आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्याच्या मागे लपला आहे प्लॅनेट किलर:पृथ्वीसाठी सर्वात मोठा धोका, धडकल्यास डायनासोरप्रमाणे नष्ट होतील अनेक प्रजाती

लेखक: नीरज सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1.5 किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या मार्गात येणार आहे. हा इतका धोकादायक आहे की त्याच्या धडकेने पृथ्वीवरील सजीवसृष्टीच संपुष्टात येऊ शकते. सध्या तो सूर्याच्या मागे लपलेला आहे. गेल्या 8 वर्षांत, शास्त्रज्ञांना आढळलेल्या लघुग्रहांपैकी हा सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे त्याला प्लॅनेट किलर म्हटले जात आहे. त्याचे वैज्ञानिक नाव 2022 AP7 आहे. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या याच्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर...

प्रश्न-1: उल्कापिंड किंवा लघुग्रह म्हणजे काय?

उत्तर: लघुग्रह हे ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरणारे खडक आहेत. ते ग्रहांपेक्षा खूप लहान असतात. त्यांना प्लॅनेटॉइड किंवा क्षुद्रग्रह असेही म्हणतात. लघुग्रह कधीकधी ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात बांधले जाऊन त्यांचे चंद्र बनतात आणि त्यांच्याभोवती फिरू लागतात. गुरूच्या काही चंद्रांप्रमाणे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीदरम्यान लघुग्रहांची निर्मिती झाली. त्यांचा आकार इतका लहान असतो की त्यांच्यावर फारच कमी गुरुत्वाकर्षण असते. या कारणामुळे, त्यांचा आकार गोल नसतो किंवा त्यांच्यावर कोणतेही वातावरण नसते. कोणतेही दोन लघुग्रह सारखे नसतात. आत्तापर्यंत लाखो लघुग्रह सापडले आहेत, ज्यांचा आकार शेकडो किलोमीटरपासून ते काही मीटरपर्यंत आहे.

संशोधकांनी आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लघुग्रह शोधले आहेत.
संशोधकांनी आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लघुग्रह शोधले आहेत.

प्रश्न-2: ते पृथ्वीसाठी इतके धोकादायक का आहेत?

उत्तर: सर्व लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नसतात. कारण हे सर्व लघुग्रह पृथ्वीच्या मार्गात येत नाही. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीभोवती वेगवेगळ्या आकाराचे सुमारे 30,000 लघुग्रह आहेत.

यापैकी, एक किलोमीटरपेक्षा जास्त व्यासाचे 850 पेक्षा जास्त लघुग्रह आहेत. या सर्वांना निअर अर्थ ऑब्जेक्टस म्हणजेच पृथ्वीजवळील वस्तू म्हणतात. पुढील 100 वर्षांत यापैकी एकही पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत अचानक असा लघुग्रह सापडला तर तो त्याच्या आकारमानानुसार धोकादायक ठरतो.

प्रश्न-3: यापूर्वी पृथ्वीवर आदळले आहेत का?

उत्तरः बहुतेक लघुग्रह फारच लहान असतात आणि ते पृथ्वीवर आदळण्यापूर्वीच वातावरणातील घर्षणाने नष्ट होतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते. मात्र असे काही असेही असतात की ते पडल्याने अनेक मोठे खड्डे तयार झाले आहेत.

असे मानले जाते की कोट्यवधी वर्षांपूर्वी लघुग्रहांच्या धडकेमुळे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले होते. म्हणजेच, एका मोठ्या लघुग्रहाच्या धडकेमुळे, महाकाय डायनासोर नाहीसे होऊ शकतात तर मग दुसऱ्या अशाच एखाद्या धडकेने पृथ्वीवरील जीवन देखील नष्ट होऊ शकते.

महाराष्ट्र: लघुग्रह धडकल्याने लोणार सरोवर तयार झाले

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 5.70 लाख वर्षांपूर्वी लघुग्रह पडल्याने 490 फूट खोल खड्डा तयार झाला होता. ते लोणार विवर म्हणून ओळखले जाते. हे विवर 1.13 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. आता येथे एक सरोवर तयार झाले असून त्याला लोक लोणार सरोवर असे म्हणतात.

बुलढाणा जिल्ह्यात लघुग्रह कोसळल्याने बनलेले लोणार सरोवर.
बुलढाणा जिल्ह्यात लघुग्रह कोसळल्याने बनलेले लोणार सरोवर.

रशिया: तुंगुस्कामध्ये 8 कोटी झाडे नष्ट झाली

30 जून 1908 रोजी सायबेरियातील तुंगुस्कामध्ये एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्यापूर्वी जळून नष्ट झाला. त्यामुळे सुमारे 100 मीटरचा आगीचा गोळा तयार झाला. त्याच्या तडाख्यात सापडल्याने सुमारे आठ कोटी झाडे नष्ट झाली.

साइबेरियाच्या तुंगुस्कात लघुग्रह धडकल्याने झाडे नष्ट झाली.
साइबेरियाच्या तुंगुस्कात लघुग्रह धडकल्याने झाडे नष्ट झाली.

