आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Narendra Modi; Coronavirus News | PM Narendra Modi Targeted By France Media Le Monde, And The Guardian New York Times

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर परदेशी मीडियाचे मत:पंतप्रधानांच्या अहंकारामुळे भारतात भयावह परिस्थिती, लिहिले - लस निर्यातीचा उदोउदो केला, परंतु स्वतःच्या उत्पादन क्षमतेची मर्यादाच ओळखली नाही

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणूून घ्या परदेशीत मीडियात मोदी सरकारविषयी काय लिहिले जात आहे...

'राजकारणाच्या काळोखात भारताचा आत्मा हरवला' - द गार्डियन

'भारतीय मतदारांनी एक लांब आणि भयावह स्वप्न निवडले'- द न्यूयॉर्क टाइम्स

मे 2019 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा दुस-यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी परदेशी मीडियात या मथळ्यांनी बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. जगातील आघाडीच्या मीडिया हाऊसेसनी नरेंद्र मोदींचा विजय असा शब्दबद्ध केला होता. आता बरोबर दोन वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये जेव्हा कोरोनाच्या दुस-या लाटेत मोदी सरकारची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले, तेव्हा परदेशी माध्यमांना पुन्हा एकदा सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. ताजे उदाहरण फ्रान्सच्या 'ले मोंडे' (Le Monde) या वृत्तपत्राचे आहे. या वृत्तपत्राने मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये देशाच्या केंद्र सरकारसाठी काय लिहिले आहे ते काही मुद्द्यांमधून जाणून घेऊया…

  • दररोज 3.5 लाख नवीन कोरोना रुग्ण आणि 2000 हून अधिक मृत्यू. भयानक विषाणूमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु यामागे भारतीय पंतप्रधानांचा अहंकार, निर्दयीपणा आणि दुर्बल नियोजन देखील तेवढेच कारणीभूत आहे.
  • जगभरात लसीची निर्यात करणार म्हणून स्वतःचा उदोउदो केला. तीन महिन्यांनतर मात्र स्वतः भारताला भयावह परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
  • भारतातील परिस्थिती नियंत्रणात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची गरज भारताला आहे. 2020 मध्ये अचानक लॉकडाउन झाला आणि लाखो स्थलांतरीत कामगारांना शहर सोडावे लागले. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी यंत्रणेला टाळा ठोकला मात्र 2021 च्या सुरुवातीस सर्व सुरु केले.

हर्ड इम्युनिटी 2023 पर्यंत अशक्य
वैद्यकीय यंत्रणेवर भाषणे दिली गेली. जनतेचे रक्षण करण्याऐवजी तेथे अनावश्यक उत्सव साजरे करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी परिस्थिती आणखी बिकट केली. राज्यांच्या निवडणुकींसाठी प्रचार सभा घेण्यात आला. विना मास्क हजारोंच्या समुदायाला संबोधित केले गेले. कुंभमेळ्यांना परवानगी देण्यात आली. लाखो लोकांची गर्दी जमली आणि हेच कोरोनाचे हॉटस्पॉट बनले.

पंतप्रधान मोदींचे सर्वांना लस देण्याचे लक्ष्य आहे, परंतु त्यांना स्वतःच्या देशातील लसीची उत्पादन क्षमताच माहिती नाही. जिथे राजकीय लाभ दिसला, तिथे लसीकरणाला प्राधान्य दिले गेले. याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत केवळ 10% लोकांना ही लस मिळाली आहे. म्हणजेच, हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यासाठी आवश्यक लसीकरण 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकत नाही.

हे महाकाय संकट पाहता एकता दाखवण्याची वेळ आली आहे. यावेळी पुन्हा एकदा भारतात दारिद्र्यरेषेखाली आलेल्या कोट्यावधी लोकांचे दुःख कमी करण्यासाठी हे सर्व केले पाहिजे. अमेरिका, युरोप, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

इतर जागतिक माध्यमांनीदेखील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे...

बातम्या आणखी आहेत...