आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:रांग स्वस्त धान्य दुकानासमोरची नव्हे, स्वॅब देण्यासाठीची...

रवी उबाळे | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड शहरातील आयटीआय काेविड सेंटरमध्ये फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा, प्रादुर्भाव वाढण्याची भीती

बीड शहरामध्ये मागील दाेन महिन्यांपासून सहवासित कारणाने काेराेनाबाधितांची संख्या वाढत आहे. ज्या भागात असे बाधित रुग्ण आहेत त्या भागातील लाेक व विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वॅब देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शहरातील एका आयटीआय काेविड सेंटरवर गुरुवारी (िद. २३) दुपारी स्वॅब देण्यासाठी माेठी गर्दी दिसून आली. परंतु ज्याप्रमाणे रेशन दुकानासमाेर रांगा लागतात त्याप्रमाणे फिजिकल िडस्टन्स न ठेवता माेठी रांग दिसून आली. विशेष म्हणजे येथे पाेलिस बंदाेबस्तही नसल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला.

जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. मात्र, काेराेनाबाधितांची साखळी ताेडण्यात नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने भीतिदायक परिस्थिती निर्माण हाेऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार गर्दी टाळावी, फिजिकल डिस्टन्स पाळण्यासह ताेंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, संचारबंदी िशथिलतेच्या काळातही शहरामधील बाजारपेठेत माेठी गर्दी हाेत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला केज येथील वर्ग एकचे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गेले, तसेच याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी असे दाेघे काेराेनाबाधित असल्याचे आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे कार्यालय बंद करून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना स्वॅब देण्याचे आदेशित केले आहे.

गर्दी नियंत्रित असावी

बीड शहरातील एका आयटीआय काेविड सेंटर येथे स्वॅब देण्यासाठी गुरुवारी माेठी गर्दी आढळून आली. अशी रांग न लावता कमीत कमी लाेकांना तसेच दाेन व्यक्तींमध्ये ५० फुटांपेक्षा अधिक अंतर असावे. व्यक्ती स्वॅब देऊन गेल्यानंतरच दुसऱ्याचा स्वॅब घ्यावा. सेंटर बाहेर सर्वांसाठी वेगवेगळी पार्किंग करावी, सेंटरच्या बाहेरपासून ते आत स्वॅब देण्याच्या ठिकाणापर्यंत संरक्षणासाठी बांबूचे कठडे असावेत म्हणजे एकच व्यक्ती थांबू शकेल, अशा अनेक सूचना नागरिकांनी केल्या.

जे बाधित नाहीत त्यांनाही धाेका

बीड शहरातील आयटीआय काेविड सेंटर येथे स्वॅब देण्यासाठी नागरिक येत आहेत. जे कदाचित सहवासित असलेले नागरिक असतील त्यांच्यामार्फत अन्य स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही कोरोना संसर्ग होण्याचा धाेका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गर्दीमध्ये जाऊन रांगेत थांबणेही माेठा धाेका आहे. याबाबत काटेकोर नियम पाळल्या जावे, अशा प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केल्या आहेत.