आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pfizer Moderna Johnson Johnson Vaccine India Availability Date | Foreign Coronavirus Covid 19 Vaccines Explained

एक्सप्लेनर:लवकरच आपल्याकडे असतील 8 लसींचे पर्याय, जाणून घ्या कोणकोणत्या परदेशी लसी कधीपर्यंत भारतात येऊ शकतात?

जयदेव सिंह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचा दावा आहे की, डिसेंबरपर्यंत देशात 216 कोटी लसींचे डोस उपलब्ध होतील.

जूनमध्ये पुन्हा एकदा लसीकरणाची गती वाढली आहे. माक्ष, अद्याप देशातील केवळ 15% लोकसंख्येला लसीचा एक डोस मिळाला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने अनेक परदेशी लसींवरील भारतातील ट्रायलची अट रद्द केली आहे. या निर्णयामुळे लसीकरणाची गती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, सरकारचा दावा आहे की, डिसेंबरपर्यंत देशात 216 कोटी लसींचे डोस उपलब्ध होतील. विशेष म्हणजे तेव्हा देशातील लोकांकडे 8 लसींचा पर्याय उपलब्ध असेल. सध्या देशात कोव्हॅक्सिन, कोव्हशिल्ड आणि स्पुतनिक-व्ही या लसींचा पर्यय उपलब्ध आहे.

DCGI च्या निर्णयाचा काय परिणाम होईल? कोणकोणत्या विदेशी लसी देशात येत आहेत? देशात या लसींची निर्मिती कोणती कंपनी करेल? कोणत्या विदेशी लस देशामध्ये कधीपर्यंत उपलब्ध होईल? याविषयी जाणून घेऊया सविस्तर…

देशात सध्या लसीकरणाची स्थिती काय आहे?

देशात सध्या केवळ दोन लस मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. यातील कोव्हॅक्सिन ही लस देशात तयार केली जात आहे. ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. तर ब्रिटनची ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट बनवत आहे.

डॉ. रेड्डीज लॅबद्वारे रशियन लस स्पुतनिक-व्हीची निर्मिती केली जात आहे. सध्या ही लस काही खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र लवकरच ही सर्वत्र उपलब्ध होईल असे बोलले जात आहे. ​​​​डीसीजीआयच्या निर्णयामुळे फायझर आणि मॉडर्ना या लसींना देशात प्रवेश करणे सोपे झाले आहे. देशातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल सांगायचे म्हणजे आतापर्यंत 25 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस दिले गेले आहेत.

कोणकोणत्या विदेशी लसी भारतात येऊ शकतात?
अमेरिकन नियामक USFDA, यूरोपियन संघाचे िनयामक EMA, यूके UK MHRA, जपान नियामक PMDA आणि WHO ने सूचीबद्ध केलेल्या आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लसींना भारतातील आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात येईल, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्या अमेरिकेत मॉडर्ना, फायझरसमवेत फक्त जॉन्सन अँड जॉन्सन या लसींनाना मंजुरी मिळाली आहे. तसेच युरोपियन युनियनमध्ये या तीन लसींसह अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. यूकेत फायझर, मॉडर्ना आणि अ‍ॅस्ट्राजेनेका या लसी देण्यात येत आहे. जपानमध्ये फक्त फायझर लसीला मान्यता मिळाली आहे. WHOने आतापर्यंत फक्त चार लस मंजूर केल्या आहेत - त्या म्हणजे फायझर, अ‍ॅस्ट्राजेनेका, सिनोफॉर्म आणि सिनोव्हॅक.

सद्य परिस्थितीत केवळ फायझर, मॉडर्ना, सिनोफॉर्म, सिनोव्हॅक आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींचा वापर आपल्याकडे केला जात नाहीये. या लसींना आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. मात्र, सिनोव्हॅक आणि सिनोफॉर्म या चीनी लसींच्या मंजुरीमध्ये अडथळे येऊ शकतात.

