आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरपॉर्न अ‍ॅडिक्टचा 10 वर्षीय मुलीवर बलात्कार:भारतात बंदी असूनही पॉर्न फिल्म्सच्या व्यसनात वाढ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 नोव्हेंबर 2022 रोजी छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. आरोपी मुलाला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, त्याला अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन होते. या घटनेच्या चार दिवसांनंतर 30 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला.

येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. या दोन घटनांपासून या चर्चेला जोर आला आहे की, पोर्नोग्राफी व्हिडिओंमुळे बलात्कार आणि लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का?

अशा परिस्थितीत दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही माहिती देणार आहोत की, भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची बाजारपेठ किती मोठी आहे, पॉर्न साइट्सवर बंदी घातल्यानंतरही लोक सहजपणे पॉर्न कसे पाहतात?

आता बातमीमध्ये पुढे जाण्यापूर्वी, ग्राफिक्समध्ये जाणून घ्या की पॉर्न अ‍ॅडिक्ट म्हणजे काय…

पॉर्न कंटेंटवर बंदी घालण्यात भारत सरकार कितपत यशस्वी झाले?

2017 ते 2018 दरम्यान भारतातील पॉर्न पाहण्याचे प्रमाण 75% ने वाढले आहे. छोट्या शहरातील लोक मोठ्या संख्येने ते पाहत आहेत. यामुळेच 2018 मध्येच भारत सरकारने जवळपास 850 पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातली होती.

याशिवाय 29 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने 67 पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर बंदी घातली होती. असे असूनही इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सहज उपलब्ध आहेत. याची 3 प्रमुख कारणे आहेत-

1. या पॉर्न वेबसाइट नवीन डोमेनसह बाजारात येतात.

2. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच VPN द्वारे लोक प्रतिबंधित वेबसाइट्स सहज उघडू शकतात. वास्तविक, VPN एक खासगी नेटवर्क आहे, ज्याद्वारे कोणत्याही वेबसाइटवर सहज प्रवेश केला जाऊ शकतो.

3. टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोर्न व्हिडिओ सहज शेअर केले जातात.

भारतात झपाट्याने वाढतेय पॉर्न व्हिडिओंची बाजारपेठ

2026 पर्यंत मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या 1200 दशलक्ष होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर जगातील टॉप वेबसाइट 'पॉर्न हब'ने सांगितले आहे की, सरासरी भारतीय एका वेळी पॉर्न वेबसाइटवर 8 मिनिटे 39 सेकंद घालवतो. इतकेच नाही तर पॉर्न पाहणारे 44% युजर्स 18 ते 24 वयोगटातील आहेत, तर 41% वापरकर्ते 25 ते 34 वयोगटातील आहेत.

गुगलने 2021 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, पॉर्न हब वेबसाइटनुसार, या वेबसाइटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारतीय तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

2019 मध्ये, भारतातील 89% मोबाईल फोन वापरकर्त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एकदा पॉर्न पाहिला होता. मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनी डेलॉयटने आपल्या अहवालात सांगितले आहे की, भारतात सध्या 750 दशलक्ष मोबाईल फोन वापरकर्ते आहेत.

भारतात ऑनलाइन पॉर्न कंटेंट मार्केट किती वेगाने वाढत आहे याचा अंदाज या आकडेवारीवरून लावता येतो.

आता ग्राफिक्समध्ये पाहा पॉर्नोग्राफी पाहण्याच्या बाबतीत जगातील टॉप 10 देश कोणते आहेत…

पॉर्न व्हिडिओ पाहणे भारतात कायदेशीर आहे की बेकायदेशीर?

ऑनलाइन पॉर्न पाहणे भारतात बेकायदेशीर नाही, परंतु 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याने पॉर्न व्हिडिओ बनवणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करणे यावर बंदी घातली आहे. पोर्नोग्राफीमुळे समाजात गुन्हेगारी वाढू नये, यासाठी सरकारने कायदेही केले आहेत.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 आणि 67A मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये दोषींना 3 वर्षांच्या तुरुंगवासासह 5 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

याशिवाय संबंधित गुन्हे रोखण्यासाठी आयपीसीच्या कलम-292,293, 500, 506 मध्ये कायदेशीर तरतुदीही करण्यात आल्या आहेत. याशिवाय चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित प्रकरणात POCSO कायद्यांतर्गतही कारवाई केली जाते.

पोर्नोग्राफी व्हिडीओमुळे गुन्हे वाढत नाहीत तर कमी होतात: रिसर्च

इंटरनेटवर पोर्नोग्राफीच्या सहज उपलब्धतेमुळे लैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत हे जागतिक नेते आणि इतर जबाबदार लोक सामान्यतः मानत आहेत. त्यांच्या मते, 1990 च्या दशकात इंटरनेटवर 'X' श्रेणीतील कंटेंटचा महापूर आला होता. तेव्हापासून लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.

त्याच वेळी, संशोधन असे मानण्यास नकार देते. सायकॉलॉजी टुडेच्या अहवालानुसार, 1995 च्या तुलनेत 2016 मध्ये यूएसमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये 44% घट झाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाने लॉस एंजेलिसमध्ये एक सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना आढळून आले की, लैंगिक छळाचा आरोप असलेल्यांपेक्षा सर्वसामान्य लोक जास्त पॉर्नोग्राफी पाहतात.

त्याचवेळी सायकोलॉजी टुडेने आपल्या अहवालात सांगितले आहे की, पॉर्न व्हिडिओ पुरुषांना लैंगिक हिंसाचारासाठी प्रवृत्त करत नाहीत तर सेफ्टी व्हॉल्व्हसारखे काम करतात. याचे कारण पुरुष व्हिडिओ पाहून हस्तमैथुन करतात. त्यामुळे महिलांवर अत्याचार होण्याची शक्यता कमी होते.

पोर्नोग्राफी सहज उपलब्ध झाल्यामुळे अनेक देशांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

पोर्नोग्राफीमुळे पुरुषांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढते : तज्ज्ञ

पोर्नोग्राफी पाहण्याने पुरुषांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढते किंवा कमी होते, आता जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत आणि याबाबत संशोधन…

  • भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रोफेसर डॉ. प्रतीक शर्मा सांगतात की, पॉर्न व्हिडिओ पाहून लैंगिक आक्रमकता वाढते. व्हिडीओमध्‍ये तो जे काही पाहतो त्याला तेच करायचे असते. व्यक्तिमत्व विकार असलेल्या अशा लोकांना अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, आणि यातून अशा प्रकारच्या घटना घडतात.
  • तर दुसरीकडे, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील कायद्याचे प्राध्यापक अँथनी डीअमाटो यांनी सांगितले की, इंटरनेटवर पोर्नोग्राफी सामग्री सहज उपलब्ध न झाल्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये 53% वाढ झाली आहे. त्याच वेळी, ज्या ठिकाणी पोर्नोग्राफी पाहणे सोपे होते तेथे लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 27% घट झाली आहे.
  • 'द कॉन्व्हर्सेशन'ने आपल्या अहवालात पोर्नोग्राफीचा लैंगिक हिंसाचाराशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. संशोधनात असे काहीही आढळले नाही ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की, पॉर्नमुळे लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...