणि संकटात गेले.

माझी आई कामावर जायची. आता आजीने माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला करायला सुरुवात केली. ती वडिलांना सांगू लागली की तुझी बायको इकडे तिकडे जाते. आज अमूक माणसासोबत बोलत होती, आज ती तमूक माणसाकडे बघून हसत होती. वास्तविक असे काहीही नसताना. पप्पांनी आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. यानंतर ते माझ्या आईशी भांडू लागले. वडिलांनीही आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हताश होऊन आईने ठरवले की, आता हे घर सोडायचे. तोपर्यंत माझा जन्म झाला. आईचे घर सोडण्याचा निर्णय घेतला वडिलांनी तिला समजावले आणि सांगितले की, आपण येथून वेगळे घर घेऊ. यानंतर ते आई आणि माझ्यासोबत घरातून निघून गेले. आता सगळं व्यवस्थित चाललं होतं. तीन वर्षे उलटून गेली, पण त्यानंतर आजूबाजूचे लोक पप्पाला टोमणे मारु लागले. ते म्हणू लागले की, म्हाताऱ्या आई-वडिलांना सोडून वेगळा राहतो, त्यांना एकटे सोडले.

टोमणे आणि समाजाच्या लाजेला कंटाळून माझ्या वडिलांनी ठरवले की, आपण आई-वडिलांच्या घरी जायचे. दरम्यान, मला एक भाऊही झाला होता. घरी आल्यावर आजीने आईवर नवा दोष द्यायला सुरुवात केली. ती अनेकदा म्हणायची हा मुलगा कोणाचा? याचा जन्म कसा झाला? या घाणेरड्या भांडणाला कंटाळून आईने ठरवले की, आपण घर सोडून दोन्ही मुलांसह दूर जाऊ. काही दिवसांनी ती मला आणि माझ्या भावाला घेवून माहेरी तिच्या वडिलांच्या घरी आली.

मला नेहमी वाटायचे की, यात आईपेक्षा माझ्या वडिलांचीच जास्त चूक आहे. त्यांनी ठरवले असते तर ते मला विक्री होण्या पासून वाचवू शकले असते, पण त्यांना माझी पर्वा नव्हती.
मला नेहमी वाटायचे की, यात आईपेक्षा माझ्या वडिलांचीच जास्त चूक आहे. त्यांनी ठरवले असते तर ते मला विक्री होण्या पासून वाचवू शकले असते, पण त्यांना माझी पर्वा नव्हती.

यानंतर वडील आईला परत घेण्यासाठी आले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना समजाऊन पाठवले होते की, मुले तुमची आहेत, तुम्ही त्यांना घेऊन या. मुलांसाठी तुमची पत्नीही तुमच्या मागे लागेल. इकडे आल्यानंतर त्यांनी आजोबांना सांगितले की, मी मुलांना घेऊन जात आहे. जर त्यांच्या मुलीला मुले हवी असतील तर तिला माझ्यासोबत चालावे लागेल आणि घरी राहावे लागेल. आई तयार नव्हती. यानंतर पप्पा आम्हा दोघांना घेऊन तेथून घरी आले.

त्यावेळी मी पाच वर्षांची होते आणि माझा भाऊ 9 महिन्यांचा होता. पप्पांनी आम्हाला आमच्या आत्याकडे सोपवले. आत्याचे आमच्यावर खूप प्रेम होते, पण आजी फक्त माझ्या भावावर प्रेम करत होती. ती त्याला आपल्या मांडीवर घ्यायची. कारण तो मुलगा होता. पप्पा आता घरी फारसे राहत नव्हते. रात्री फक्त थोडा वेळ यायचे. मी माझ्या वडिलांना सांगायचे की, मला माझी आई हवी आहे, तर ते म्हणायचे की, जर ती तुझी आई असेल तर ती इथे नक्कीच परत येईल.

एके दिवशी मी शाळेत होते. पप्पा मला घ्यायला आले आणि म्हणू लागले की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल तुला दाखवतो. ते मला शाळेजवळच्या एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले. मला वाटले पप्पांनी आमच्यासाठी नवीन घर घेतले असेल. तेच दाखवण्यासाठी मला घेऊन जात असतील. मी तिथे गेल्यावर एक बाई स्वयंपाक करताना दिसली.पप्पा मला म्हणाले आजपासून ही तुझी आई आहे. मला खूप राग आला आणि मी रडू लागलो. मला माझी आई हवी होती, दुसरी कोणतीही स्त्री नको होती.