भारतात आलेल्या लसींची स्थिती काय आहे?
ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका ही देशात मंजूर होणारी पहिली परदेशी लस आहे. ज्याचा वापर भारतात कोविशिल्ड म्हणून केला जात आहे. ज्याची कार्यक्षमता 71% आहे. डब्ल्यूएचओ, यूके हेल्थ केअर बोर्ड, युरोपियन मेडिकल युनियनसह जगातील ब-याच देशांमध्ये या लसीला मान्यता देण्यात आली आहे. बर्‍याच देशांमध्ये ती कोविशिल्ड म्हणून विकली जात आहे आणि बर्‍याच ठिकाणी याच लसीला वॅक्सजेव्हेरिया या नावाने विकले जात आहे. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीची निर्मिती करत आहे.

रशियाची स्पुतनिक-व्ही कोविशिल्डनंतर भारतात मंजूर झालेली दुसरी परदेशी लस आहे. ऑगस्ट 2020 मध्ये आपत्कालीन वापरासाठी रशियाने स्पुतनिक-व्हीला मंजुरी दिली होती. कोरोनाविरूद्ध मंजूर झालेली ही जगातील पहिली लस आहे. भारतात यावर्षी ही लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.

या लसीची पहिली खेप मेच्या पहिल्या आठवड्यात भारतात पोहोचली. रेड्डीज लॅब ही भारतीय औषधी कंपनी देशात ही लस बनवत आहे. 15 मे रोजी हैदराबादमध्ये या लसीचा पहिला डोस दिला गेला. डॉ. रेड्डीजचे वरिष्ठ अधिकारी दीपक सपरा यांना प्रथम ही लस दिली गेली. जूनच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत या लसीमुळे लसीकरणाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डप्रमाणे ही देखील दोन डोसची लस आहे. याच्या दोन्ही डोसमध्ये दोन भिन्न व्हायरल वेक्टर आहेत.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये त्याची कार्यक्षमता 91.6% आहे. जे इतर वेक्टर आधारित पारंपारिक लसांपेक्षा बरेच चांगले आहे. तथापि, कोरोनाच्या कमकुवत ताटांवर ही लस अधिक प्रभावी आहे. रशियाची स्वतःची एकल-डोस लस स्पुतनिक लाइट देखील लवकरच भारतात मंजूर होऊ शकते. असे झाल्यास, भारतात वापरली जाणारी ही पहिली एकच डोस लस असेल.

कोणत्या लसी भारतात येतील

व्हॅक्सिनप्लॅटफॉर्मस्टेटस
फायजरmRNAअमेरिका, ब्रिटन, जपान, यूरोपियन यूनियनसह WHO कडून मान्यता, लवकरच भारतात येण्याची शक्यता
ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राजेनेकावेक्टरब्रिटन, यूरोपियन यूनियन आणि WHO कडून मान्यता, भारतात कोविशिल्ड या नावाने वापरात
मॉडर्ना ​​​​​​​mRNAअमेरिका, यूरोपियन यूनियन आणि WHO कडून मान्यता, लवकरच भारतात येण्याची शक्यता
जॉन्सन अँड जॉन्सनAd26 वेक्टर्डअमेरिका, यूरोपियन यूनियन, जुलैपर्यंत भारतात येण्याची शक्यता

वेक्टर ​​​​​​​​​​​​​​इन्स्टिट्यूट ​​​​​​​
प्रोटीन ​​​​​​​

रशिया, तुर्कमेनिस्तानमध्ये मंजुरी, मात्र भारतात येण्याची शक्यता नाही

​​इतर परदेशी लसी भारतात कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे?

फायजर-बायनटेक जगातील सर्वात मोठी लस आणि औषध उत्पादक कंपन्यांपैकी आहे. mRNA वर आधारित ही अमेरिकन लस लवकरच भारतात येऊ शकते. कंपनी भारत सरकारशी चर्चा करत आहे. ही लस जुलैपर्यंत भारतात येईल, अशी अपेक्षा आहे. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान या लसीचे पाच कोटी डोस भारतात येऊ शकतात.