रशिया : चेल्याबिन्स्कमध्ये लघुग्रहाच्या शॉक वेव्हमुळे 1 लाख खिडक्यांच्या काचा फुटल्या

15 फेब्रुवारी 2013 रोजी, चेल्याबिन्स्क, रशिया येथे एक लघुग्रह आदळला. मात्र, पृथ्वीपासून 24 किलोमीटर अंतरावर तो नष्ट झाला. 5-मजली ​​इमारतीइतक्या मोठ्या (सुमारे 60 मीटर), या लघुग्रहामुळे 550-किलोटन स्फोटाइतकी मोठी शॉक वेव्ह निर्माण केली. यामुळे एक लाख खिडक्यांच्या काचा फुटल्या. यादरम्यान एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा येथे टाकलेला अणुबॉम्ब 15 किलोटनचा होता. म्हणजेच चेल्याबिन्स्कला धडकणारा लघुग्रह हिरोशिमापेक्षा 36 पट अधिक शक्तिशाली होता.

15 फेब्रुवारी 2013 मध्ये रशियाच्या चेल्याबिन्स्कमध्ये पृथ्वीकडे येणारा लघुग्रह.
15 फेब्रुवारी 2013 मध्ये रशियाच्या चेल्याबिन्स्कमध्ये पृथ्वीकडे येणारा लघुग्रह.

प्रश्न-4: शास्त्रज्ञांनी आता कोणता लघुग्रह शोधला आहे?

उत्तर: अनेक देशांतील शास्त्रज्ञांच्या चमूने सूर्याच्या मागे लपलेले 3 लघुग्रह शोधून काढले आहेत. यापैकी एक प्लॅनेट किलर आहे. हे अंतराळाच्या त्या प्रदेशात आहे जिथे सूर्य खूप तेजस्वीपणे चमकतो. या कारणामुळे तेथे काहीही पाहणे कठीण असते.

हा प्लॅनेट किलर लघुग्रह लॅटिन अमेरिकन देश चिलीच्या व्हिक्टर एम ब्लँको दुर्बिणीतील गडद पदार्थांच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणार्‍या हायटेक उपकरणांच्या मदतीने दिसला. तो पाहण्यासाठी शास्त्रज्ञांना दररोज सूर्यास्ताच्या वेळी फक्त 2 ते 10 मिनिटे मिळायची. फक्त या वेळी सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी व्हायची.

अनेक ऑब्झर्व्हेटरी म्हणजेच मोठी दुर्बिणी ऑपरेट करणाऱ्या अमेरिकन रिसर्च ग्रुप NOIRLab ने सांगितले की, हा लघुग्रह गेल्या 8 वर्षांत सापडलेला सर्वात मोठी खडकाळ वस्तू आहे. जो खूप धोकादायक आहे. हे संशोधन 31 ऑक्टोबर रोजी 'द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल'मध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रश्न-5: नवीन लघुग्रहाला प्लॅनेट किलर का म्हटले जात आहे?

उत्तरः वॉशिंग्टनमधील कार्नेगी इन्स्टिट्यूशन फॉर सायन्समधील अंतराळ शास्त्रज्ञ स्कॉट शेपर्ड हे या संशोधनाचे प्रमुख लेखक आहेत. शेपर्ड म्हणतात की 2022 AP7 चा मार्ग पृथ्वीच्या कक्षेतून जातो, ज्यामुळे तो एक धोकादायक किलर लघुग्रह बनतो.

प्रश्न-6: ​​हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे का?

उत्तरः स्कॉट शेपर्ड म्हणतात की तो पृथ्वीला धडकण्याचा धोका पुढील शतकापर्यंत राहील. त्यामुळे पुढील शतकापर्यंत त्याची धडक होण्याची शक्यता आहे. पण शेपर्ड म्हणतात की अनेक ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेळ बिघडू शकतो आणि अशा लघुग्रहांचा मार्ग बदलू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन सुरक्षिततेची हमी दिली जाऊ शकत नाही.

प्रश्न 7: पृथ्वीला धडकल्यास काय होईल?

उत्तरः अंतराळवीर स्कॉट शेपर्ड म्हणतात की जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचे भयंकर परिणाम होतील. शेपर्ड सांगतात की लघुग्रहाच्या धडकेमुळे तिथून इतकी धूळ उडेल की सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही. हळूहळू पृथ्वी इतकी थंड होईल की जगणे कठीण होईल.

प्रश्न 8: लघुग्रहाला पृथ्वीवर आदळण्यापासून रोखता येईल का?

उत्तर: होय. जर आपल्याला एखादा लघुग्रह अगोदरच सापडला तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मिळू शकतो. अशा लघुग्रहापासून वाचण्यासाठी त्याच्या दिशेने एखादे अंतराळयान पाठवले जाऊ शकते, जे त्याला आदळून अवकाशातच ते नष्ट करेल किंवा त्याचा मार्ग बदलेल. वेळ कमी पडल्यास या लघुग्रहावर बॉम्बही टाकला जाऊ शकतो.

DART अशा प्रकारे डाइमॉर्फस लघुग्रहाला धडकला होता.
DART अशा प्रकारे डाइमॉर्फस लघुग्रहाला धडकला होता.

सप्टेंबर 2022 च्या शेवटी, एक प्रयोग म्हणून, नासाने आपले अंतराळ यान DART म्हणजेच डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्टने लघुग्रहावर धडक दिली होती. या धडकेला प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट असे नाव देण्यात आले. याद्वारे शास्त्रज्ञांना पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या लघुग्रहांचा मार्ग भविष्यात कसा बदलता येईल याची चाचपणी करायची होती. हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.

बातम्या आणखी आहेत...