मग मी विचार केला की, माझे वडील किती दिवस आईची वाट पाहतील. मी स्वतःला समजावले की मी माझ्या आत्यासोबत राहिल. थोडा वेळ बसून मी तिथून निघून आले. मी घरी जाऊन माझ्या आत्या आणि आजीला सांगितले की, माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांनी मला सांगितले की, तू काळजी करू नका. आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग बाबा कधीतरी घरी येऊ लागले. मी पण माझ्या भावासोबत वडिलांच्या घरी जायचे. ती बाई माझ्याशी व्यवस्थित बोलायची.

माझ्या आत्याने त्या महिलेला सांगितले होते की, माझा भाऊ तुझा नवरा नक्कीच आहे, पण तो या मुलांचा बापही आहे. त्यामुळे त्यांच्यापासून त्यांचे वडील हिरावून घेण्याचा विचारही करू नको. अशातच दोन वर्षे निघून गेली. आमच्यासाठी जे काही होते ते आमच्या आत्या होत्या. आत्याने खूप प्रेम दिलं, पण एक दिवस ती आजारी पडली. तिला कायम पोटदुखी असायची, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. आत्याची किडनी निकामी झाली आणि तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.

जर मी अवनी NGO मध्ये गेली नसते तर माझे काय झाले असते आणि मी कुठे असते हे मला माहीत नाही.
जर मी अवनी NGO मध्ये गेली नसते तर माझे काय झाले असते आणि मी कुठे असते हे मला माहीत नाही.

मला सर्वात जास्त त्रास झाला. रडून रडून माझी स्थिती खराब झाली होती. मला वाटलं आम्ही भाऊ-बहिणी रस्त्यावर आलो आहोत. आता आमचं काय होणार? आमची काळजी कोण घेणार? आम्हा भावा-बहिणींची अवस्था पाहून पप्पा आम्हाला सोबत घेऊन गेले. तिथे सावत्र आई आम्हांला व्यवस्थित खायला घालायची आणि आमची काळजी घ्यायची, पण तिसऱ्या दिवशी मी शाळेत जायला तयार होत असताना ती थकली असल्याचे तिने सांगितले. तसेच शाळेत जाण्यापूर्वी, मला काही काम करायला लावले.

मी मनात विचार केला की जेव्हा मी माझ्या आत्याला मदत करू शकते तर हिला देखील थोडी मदत करायला हवी. तीने घरातील सर्व भांडी बाहेर काढून ठेवली. मी सर्वकाही साफ केले. यानंतर दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडला. तिसर्‍या दिवशीही ती म्हणाली की, शाळेत जाण्यापूर्वी कपडे धुवून नंतर शाळेत जा. मी नकार दिला. मी म्हणाले की, मी अशीच कामे करत राहिले तर शाळेत कधी जाणार? मात्र तीने ऐकले नाही आणि उलट मलाच मारहाण केली. तीने मला झाडूने खूप मारले.

दुपारी पप्पा जेवायला आले तेव्हा विचारू लागले शाळेत का नाही गेली? यावर सावत्र आईने तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे आठ दिवस मी शाळेतच गेले नाही. हे सगळं वडिलांना कसं सांगावं मला संधीच मिळत नव्हती. मी एक पत्र लिहिले आणि माझ्या भावाने ते माझ्या वडिलांच्या खिशात ठेवले. बाबांनी ते पत्र वाचले. जेव्हा त्यांनी सावत्र आईला विचारले तेव्हा ती म्हणू लागली की, तिला आपल्या दोघांना वेगळे करायचे आहे. तीच्या आत्यालाही तेच हवे होते. त्या बाईने अशी नाटके केली की, पप्पा काहीच बोलू शकले नाही.

माझ्यासोबत इथे काय चाललंय हे आजीला माहीत होतं. त्यांनी कसा तरी माझ्या आईचा माग काढला. मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, शिखाला माझ्यासोबत एक दिवसासाठी पाठवा, मला एका ठिकाणी जायचे आहे, मी एकटी जाऊ शकत नाही. त्यानंतर मी आजीकडे आले. यानंतर आजी मला आईच्या घरी घेऊन गेली. आईला पाहून मला फारसा आनंद झाला नाही. कारण वडिलांनी नेहमीच आम्हाला आईच्या विरोधात भडकावले होते.

