आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उत्सव:भारत-पाक सीमेलगत घुमताेय ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष, समुद्रसपाटीपासून 12 हजार मीटर उंचीवर ठिकाणी बसवला गणपती

सचिन जैन | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मू-कश्मीर येथील गुरेज सेक्टरमध्ये गणेशाेत्सव

कार्याचा आरंभ मानल्या जाणाऱ्या गणेशाची कीर्ती अवघ्या जगभरात विस्तारलेली आहे. त्यामुळे गणेशाचे भक्त जगाच्या कानाकाेपऱ्यात माेठ्या भक्तिभावाने गणेशाेत्सव साजरा करतात. याला कुठल्याही सीमेची मर्यादा नाही. याचाच प्रत्यय भारत-पाकिस्तान सीमेवरील गणेशाेत्सवातून येत आहे. भारत-पाकिस्तानची सीमा अवघ्या २० किलाेमीटरवर असलेल्या व समुद्रसपाटीपासून १२००० मीटर उंचीवरील जम्मू-कश्मीर येथील गुरेज सेक्टर परिसरातील गणपती मंदिरात गणेशाेत्सवाची वेगळीच धूम आहे. विशेष म्हणजे गणरायाची आराधना केल्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानाकडून ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष केला जाताे.

भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-कश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठच्या श्रींच्या मूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना करत मंदिर साकारले हाेते.

ड्यूटीसह आरतीमध्ये सहभाग

गणेशाेत्सव असल्याने या मंदिरातही दहा दिवसांसाठी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मराठा बटालियनचे कमांडिग ऑफिसर कर्नल विनाेद पाटील यांच्या पुढाकारातून या ठिकाणी मंदिर साकारण्यात आले असून या ठिकाणी राेज पूजा-आरती करतात. सकाळी व सांयकाळी सैन्यदलाचे जवान आरती करतात. कर्तव्य निभावत असताना लाडक्या गणरायाची आराधना करण्याची संधी यामुळे जवानांना मिळते.