आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशांत किशोर म्हणजेच PK यांना बहुतांश लोक ओळखतात. खासकरून ते जे राजकारण करतात, सोबतच तेही, जे त्या राजकारणाला पाहतात, ऐकतात, गुणगुणतात आणि अभ्यास करतात. आम्ही त्याच प्रशांत यांच्याशी गप्पा मारल्या, त्याही भरपूर...
अनेक मुद्द्यावर- त्यांच्याबद्दल, त्यांचे प्रोफेशनल कामकाज आणि त्यांची समज, त्यांनी घातलेल्या पांढऱ्या कुर्ता-पायजाम्यावर, जे नितीश यांचे गिफ्ट आहे. मोदींचे वैशिष्ट्य आणि क्षमतेवर, विरोधकांच्या निरागसतेवर... आणि पुढच्या 35 दिवसांत, म्हणजेच 2 मेच्या आधी ते आपल्या कोणत्या रहस्यावरून पडदा उठवणार आहेत, त्यावरही...
या गप्पा जवळपास दोन तास चालल्या. थोड्या दीर्घच झाल्या ना... पण जर योग्य वाटले तर पाहा, ऐका आणि वाचा. आता येथे प्रशांत 22 प्रश्नांसोबत आहेत. मंगळवारी आणि एक खेप येईल, काही रंजक बाबींची.
तर चला… आळीपाळीने प्रशांत, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या उत्तरांच्या वळणावर…
गप्पा जवळपास दोन तासांच्या आहेत, व्हिडिओसहित पूर्ण गप्पांमधून जायचे असेल तर यूट्यूबवरही जाऊ शकतात.
सध्याच्या राजकारणावर PKचा व्ह्यू :
प्रश्न : तेलंगानचे CM के. चंद्रशेखर राव म्हणाले की, ‘राष्ट्रीय बदला’साठी त्यांची तुमच्याशी चर्चा सुरू आहे. KCR सोबत मिळून तुम्हाला काय बदल आणायचा आहे?
उत्तर : हे खरे आहे की, माझी केसीआरसोबत चर्चा होत राहते. सध्याही होत आहे, पण हा कोणत्याही कराराचा भाग नाही. अशी कोणतीही ठरलेली गोष्ट नाही की, जी उद्या करायची आहे. मी माझे जुने काम सोडण्याविषयी आधीच म्हटलो आहे. त्या भूमिकेत मी आता नाही आणि राहणारही नाही.
प्रश्न : मग या भेटीकडे भारतीय राजकारणातील तुमची भावी भूमिका म्हणून बघायला नको का?
उत्तरः राजकारणाशी किंवा माझ्या पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या कोणाचीही काहीही भूमिका असू शकते, परंतु आजपर्यंत माझी केसीआरशी कोणतीही डिफाइंड अरेंजमेंट नाही. मी ममताजींसोबत बसलो, तर तुम्ही विचाराल की, काय बोलणे झाले? यावर मी हेच सांगेन की, देशाच्या राजकारणावर त्यांच्याशी बोलत होतो.
प्रश्न: मग याचा दुसरा राजकीय अन्वयार्थ नाही का? तुमचे स्पष्टीकरण…
उत्तरः मी फॅक्ट सांगत आहे. मी आणि केसीआर यांच्यात संवाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांत मीही अनेकदा भेटलो. बोललोही. साहजिकच त्यांना कोणीतरी विचारले की, यात तेलंगणाचा समावेश आहे का नाही, तर त्यांनी समर्पक उत्तर दिले की, भाऊ, संपूर्ण देशाची चर्चा होत असताना त्यातही तेलंगणाची चर्चा होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मी 2 मे 2021 ला सांगितले होते की मी ज्या भूमिकेत पूर्वी लोकांसोबत, पक्षांसोबत काम करायचो त्या भूमिकेत तुम्ही मला यापुढे काम करताना पाहणार नाहीत. याचा अर्थ मी राजकारण सोडेन किंवा राजकीय लोकांना भेटेन किंवा राजकारणात काहीही करेन असा नाही, पण यापुढे मी त्या भूमिकेत कोणासोबतही काम करणार नाही.
प्रश्न : नवीन भूमिका काय असेल?