मी माझ्या आईला भेटले आणि तिचा फोन नंबर घेतला. मी मैञिणीच्या घरी जायचे आणि तिच्या आईच्या फोनवरून अधूनमधून आईला फोन करायचे. सावत्र आई आम्हाला कसा त्रास देतेय, हे मी तीला सांगायची. एके दिवशी आई म्हणाली तू माझ्याकडे ये. मी शाळेत गेले आणि थेट आईकडे धाव घेतली. यानंतर आईने वडिलांना फोन करून शिखा माझ्यासोबत आहे आणि आता इथेच राहणार असल्याचे सांगितले.

हे आहे अवनी. मी या NGO मध्ये राहते. हळू हळू माझ्या स्वप्नांना पंख मिळत आहेत. मी सीएची तयारी करत आहे आणि मला खात्री आहे की, मला यशही मिळेल.
हे आहे अवनी. मी या NGO मध्ये राहते. हळू हळू माझ्या स्वप्नांना पंख मिळत आहेत. मी सीएची तयारी करत आहे आणि मला खात्री आहे की, मला यशही मिळेल.

मी एक वर्ष माझ्या आईकडे राहिले. आईची एक मैत्रिण होती. त्यांच्या मुलाचे लग्न होत नव्हते. पण तो माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा होता. त्यांनी आईला सांगितले की, तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी कर, त्या बदल्यात मी तुला पैसे देईन. आईने माझ्या लग्नाला होकार दिला. करार निश्चित झाला, पण हे सर्व मला सांगितले नाही. माझ्या लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वीच मला याची माहिती मिळाली. काय करावं समजत नव्हतं.

माझे आईशी खूप भांडण झालं की तू माझ्यासोबत असं का केलस? तीने सांगितले की, माझ्याकडे दुसरा मार्ग नाही, मी एकटी आहे, असहाय आहे. माझ्या मावशीच्या मुलीने मला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली आईशी भांडून काहीही उपयोग नाही. लग्न तर करावेच लागेल. ती म्हणाली, तू लग्न कर, मी तुझ्या सासरच्या घरी सोबत येते. आणि तेथून तुला पळून जाण्यास मदत करते.

अशा प्रकारे माझे लग्न झाले. बोळवा म्हणून माझ्या मावशीची मुलगी माझ्यासोबत सासरी आली होती. आमच्याकडच्या प्रथेनुसार वधू-वर पाच दिवस एकत्र झोपत नाहीत. माझ्या लग्नाचा दुसराच दिवस होता. माझी सासू ब्युटी पार्लरमध्ये काम करायची, ती कामावर जायची आणि माझा नवराही त्याच्या कामाला जायचा. आम्हाला संधी मिळाली. माझ्या मावशीच्या मुलीने मला पैसे दिले आणि रिक्षा करून दिली. आणि मी तेथून पळ काढला.

मी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी गेले. त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की, शिखा आमच्या घरी आली आहे. पप्पा मला तिथून घेऊन गेले. मी त्यांना सांगितले की, मला लग्न करायचे नाही. माझे वडील आणि सावत्र आईने मला खूप मारले. एके दिवशी ते दोघे मला रात्रभर मारत होते. माझा भाऊ हे सर्व पाहत होता. काही दिवसांनी माझ्या भावाने मला काही पैसे दिले आणि सांगितले की चल इथून. त्याने मला एका शेतातून जाणारा रस्ता दाखवला आणि इथून पळून जाण्यास सांगितले.

तिथून निसटून मी थकून कोल्हापुरातल्या मंदिरासमोर बसले. तिथे कोणीतरी अवनी नावाच्या संस्थेला माझी माहिती देऊन बोलावले. मला या संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. आता मी एका वर्षापासून सीएची तयारी करत आहे. माझ्यासाठी पालक महत्त्वाचे नाहीत. माझे अजूनही माझ्या आईवर प्रेम आहे. ती असहाय होती, तिने मला विकले तरी चालेल, पण जेव्हा कोणी म्हणतो मी तुझा बाप आहे, तेव्हा मला राग येतो, जर माझ्या वडिलांनी माझी नीट काळजी घेतली असती तर मी माझ्या आईकडे गेले नसते आणि आईने मला विकले नसते. ते मला बेदम मारहाण करायचे, माझ्या सावत्र आईपासून मला वाचवण्याची जबाबदारीही त्यांचीच होती.

शिखाने भास्करच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्यासोबत शेअर केलेल्या भावना...

बातम्या आणखी आहेत...