आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजे प्लास्टिक तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी वापरत आहात, तेच प्लास्टिक आता तुमच्या रक्ताचा भाग बनले आहे. हे ऐकून केवळ घाबरून चालणार नाही तर सतर्क होण्याचीही गरज आहे. नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम विद्यापीठाने केलेल्या रिसर्चमध्ये 80% लोकांच्या रक्तात प्लास्टिकचे कण असल्याचे आढळून आले आहे.
अशा स्थितीत आजच्या दिव्य मराठी इंडेप्थमध्ये जाणून घ्या, या संशोधनात कोणती आश्चर्यकारक बाब समोर आली आहे? मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय? मायक्रोप्लास्टिक्स आपल्या रक्तात कसे जातात? यामुळे आपल्या शरीराचे काय नुकसान होते? भारतात प्लास्टिकचे प्रदूषण किती मोठे आहे आणि ते हाताळण्यासाठी सरकारचे काय प्रयत्न आहेत?
संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली
नुकतेच अॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात 22 निरोगी लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता या रक्तदात्यांपैकी 17 जणांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळून आले. संशोधन करणार्या प्रोफेसर डिक वेथक यांनी सांगितले की, ते आणि त्यांची टीम या 22 लोकांच्या रक्तात 700 नॅनोमीटरपेक्षा मोठे सिंथेटिक पॉलिमरचा शोध घेत होते.
यादरम्यान त्यांना 17 जणांच्या रक्तात पॉलिथिलीन टेरेफ्थालेट आणि स्टायरीन पॉलिमरपासून बनलेले मायक्रोप्लास्टिक सापडले. मानवी रक्तात प्लास्टिक सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत आता हे संपूर्ण प्रकरण समजून घ्या, की तुमच्या शरीरात प्लास्टिक कसे पोहोचते.
पुढे जाण्यापूर्वी जाणून घेऊया मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
पर्यावरण आणि हवामानावर संशोधन करणाऱ्या जगातील सर्वोच्च संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक (NOAA) ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 5 मिलिमीटरपेक्षा छोटे म्हणजेच 0.2 इंच किंवा त्याहून लहान आकाराच्या प्लास्टिकच्या कणांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. मायक्रोचा अर्थ अतिशय लहान किंवा सूक्ष्म, म्हणूनच या सूक्ष्म कणाला मायक्रोप्लास्टिक असे नाव देण्यात आले आहे.
आता जाणून घेऊया, मायक्रोप्लास्टिक आपल्या रक्तात कसे जाते?
संशोधकाचे म्हणणे आहे की, प्लास्टिकचे कण अन्न, पेय आणि श्वासोच्छवासाच्या वेळी हवेतून आपल्या शरीरात पोहोचतात. हे छोटे प्लास्टिकचे कण हवेत तरंगत असतात आणि कधी कधी पावसातही ते पिण्याच्या पाण्यात मिसळतात. इतकंच नाही तर प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताना किंवा प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये खाद्यपदार्थ पॅक करताना मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरातील हृदयापर्यंत पोहोचतात.
आपण दररोज वापरत असलेल्या ब्रशद्वारे देखील ते शरीरात प्रवेश करतात. हेच कारण आहे की चाचणी दरम्यान, नमुन्याच्या रक्ताच्या प्रत्येक मिलीलीटरमध्ये 1.6 मायक्रोग्राम प्लास्टिक आढळले आहे. वर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशन 2019 च्या अहवालात असे समोर आले आहे की, प्रत्येक आठवड्यात प्लास्टिकचे सुमारे 2000 लहान कण अन्न किंवा श्वासाद्वारे मानवी शरीरात पोहोचतात.
जयपूरचे फोर्टिस हॉस्पिटल डॉक्टर दिवेश गोयल सांगतात की, आपल्या शरीरातील रक्तामध्ये दोन प्रकारचे मायक्रोप्लास्टिक आढळतात.
1. प्लॅस्टिकचे अत्यंत लहान कण अन्नाद्वारे आपल्या यकृतापर्यंत पोहोचतात. जिथून ते पचन प्रक्रियेद्वारे रक्तात प्रवेश करतात.
2. याशिवाय अनेक वेळा हवेतील प्लास्टिकचे कण श्वास घेताना आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. फुप्फुसात अडकल्यामुळे अनेकवेळा ते इथून रक्तात मिसळतात.
मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीराला कशाप्रकारे नुकसान पोहोचवते?
मनुष्य दरवर्षी सुमारे 1,04,000 मायक्रोप्लास्टिक कण गिळतो. मायक्रोप्लास्टिकचे अनेक धोके आहेत. डॉक्टर दिवेश गोयल यांच्यानुसार, यामुळे शरीरात प्रामुख्याने तीन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात-
1. प्लास्टिक बनवण्यासाठी बिस्फेनॉल-ए (BPA) हे रसायन वापरले जाते, जे मायक्रोप्लास्टिकमध्ये आढळते. त्यामुळे भविष्यात कर्करोगाचा धोका वाढतो.
2. रक्तामध्ये प्लास्टिकचे कण मिसळल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
3. मायक्रोप्लास्टिकमुळे आपले यकृत आणि मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते.
प्लास्टिक म्हणजे काय, ते केव्हा बनवले गेले आणि आता ही चिंतेची बाब का आहे?
कोळसा आणि तेल मिसळून प्लास्टिक बनवलं जातं असा सर्वसाधारण समज आहे. बर्याच अंशी हे खरे देखील आहे. परंतु प्रथमच प्लास्टिक बनवण्यासाठी कोणती दोन रसायने एकत्र मिसळली गेली, आज त्यांची नावे जाणून घ्या.
सुमारे 100 वर्षांपूर्वी, बेल्जियममध्ये जन्मलेले शास्त्रज्ञ लिओ बेकेलँड यांनी फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड नावाची दोन रसायने मिसळून एक पदार्थ तयार केला, ज्याला बॅकलाईट नाव देण्यात आले. या बॅकलाईटलाचा सर्वात पहिले प्लास्टिक किंवा सिंथेटिक प्लास्टिक म्हटले गेले.
प्लास्टिकची समस्या ही आहे की, ते जैवविघटनशील नाही. हे कागद किंवा अन्नासारखे विघटित होत नाही, म्हणून ते शेकडो वर्षे वातावरणात राहतात.
10 हजार लाख हत्तींएवढे प्लास्टिक आतापर्यंत तयार झाले
मानवाने 1950 पासून 8.25 लाख कोटी किलोग्रॅमपेक्षा जास्त प्लास्टिकचे उत्पादन केले आहे. सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास सुमारे 10 हजार लाख हत्तींच्या वजनाएवढे प्लास्टिक आपण बनवले आहे. प्लॅस्टिकचा वापर ज्या गतीने वाढत आहे, ते पाहता हा आकडा 2050 पर्यंत 12.02 लाख कोटी किलोपर्यंत पोहोचू शकतो असे अहवालात म्हटले आहे.
रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (RMIT) आणि हैनान युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेवर आधारित अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्लास्टिकचे सूक्ष्म आणि दूषित केमिकलचे 12.5% कण माशांपर्यंत पोहोचतात. मासे ते अन्न म्हणून गिळतात, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते आणि मरतातही.
शास्त्रज्ञांना उत्तर फुलमारच्या समुद्री पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये 47% पर्यंत मायक्रोप्लास्टिक कण आढळले आहेत. कासव आणि इतर समुद्री जीव देखील मायक्रोप्लास्टिकच्या प्रभावापासून सुटलेले नाहीत.
भारतातील प्लास्टिक समस्या आणि त्यावर उपाय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.