उत्तरः नवीन भूमिकेबद्दल माझी 100% स्पष्टता नाही. माझ्या मनात काहीतरी आहे. कल्पनाही आहेत की, हे करता येईल, ते करता येईल. पण मी अजून ते पूर्णपणे ठरवलेले नाही.
प्रश्न : इतके तर स्पष्ट आहे की, राजकारणातच राहणार?
उत्तर : मी राजकीय क्षेत्रात राहणे बर्याच प्रमाणात शक्य आहे. कदाचित मी राजकारणात जाईन. कदाचित नाही. आतापर्यंत मी काहीही ठरवले नाही. मी गेल्या वर्षी 2 मे रोजी ही घोषणा केली होती. त्यामुळे या वर्षी 2 मेपर्यंत काहीतरी निर्णय घ्यावा, असा विचार आहे.
प्रश्न: 2022, 23 आणि 24. 2024च्या दृष्टीनेही ही तीन वर्षे महत्त्वाची आहेत. 2022 मध्ये गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका आहेत. 2023 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आता जेवढे पक्ष आहेत, ते सर्व मिळून 2024 मध्ये भाजपला आव्हान देऊ शकतील का?
उत्तर: विरोधक एकसंध असतानाही खूप कमकुवत असू शकतात आणि असे अनेक संदर्भ आहेत जिथे विरोधक एकत्र नसले तरी खूप मजबूत असू शकतात, तर या दोन गोष्टी सारख्या नाहीत.
प्रथमत: सर्व एकत्र येणेच खूप कठीण आहे, कारण पक्षांचे आपसांत स्पर्धात्मक हितसंबंध आहेत. सगळे एकत्र येतील, हे शक्य नाही. युनायटेड ऑपॉझिशनबद्दल बोलणारे बहुतेक लोक तुम्ही पाहिले असतील, त्यांना वाटते की भाऊ माझ्या राज्यात माझ्यावर लागू नये, बाकी पूर्ण देशात एकजूट व्हावे.
समजा तुम्ही सपा असाल, तर तुम्हाला यूपीमध्ये स्वत:च लढायला आवडेल. तुम्ही RJD मध्ये असाल, तर RJD ने बिहारमध्ये लढावे असे त्यांना वाटते. तिथे ते विरोधी ऐक्याबद्दल तितक्या जोमाने बोलत नाहीत. विरोधी ऐक्यामध्ये ही अडचण आहे. मी याच्या बाजूने नाही. माझी समजूत अशी आहे की अनेक राज्यांमध्ये एकसंध विरोध हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु प्रत्येक राज्यात ते जरूरी नाही.
ही जी महाआघाडीची संकल्पना आहे, त्याची सुरुवात 2015 मध्ये बिहारमधून झाली होती. जसे आम्ही निवडणुकीत करत होतो. तेव्हापासून सर्व विरोधक एकत्र आले तर निवडणुका जिंकल्या जातील, असा समज लोकांमध्ये निर्माण झाला होता, परंतु 2015 नंतर असे सर्व प्रयत्न धुळीस मिळाले. निवडणुकीत कोणीही जिंकलेले नाही.
याचे कारण केवळ पक्ष किंवा नेते एकत्र आल्याने त्यांचे संपूर्ण मतदारही एकत्र येतील, हे जरूरी नाही. पक्षांसोबत एकत्र येण्याबरोबरच तुम्हाला एक नॅरेटिव्ही पाहिजे, चेहराही पाहिजे, ग्राउंडवर कोऑर्डिनेशनही पाहिजे, तुमचा प्रचारही प्रभावी व्हायला हवा. केवळ पक्ष आणि नेत्यांना भेटून तुम्ही मजबूत विरोधकाची कल्पना करू शकत नाहीत.
प्रश्न : सध्या 5 राज्यांचे निकाल आले, 4 भाजपने जिंकले. सध्याच्या परिस्थितीत विरोधकांकडे कोणता मुद्दा आहे, ज्याच्या बळावर ते पुढची तीन वर्षांनी जे इलेक्शन आहे आणि इलेक्टोरेल पॉलिटिक्स आहे, त्यात उभे राहू शकतील?
