आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाकाळ सुरू आहे. शाळा बंद आहेत. मुले आजही घरांतून खूप कमी वेळा बाहेर पडतात. यामुळे त्यांच्या क्षमता, पात्रता वाढवणे आई-वडिलांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही. मानसोपचारतज्ज्ञांना वाटते की मुलांनी नवनव्या कामांत कौशल्य मिळवावे. यात पालक त्यांची मदत करू शकतात. उदा. केसांना डाय लावणे, किचनमध्ये भांडी लावणे, झाडू मारणे, फोन करून पॅक्ड फूड बोलावणे किंवा वायफाय बूस्टर सेट करणे आदी. ही लहानसहान कामे तुम्ही स्वत:ही करू शकता. मात्र मुलांकडून ही कामे करवून घेतल्याने मुलांचे मानसिक आरोग्य चांगले होते. त्यांना वाटते की ते उपयोगी आहेत आणि काेणतेही काम यशस्वीपणे करू शकतात.
मात्र अशी छोटी छोटी कामे केल्यामुळे मुलांमध्ये चांगले बनण्याची भावना तयार होईल का? तज्ज्ञांचे मत आहे की, मुलांना प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांशी दोन हात करू देणे त्यांची क्षमता आणि पात्रता वाढवते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सायकॉलॉजिस्ट अल्बर्ट बांदुरा या त्याला सर्वश्रेष्ठ अनुभव संबोधतात. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमध्ये पॉझिटिव्ह सायकॉलॉजीच्या प्रो. ली वाॅटर्स म्हणतात, ‘ही मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम करण्याची सुरुवात आहे. कारण की, विश्वासाविना की मी कोणतेही काम चांगले करू शकतो, एखादे मूलच नव्हे तर वयस्क व्यक्तीही आत्मविश्वास गमावून देते. क्षमतेत कमतरता आणि हतबलतेमुळे चिंता, डिप्रेशन, उमेद आणि प्रेरणेत कमतरता दिसून येते. दुसरीकडे चांगली क्षमता वा उत्पादकतेतून समाधान, आत्मविश्वास, सामाजिक आपुलकी आणि अशा प्रकारच्या मानसिक स्थिती आढळतात.’
डॉ. वॉटर्स यांच्या सल्ल्यानुसार, ‘त्यांची कामे ओळखा आणि मान्यता द्या. या प्रशंसा मुलांसाठी बँक अकाउंटचे काम करतात.’
झोप, जेवणे, वागणुकीत बदल झाला तर मदत करावी
चाइल्ड अँड अॅडॉलसंट सायकोथेरपिस्ट कॅटी हर्ले म्हणाल्या, ‘तुम्ही मुलांवर जास्त जबाबदाऱ्या टाकणार नाही की ज्या ते सांभाळू शकणार नाहीत. प्रत्येक मूल एक-दुसऱ्यापेक्षा वेगळे असते. मुलांमध्ये झोप, जेवणे, मित्रांना भेटणे, वागणुकीत बदल झाला तर त्यांना मदत करा.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.