आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Parents Became Teachers And Home Became School! Trying To Combine Experience, Knowledge And Skills While Avoiding Online Teaching

दिव्य मराठी विशेष:पालकच बनले शिक्षक अन् घराची झाली शाळा! ऑनलाइन शिकवणे टाळत अनुभव, ज्ञान, कौशल्याचा संगम घालण्याचा प्रयत्न

अनुप गाडगे | अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे शाळा बंद आहेत, पण अमरावतीच्या ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ने विद्यार्थ्यांच्या घरातच शाळा पोहोचवली आहे. त्यासाठी मुलांचे पालकच शिक्षक बनले आहेत आणि अभ्यासासोबत ते विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचेही धडे देत आहेत. शाळेने ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांनाच शिक्षक बनवले.

या संदर्भात शाश्वतचे संस्थापक अतुल गायगोले म्हणाले, “शाश्वत’ शाळेचा अनुभवावर आधारित अभ्यासक्रमावर भर आहे. कोरोनामुळे शाळेत वर्ग भरवायचे नाही, या निर्णयानंतर “शाश्वत’ने पालकांचा ऑनलाइन वर्कशाॅप घेतला. त्यात अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीचे पालकांचे प्रशिक्षण दिले. त्याच वेळी ‘शाश्वत अॅट होम’ ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार ‘घर हे विद्यापीठ व पालक हे खरे शिक्षक’ यावर शाळेने काम सुरू केले. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज एका ई-मेलद्वारे त्या दिवसाचा विषय आणि टास्क पाठवतात. विद्यार्थी मग पालकांच्या मदतीने त्यांचा दिवसभरातील ‘टास्क’ पूर्ण करतात, त्यातच त्यांचा अभ्यास होतो. दुसऱ्या दिवशी दिवसभर केलेल्या अभ्यासरूपी कामाची रूपरेषा शिक्षकांना ई-मेलद्वारे पाठवतात. विद्यार्थी शिक्षकांना थेट फोन करूनही अडचणी विचारू शकतो. तसेच एखाद्या वेळी विद्यार्थ्यांना, पालकांसोबत व्हिडिओद्वारे चर्चा केली जाते. रोज तसेच अभ्यासासाठी ऑनलाइन वर्ग होत नाहीत.

विजेची बचत हा धडा विद्यार्थी आापल्या घरातील विजेच्या मीटरचे रिडिंग, बचतीच्या प्रत्यक्ष उपाययोजना यातून शिकतात. विशेष म्हणजे, यात विद्यार्थ्यांनी कुटुंबाची शाळा घेतली व घरातील विजेचे बिलही कमी केले!

कुटुंब रंगलंय शिक्षणात :

विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे प्रश्न विचारला जातो. उदा: वायू प्रदूषण कुठे कमी आहे, घरात की घराबाहेर, तसेच सूर्यनमस्कार का करतात, त्याचे शास्त्रीय कारण काय, हे पटवून देण्यासाठी संबधित क्षेत्रातील तज्ञांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवले जातात. विद्यार्थी ही माहिती, शिक्षकांचे ई-मेल याद्वारे घरी प्रत्यक्ष कृतीतून शिकतात.

शिक्षणाचा श्रीगणेशा

ऑनलाइन शिक्षणातील अडचणींवर मात करत शाळा आणि शिक्षकांनी त्यांच्या पातळीवर वेगळे प्रयोग, उपाय, उपक्रम सुरू केले आहेत. बुद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या उत्सवानिमित्त असे ऑनलाइन शिक्षणाचे वेगळे आणि प्रेरणादायी प्रयोग आजपासून...

बातम्या आणखी आहेत...