उत्तर : मुद्दा तर नेहमीच राहतो. एवढ्या मोठ्या देशात जवळजवळ 60 कोटी लोक असे आहेत, जे दिवसाचे 100 रुपयेही कमावत नाहीत. त्या देशात मुद्दे नसतील, सरकारकडून अपेक्षा नसतील, असे शक्यच नाही. गरज या गोष्टींची आहे की, तुम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की, लोकांची खरी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर आहे आणि ती समजून एका सिस्टमॅटिक पद्धतीने उचलावी. तेव्हाच लोकं तुमच्याशी जोडले जातील.
बहुतांश लोक महागाईला एक मुद्दा मानतात, पण यानंतरही मतदान या प्रकारे का होत आहे, लोक सरकारच्या विरुद्ध मतदान का करत नाहीत. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, लोकशाहीत पॉलिटिकल पार्टी आणि लीडर्सची एक भूमिका आहे. जर समाज या मुद्द्यांना उचलण्यात स्वत: सक्षम असता, तर मग लीडर्स आणि पॉलिटिकल पार्टीजची गरजच काय होती? त्यांची गरजच यासाठी आहे की, जेणेकरून मुद्दे प्रामाणिक पद्धतीने मांडले जावेत. जर तुम्ही ते मांडले तर फायदा होईल, नाहीतर नुकसान होईल.
प्रश्न : तुम्ही 2 मेबद्दल म्हणालात, त्याआधी काही सांगाल की 2024 कडे पाहावे? त्याचा कॉन्टेक्स्ट तोच आहे, जो तुम्ही 11 मार्चला ट्वीट केला होता- ‘भारताची लढाई 2024 मध्ये लढली जाईल आणि त्याचा निर्णय तेव्हाच होईल, राज्यांच्या निवडणुकीत नाही, साहेबांना हे माहिती आहे! आणि यामुळेच या प्रदेशाच्या निवडणुकांच्या आसपास एक असा उन्माद उभा करण्याचा एक चलाख प्रयत्न आहे, ज्यामुळे विरोधकांवर मनोवैज्ञानिक विजय मिळवता यावा. या बनावट कहाणीत अडकू नका.’
उत्तर: ठीक आहे. हे मी डेटावरूनही सांगतो. तुम्ही 2012 घ्या. यूपीमध्ये 2012 मध्ये सपाला विजय मिळाला होता, पण 2014 मध्ये भाजपला तिथे 73 जागा मिळाल्या होत्या. 2018 पाहा… 2018 मधील लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणाचे निकाल जाहीर झाले. चारही राज्यांत भाजपचा पराभव झाला आणि तीनच महिन्यांनंतर निवडणुका होऊन भाजप विजयी झाला.
मी मुद्दाम तेलंगणाचे नावही जोडत आहे. तेलंगणात, जिथे भाजपचा एक आमदार आला, तेथून त्यांचे चार खासदार विजयी झाले. मी तुम्हाला गेल्या 15 वर्षांचा असा डेटा दाखवू शकतो. त्याचा नैसर्गिक फायदा आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की, 2024 चा निर्णय झाला आहे. 2024 चा निर्णय 2024 मध्येच घेतला जाईल.
प्रश्न: पण त्याची जी इंटरप्रिटेशनल व्हॅल्यू आहे, ती त्या बाजूला नेते आणि हाही मुद्दा येतो की, 2024 मध्ये किंवा पुढील निवडणुकीत तुम्ही कुठे उभे असाल?
उत्तर : मी भाजपच्या विरुद्ध बाजूने उभा आहे हे पूर्णपणे स्पष्ट आहे. 2015 मध्ये बिहार, 2017 मध्ये पंजाब-यूपी, 2019 मध्ये आंध्र, 2021 मध्ये बंगाल-तामिळनाडूमध्ये काम केले, हे सर्व भाजपच्या विरोधात आहेत.
प्रश्न : तर मग तुम्ही अद्याप सक्रिय राजकारणात येणार नाही?
उत्तर : नाही, मी तुम्हाला सांगितले की मी जे काही करणार आहे, भलेही मला सक्रिय राजकारणात यायचे आहे किंवा चहाचे दुकान उघडायचे आहे किंवा हे क्षेत्र सोडायचे असेल, मी जे काही करणार आहे ते मी येत्या काही दिवसांत सांगेन.
प्रश्नः एका पातळीवर पोहोचणे, तिथे यश मिळवणे आणि मग निघून जाणे, हा तुमचा स्वभाव आहे का?
