आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Petrol Diesel May Become Cheaper In The Coming Days, OPEC Plus Countries Will Increase Crude Oil Production

दिलासा देणारी बातमी:आगामी काळात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, ओपेक प्लस देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर..

पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु केंद्र व राज्य सरकार आपले कर कमी करण्यास तयार नाही. या परिस्थितीत आता पुढील महिन्यात ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण ओपेक प्लस (OPEC) देशांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे.

ओपेक प्लस (इराक, कुवैत, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई)) देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्टपासून तेलाचा पुरवठा वाढविला जाईल, असा रविवारी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी यूएईने उत्पादन वाढवण्याची मागणी केली होती, त्यानंतर पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनेत वाद निर्माण झाला. यानंतर समूहाची बैठक तहकूब करण्यात आली होती.

ओपेक प्लस देशांनी ऑगस्टपासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास जवळपास राहिली आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. देशात लॉकडाऊन संपल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांची मागणी वाढत आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. 6 जुलै रोजी कच्च्या तेलाची बंद किंमत प्रति बॅरल 78 डॉलरपर्यंत पोहोचली.

10 मिलियन बॅरलमध्ये कपात

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ओपेक प्लस देशांनी गेल्या वर्षी दररोज 10 मिलियन बॅरेल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हळूहळू त्यात वाढ करण्यात आली. दररोज त्यात 5.8 मिलियन बॅरलने कपात केली होती. आजच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, ओपेक प्लस देश दरमहा दररोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवतील. याची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून होईल.

सध्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दर दिवशी 8 लाख बॅरल उत्पादन वाढेल. या हिशोबानुसार ऑक्टोबरमध्ये उत्पादन दररोज 12 लाख बॅरेल, नोव्हेंबरमध्ये दररोज 16 बॅरल तर डिसेंबरमध्ये दररोज 20 लाख बॅरल असेल. आज युएई आणि सौदी अरेबियामधील करारानंतरच उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या 1 वर्षात कच्चे तेल 43 हून 73 डॉलरवर आले
19 जुलै 2020 रोजी बेबी ऑईलची किंमत प्रति बॅरल 43 डॉलर इतकी होती पण उत्पादन कमी होत असल्याने आणि सतत मागणी वाढल्याने त्याच्या किंमतीत वाढ होत गेली. सध्या हा भाव 73 डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

आपण आपल्या गरजेच्या 85% आयात करतो
आपण आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त खनिज तेल बाहेरुन खरेदी करतो. त्यासाठी आपल्याला डॉलर्समध्ये पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या मजबुतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ लागतात. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल म्हणजे 159 लिटर तेल असते.

ऑगस्टमध्ये पेट्रोल-डिझेल 2 ते 3 रुपयांनी स्वस्त होऊ शकते
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) म्हणतात की, कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्यामुळे ऑगस्टमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल 65 डॉलरवर येऊ शकते. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 ते 3 रुपयांनी कमी होऊ शकतात.

21 राज्यांत पेट्रोल आणि 4 राज्यांत डिझेल 100 रुपयांची किंमत ओलांडली
देशातील 21 राज्यांत पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांवर पोहोचले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओरिसा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थान या सर्व राज्यात पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, चंडीगड, पश्चिम बंगाल, पुडुचेरी, त्रिपुरा, नागालँड आणि लडाख यासह ब-याच ठिकाणी पेट्रोलने 100 रुपये प्रति लीटरचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे डिझेलचा विचार केला तर ओरिसा, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात तो 100 रुपयांच्या वर गेला आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहरपेट्रोल (रुपये/लिटर)डिझेल (रुपये/लिटर)
श्रीगंगानगर113.21103.15
अनूपपुर112.78101.05
परभणी110.1398.18
भोपाळ110.2098.67
जयपूर108.7199.02
मुंबई107.8397.45
दिल्ली101.8489.87
बातम्या आणखी आहेत...