नुकसान भरपाईच्या कलमाबाबत कंपनीसोबतचा करार अडकला आहे. कंपनीला या कलमावर सही करायची नाही. यानुसार, भविष्यात या लसीच्या कोणत्याही प्रतिकूल परिणामासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. मात्र, परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिकेच्या दौ-यानंतर ही चर्चा पुढे गेली. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की कंपनीबरोबरचा करार अंतिम टप्प्यात आहे. हे निश्चित होताच ऑगस्टपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकते.

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ब्राझील, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूर येथे फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. mRNA वर आधारित ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही देखील डबल डोस लस आहे. त्याच्या दोन डोसमध्ये 21 ते 28 दिवसांचे अंतर आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ही लस 12 ते 18 वर्षांच्या मुलांना देता येऊ शकते. जर ही लस भारतात आली तर मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

मॉडर्ना या लसीलाही मान्यता मिळू शकते
मॉडर्ना ही फायझर सारखी mRNA वर आधारित लस आहे. या लसीची जगभरात मागणी आहे. भारतीय औषधी कंपनी सिप्ला मॉडर्नासोबत भागीदारी करुन भारतात ही लस बनवू शकते. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला मॉडर्ना ही लस भारतात येण्याची शक्यता आहे. मॉडर्नाची कार्यक्षमता 94% आहे.

भारतात सर्वप्रथम जॉन्सन अँड जॉन्सन येऊ शकते
ज्या विदेशी लसींना भारतात मान्यता मिळू शकते, त्यापैकी जॉन्सन अँड जॉन्सन ही लस भारतात सर्वप्रथम उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने यासाठी हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल ई सोबत करार केला आहे. स्पूतनिक लाइट प्रमाणेच ही एका डोसची लस आहे. जॉन्सन अँड जॉन्सन ही लस चाचण्यांमध्ये 66% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. शासनाच्या निर्णयानंतर लवकरात लवकर उपलब्ध होणा-या लसींमध्ये या लसीचा समावेश असेल. बायोलॉजिकल ई कडे वार्षिक 60 कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे. अमेरिकेने अलीकडेच या लसीच्या वापरासाठी मान्यता दिली आहे.

चिनी लसींसंदर्भात अडचण काय?
डब्ल्यूएचओने 7 मे रोजी चीनी लस सिनोफॉर्मला मान्यता दिली. सुमारे एक महिन्यानंतर, आणखी एका चिनी लसीला मंजुरी मिळाली. सिनोव्हॅकला 1 जून रोजी डब्ल्यूएचओने मान्यता दिली होती. भारत सरकारने ज्या लसींना थेट मंजुरीसाठी मान्यता दिली, त्यात चीनचा समावेश नाही, मात्र डब्ल्यूएचओचा समावेश आहे. अशा परिस्थितीत भारत या दोन लसींना मंजुरी देतो की नाही, हे पहावे लागेल.

आणखी इतर कोणत्या लसी भारतात येण्याची शक्यता आहे का?
कोविशिल्ड बनवणारी सीरम संस्था अमेरिकन लस नोव्हाव्हॅक्सच्या प्रॉडक्शनच्या प्रयत्नात आहे. ही लस भारतात कोव्होवॅक्स या नावाने विकली जाईल. ही एक प्रोटीन सब्यूनिट लस आहे. वर्षाच्या अखेरीस ही भारतात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या लसीच्या चाचण्या देखील सुरू झाल्या.

परंतु, ही लस वापरण्यात एक पेच आहे. वास्तविक, अद्याप जगातील कोणत्याही देशात ही लस वापरण्यासाठी मंजूर झालेले नाही. जुलैपर्यंत या लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या क्लिनिकल चाचणीत या लसीची कार्यक्षमता 94.6% असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, चाचण्यांच्या नवीन निकालांमध्ये ही लस 90% प्रभावी असल्याचे म्हटले गेले आहे. ज्या प्रोटीन तंत्रज्ञानाद्वारे ही लस बनविली जाते तिला एक सुरक्षित तंत्रज्ञान मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...