उत्तर: असं म्हणू शकता. लोक त्यावर टीकाही करू शकतात, पण त्याला दोन्ही बाजू आहेत. तुम्ही एका जागी स्थिर असाल तर त्याचे काही फायदे असतीलच, पण तोटेही आहेत. आंध्र जिंकून तिथे काम करायला सुरुवात केली असती, तर बंगालचा अनुभव आला नसता. जोपर्यंत स्थिरतेचा प्रश्न आहे, आम्हालाही ती हवी आहे, परंतु जे हवे ते मिळाल्यानंतर.
प्रश्नः मोदी अनबीटेबल का आहेत?
उत्तरः अनबीटेबल अजिबात नाहीत. मोदीजींना 2014 मध्ये संपूर्ण देशात 31% आणि 2019 मध्ये 38% मते मिळाली. एकदा त्यांना लोकसभेच्या जवळपास 260 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये जवळपास 300 जागा मिळाल्या. ते संपूर्ण 540 जागा जिंकत आहेत असे नाही.
विधानसभा स्तरावर नजर टाकली तर आज देशातील 50% लोकसंख्या भाजपशासित राज्यांमध्ये आहे. 50 पेक्षा थोडी कमीच. देशात 4 हजारांहून अधिक विधानसभा आहेत, त्यात भाजपचे सुमारे 1800 आमदार आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती भाजपला मतदान करत आहे, असे म्हणता येणार नाही. होय हे नक्कीच आहे की जे लोक मतदान करत आहेत त्यापैकी मतदानाचे सर्वात मोठे प्रमाण त्यांना आहे.
अनबीटेबल नाहीत, याचे आणखी एक तथ्य म्हणजे 2014 मध्ये मोदी जिंकले. 2015 मध्ये दिल्लीत हरले. 2015 मध्येच बिहारमध्ये पराभव झाला. 2016 मध्ये फक्त आसाम जिंकू शकले. इतर राज्यांतही भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. गेली 7 वर्षे मोदीजींचे वर्चस्वाचे युग आहे, परंतु यातील क्वचितच एखादे वर्ष असेल, जेव्हा ते निवडणूक हरले नसतील.
तथापि, निवडणुका हरल्यानंतरही सर्वाधिक निवडणुका जिंकणारा जो पक्ष आहे, तो भाच आहे. यात कोणतेही दुमत नाही. पण सर्वाधिक निवडणुका जिंकणं आणि सगळ्या निवडणुका जिंकणं ही सारखी बाब नाही.
प्रश्न : त्यांचा हा दबदबा कायम राहणार का?
उत्तर : एखादा पक्ष इतका मोठा झाला की त्याला 30% किंवा त्याहून अधिक मते मिळाली की, तुम्ही त्याला सोडून देऊ शकत नाही. याचा अर्थ ते निवडणूक हरणार नाहीत असे नाही. निवडणुकीत पक्षाचा पराभव होऊ शकतो, पण पुढील अनेक वर्षे देशाच्या राजकारणात भाजप एक प्रमुख शक्ती म्हणून राहील, यात दुमत नाही. स्वातंत्र्यानंतर सुमारे 40-50 वर्षे राजकारण काँग्रेसभोवतीच फिरले. याचा अर्थ काँग्रेस कधीच निवडणूक हरली नाही, असे नाही.
खासगी आयुष्यावर PK यांची मते :
प्रश्न : तुमची भेट मिळणे खूप कठीण आहे, असं ऐकलं आहे?
उत्तर : माझ्याकडे बोलायला जास्त काही नाहीच आहे. ट्रेडिशनल पॉलिटिशियन्सचा एक सेन्स आहे, त्या पद्धतीने माझा प्रवास नाही राहिला आहे। डेली बेसिसवर जर मी कोणत्याही पत्रकार वा मीडिया हाऊसशी बोललो, तर ज्या विषयांवर लोकांना वाटते की, मी रिअॅक्ट करावे, त्यावर बहुधा माझ्या बोलण्यावर किंवा मौनावर प्रेक्षकांना रूची नसेल.
प्रश्न : पण लोकांना तर तुम्हाला ऐकावं वाटतं...
