आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरदेशात जाण्यासाठी पासपोर्टची तयारी करणाऱ्या भारतीयांसाठी ही खुशखबर आहे. लवकरच चिप असलेले ई-पासपाेर्ट उपलब्ध हाेऊ शकतात. त्यात पासपोर्टधारकाचा बायाेमेेट्रिक डेटा साठवलेला असेल. नव्या पासपाेर्टविषयी जाणून घेऊया..
चिप पासपोर्ट का दिले जाणार आहेत?
बनावट पासपोर्ट राेखणे आणि स्थलांतराची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना प्रगत स्वरूपाची सुरक्षा वैशिष्ट्ये असलेला चिपआधारित ई-पासपाेर्ट देण्याची याेजना आहे, असे परराष्ट्र विभागाकडून या मुद्द्यावर संसदेत स्पष्ट करण्यात आले हाेते.
या उपाययाेजनेमुळे छेडछाड राेखली जाईल?
हाेय. आतापर्यंत नागरिकांना मुद्रित बुकलेटवर पासपोर्ट दिला जाताे. त्याची नक्कल करणे सहज शक्य हाेते. परंतु नवीन तंत्रज्ञानयुक्त पासपाेर्ट आल्यानंतर फसवणूक करणे कठीण हाेईल.
काेणत्या केंद्रावर हे पासपोर्ट उपलब्ध हाेणार?
आतापर्यंत सरकारने याबाबतची माहिती जाहीर केली नाही. परंतु दिल्ली, चेन्नईमध्ये तासाला १० हजार ते २० हजार पासपोर्ट देण्याची साेय असलेले युनिट सुरू हाेतील. त्यानंतर ३६ पासपाेर्ट केंद्रांवर ई-पासपोर्ट उपलब्ध हाेऊ शकतील. यासंबंधात भारत सरकारचे नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर या प्रकल्पाबाबत परराष्ट्र मंत्रालयासाेबत काम करत आहे.
ई-पासपाेर्टची निर्मिती काेठे केली जात आहे?
केंद्र सरकारने चिपयुक्त इलेक्ट्राॅनिक काँटॅक्टलेस इनलेजच्या खरेदीसाठी इंडिया सिक्युरिटी प्रेस-आयएसपी नाशिकला परवानगी दिली आहे. नाशिकद्वारे टेंडर व खरेदी प्रक्रिया पूर्ण हाेताच ई-पासपाेर्ट तयार हाेऊ लागतील. त्याशिवाय परराष्ट्र मंत्रालयदेखील लवकरच याबाबत घाेषणा करू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.