उत्तर : हो, बहुधा यामुळे की मी कमी बोलाते, तर तुम्ही म्हणू शकतात की, लोकांमध्ये थोडी उत्सुकता राहते, पण माझ्या मनात हे स्पष्ट आहे की, काही महत्त्वाचे असेल तरच बोलावे. जसे, तुम्ही माझे ट्वीट पाहाल तर मागच्या 4-5 वर्षांत मी जवळपास 80 ट्वीट केले आहेत. जर एखादी बाब सब्सटेंसिव्ह म्हणायची असेल तर म्हणू शकतात, पण अनेक जण असे आहेत, जे 70-80 ट्वीट डेली करतात. त्यांच्या तुलनेत मी चार वर्षांत 80 ट्वीटच केले आहेत.
हे केवळ पत्रकार किंवा मीडिया हाऊसेससाठी नाही. मी स्वत:ही एवढे जास्त पुढे जाऊन स्वत:शी काही बोलणे, प्रत्येक विषयावर आपले मत देणे आवश्यक समजत नाही. प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक विषयावर, सतत बोलणे गरजेचेही नाही.
प्रश्न : तुमच्या ट्विटर अकाउंटवर तुम्ही स्वत:ला Revere Gandhi, Nonconformist, Egalitarian, Humanist, Believe in the Wisdom of Crowd म्हटले आहे, याचा अर्थ काय आहे?
उत्तर : विस्डम ऑफ क्राउड एक साइंटिफिक बाब आहे. अशी बाब की कोणत्याही व्यक्तीची बुद्धिमत्ता वा इंटेलिजन्सच्या तुलनेत जर ग्रुपचे लोक कोणताही निर्णय घेत असतील, तर तो साधारणपणे योग्यच असतो. मग भलेही तो समूह सर्व बुद्धिमंतांचा का नसेना, काही सुशिक्षितही असू शकतात, काही कमी शिकलेले असू शकतात, काही खूप हुशार असू शकतात, काही श्रीमंत असू शकतात, काही गरीब असू शकतात. पण मानव समाज जेव्हा समूहात निर्णय घेतो तेव्हा ते योग्य असण्याची शक्यता कोणत्याही एका व्यक्तीच्या निर्णयाच्या तुलनेत जास्त असते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. यामुळेच लिहिले आहे की, बिलीव्ह इन द विस्डम ऑफ क्राउड.
याच तत्त्वावर लोकशाही चालते. तुम्ही पाहत असाल की, लाखो-कोट्यवधी लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या तथ्यांवर, वेगवेगळ्या वेळी आपल्या मेंदू विश्लेषण करून मतदान करतात आणि अल्टीमेटली ते योग्य सरकार निवडतात. यामुळे आपण म्हणतो की, जनताच जर्नादन आहे. याचे वैज्ञानिक पुरावेही आहेत.
प्रश्न : इतर ज्या चार बाबी तुम्ही ट्विटरवर सांगितल्या आहेत, त्यांच्याशी स्वत:ला कसे रिलेट करता?
उत्तर : Nonconformist यामुळेच म्हटले आहे की, माझा जो बदलाचा स्वभाव आहे, ज्याला तुम्ही थोड्या अॅग्रेसिव्ह शब्दांत म्हणाल तर I am rebel in my mind. Nonconformist असे लोक असतात, जे सत्तेत आहेत, व्यवस्थेत आहेत, अचानक मी त्यांचा फ्लॅग कॅरिअर नाही.
माझ्या आयुष्यात असे माझ्या वडिलांनी समजावले. याचे खूप महत्त्व आहे आणि मी हे फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे की, जर एखाद्या व्यक्तीशी तुम्ही भेटत असाल तर त्यांच्यात जी सकारात्मक बाब आहे, ती पाहा आणि जेव्हा तुम्ही एखादी व्यवस्था वा संस्थेला पाहतात, तेव्हा त्यासाठी क्रिटिकल राहा. हे पाहा की, त्यात काय कमतरता आहे. मी व्यवस्था आणि इन्स्टिटयूशन्सचा फ्लॅग कॅरिअर नाहीये.
प्रश्न : गांधी तुम्हाला का आवडतात?
उत्तर : मी काही एकटा व्यक्ती तर नाही... लाखो-कोट्यवधी लोकांना ते आवडतात. या देशात गांधींपेक्षा मोठा कोणताही लीडर जन्माला आला नाही. यामुळेच आवडतं की, जे त्यांनी म्हटलं, जे समजावलं, त्यात बहुतांश बाबी अशा आहेत, ज्या आजही एकदम रिलेव्हंट आहेत.
मी एका दुसऱ्या मुलाखतीत म्हणालो होतो की, जर गांधींनी सांगितलेली एखादी बाब तुम्हाला वाटत असेल की योग नाही किंवा याचा काही अर्थच नाही, तर कुठे ना कुठे तुम्हाला हे मान्य करावे लागेल की, तुमच्यात अद्याप ती समज डेव्हलप झालेली नाही.
आजही पाहा, या देशात तुम्ही भलेही कोणत्याही विचारधारेचे असाल. तुम्ही काँग्रेसी आहात, भाजचे आहात, कम्युनिस्ट आहात. कोणत्याही विचारधारेचे आहात, राजकारणात असाल तर गांधींविरुद्ध बोलून तुम्ही या देशात राजकारण करू शकत नाहीत. मग भलेही तुम्ही कुणीही असाल.
मला वाटते की, या देशात गांधी आधी जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच आजही महत्त्वाचे आहेत आणि शंभर वर्षांनंतरही राहतील. मी यंग ऑडियन्सला सांगू इच्छितो की, ज्या लोकांना वाटते की, गांधी आता रिलेव्हंट नहाीत वा त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध दुसरा एखादा नेता झाला आहे तर त्यांची आइडियोलॉजी आज तेवढी प्रामाणिक वा उपयोगी नाहीये, म्हणून अशी चूक करू नका. आजही या देशात तुम्ही सर्व्हे कराल तर एकमेव युनिव्हर्सल पॉलिटिकल नाव गांधींचेच येईल.
प्रश्न: तुम्ही ना टीव्हीवर बातम्या पाहता किंवा ऐकता, ना वर्तमानपत्र वाचता, ना ईमेल लिहिता किंवा नोट्सही घेत नाहीत. हे खरे आहे का?
उत्तर: अगदी. मला टीव्ही बघण्यात फारसा रस नाही. याचा अर्थ असा नाही की मी कधीही टीव्ही पाहिला नाही. हे मी या संदर्भात म्हटले की, लोकांना वाटते की मी लॅपटॉप, कॉम्प्युटर, डेटामध्ये गुंतलेला कोणीतरी आहे. 2013 पासून मी स्वतः लॅपटॉप-संगणक वापरलेले नाही. मी नोट्स घेत नाही. जर मला कुठे पेपर मिळाला तर ठीक, मी आलटून-पालटून घेतो.
समाजात एक मोठा वर्ग आहे, जो सकाळी उठतो, बातम्या वाचतो आणि चहा पितो. हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग आहे, पण मी हे करत नाही. कुठेतरी समजलं, टाइमपास करत असाल तर वाचता येईल, पण पेपर हा माझ्या रुटीन लाईफचा भाग नाही.
प्रश्न: मग तुमची माहिती कुठून येते?
उत्तर: मी जगाशी जो कनेक्ट आहे, ते माझ्या फोनद्वारे आहे. त्याच्यामार्फत सर्व माहिती मिळते.
प्रश्न: आत्ताच मी दिल्लीला तुम्हाला भेटायला येत असताना माझ्या शेजारी एक तरुण बसला होता, त्याचे नाव शुभम असावे, म्हणून मी त्याला विचारले, तू प्रशांतला ओळखतोस का? तो म्हणाला- कोण, प्रशांत किशोर? मी त्याला विचारले की, ते तुला भेटले तर काय प्रश्न विचारशील? तो म्हणाला - ते काय करतात, ते त्यांचे विश्लेषण कसे करतात, मी याची ट्रेनिंग कशी आणि कोठून घ्यावी? असे काहीतरी सुरू शकाल का, जेथून आम्ही लोकं काही शिकू शकू?
उत्तर : काही लोकांना वाटते की आम्ही डेटावर काम करतो. काहींना असे वाटते की त्यांच्याकडे हुशार लोकांची फौज आहे, जे माहिती गोळा करतात, त्यांचे विश्लेषण करतात, प्रक्रिया करतात. काही लोकांना वाटते की ते सोशल मीडिया तज्ज्ञ आहेत. काही लोकांना वाटते की, हे जाहिरातीवाले आहेत. काही लोकांच्या मनात आम्ही पीआरचे लोक आहोत. काहींसाठी मार्केटिंग आहे, काहींसाठी ब्रँडिंग आहे, परंतु असे काहीही नाही.
जर मला माझ्या कामाची एका शब्दात व्याख्या करायची असेल, तर मी म्हणेन वी आर ग्लोरिफाईड लिसनर. माझे काम ऐकणे आहे. मी ज्या काही गोष्टी ऐकतो, त्याचा मी पद्धतशीर साच्यात अर्थ लावतो आणि त्याचे पद्धतशीर विश्लेषण करू शकतो, हे माझे काम आहे.
या संदर्भात मी तुम्हाला बंगालचे उदाहरण देईन. तिथे 'दीदी के बोलो' हा कार्यक्रम सुरू केला. त्यात वर्षभरात 45 लाख लोकांनी फोन केला. सर्वात मोठी समस्या लोकांनी सांगितली ती म्हणजे कास्ट सर्टिफिकेट मिळण्यात येणारी अडचण. त्याआधारे आम्ही तिथे 'द्वारे सरकार' नावाचे कॅम्पेन लाँच केले.
त्यात लोकांना सांगितले होते की, सरकारची सध्याची जी योजना आहे, ती घेऊन सरकार तुमच्या पंचायतीमध्येच येत आहे, ती सोडवेल. सध्या सुरू असलेल्या योजनेतून ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्या मिळत नसल्याचे 2 कोटी 80 लाख लोकांनी सांगितले. बंगालमध्ये तृणमूलच्या विजयात सर्वात मोठा वाटा सरकारी कार्यक्रमाचा आहे, असे मला वाटते.
2 कोटी 80 लाख लोक स्वत:हून येऊन त्यांचे प्रश्न सोडवत असतील, तर ते मतदानात दिसून येणार ना! 25 वर्षांनंतर टीएमसीचा मतांचा वाटा 44% वरून 48% पर्यंत वाढला. हेच आमचे काम आहे.
प्रश्न : तुम्ही पॉलिटिकल अटायरमध्ये कधीपासून आलात?
उत्तरः मी बिहारमध्ये नितीशजींसोबत काम करत होतो तेव्हा त्यांनी मला कुर्ता-पायजामा घालण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी केवळ सल्लाच दिला नाही, तर त्याला शिवूनही दिले. आजही मी त्यांनी शिवून दिलेले कुर्ते-पायजमे वापरतो.
प्रश्न : तुमची पॉलिटिकल लाइफ आणि प्री-पॉलिटिकल लाइफदरम्यान सर्वात महत्त्वाचा दुवा, जे आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्वात सुंदर बाब काय वाटली?
उत्तर : त्यांच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. एवढ्या मोठ्या पदावर कोणीही पोहोचला तर त्याच्यात अनेक गुण असतात. एका शब्दात किंवा वाक्यात त्याचा सारांश सांगणे फार कठीण आहे, पण ते एक उत्तम श्रोता आहेत असे मला वाटते. ज्याला व्यक्तिश: त्यांची योग्यता म्हणता येईल. त्यांच्यात ताकदही आहे आणि त्यांच्या ताकदीला वेगवेगळे आयामही आहेत.
RSS प्रचारक म्हणून किंवा संघाशी निगडीत राहून सुमारे 15 वर्षे त्यांनी समाजाचा पहिला अनुभव घेतला. त्यानंतर 15 वर्षे राजकीय कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये राहिले, राजकीय संघटनेशी संबंधित गोष्टींचा अनुभव घेतला. त्यानंतर 15 वर्षे मुख्यमंत्री. तुम्ही या 45 वर्षांना जोडल्यास, हे एक अद्वितीय व्यावसायिक मिश्रण आहे.
हेच त्यांना या वस्तुस्थितीसह सुसज्ज करते की, त्यांना माहिती आहे की सामान्य लोक काय विचार करतात. 40-50 वर्षांचा अनुभव असल्यामुळे ते हे करू शकतात. त्या अनुभवाच्या आधारे, लोकांना काय ऐकायचे आहे हे समजून घेण्यासाठी ते आमच्या आणि तुमच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. ही त्यांची मोठी ताकद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.