आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशांत किशोर, म्हणजेच अशी व्यक्ती ज्यांच्याशी प्रत्येकजण निवडणुकीची सल्ला-मसलत करू शकत नाही. मोठी किंमत आहे त्यांची. असे म्हणतात की, अलीकडच्या काही वर्षांत जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या पक्षाच्या विजय-पराजयात काही ना काही भूमिका त्यांनी बजावली आहे. आता त्यांचे म्हणणे आहे की, केजरीवाल यांना केंद्रात भाजपचा मुकाबला करण्यासाठी 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो.
याचे स्वतःचे गणित आहे. प्रशांत सांगतात की, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण 27 लाख मते मिळाली होती, तर देशात जिंकण्यासाठी 20 कोटी किंवा त्याहून अधिक मतांची गरज आहे. हे स्थान काही वर्षांत मिळू शकत नाही.
'दैनिक भास्कर'शी झालेल्या संवादात प्रशांत भरभरून बोलले आणि सर्वच विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीची पहिली खेप काल म्हणजेच सोमवारी आली. संभाषण जरा लांबलचक झाले होते, त्यामुळे बाकीचा भाग या अखेरच्या खेपीत आणला आहे. वाचून पाहा, तुम्हाला आवडेल...
प्रश्न : केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीनंतर पंजाबमध्ये 'आप'ने मोठा विजय नोंदवला आहे, त्यामुळे 'आप' काँग्रेसची जागा घेऊन आगामी काळात विरोधी पक्षाच्या भूमिकेत येऊ शकेल का?
उत्तरः दोन राज्यांतील निवडणुका जिंकून थोडी मोठी शक्ती म्हणून उदयास येणे ही एक गोष्ट आहे आणि लोकसभा निवडणूक जिंकणे ही दुसरी गोष्ट आहे. सैद्धांतिकदृष्ट्या कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष बनू शकतो, परंतु देशाच्या लोकशाही इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की देशपातळीवर फक्त काँग्रेस आणि भाजप हेच पक्ष आहेत जे अखंड भारताचे पक्ष बनले आहेत. याचा अर्थ असा नाही की, इतर कुणी बनू शकत नाही, परंतु असे होण्यासाठी 15-20 वर्षे सतत प्रयत्न करावे लागतील. एका रात्रीत हा बदल शक्य नाही.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाला देशभरात सुमारे 27 लाख मते मिळाली आणि लोकसभा निवडणूक जिंकायची असेल, तर 20 कोटींपेक्षा जास्त मतांची गरज आहे. हे आतापर्यंत फक्त काँग्रेस आणि भाजपलाच करता आले आहे. असे करण्यासाठी त्यांना 50 वर्षे लागली. भाजपने 1978 पासून कामाला सुरुवात केली. अनेक वर्षांनंतर त्यांना आघाडी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली.
प्रश्न : तुम्ही म्हणता की देशात समस्या आहेत, पण महागाई, बेरोजगारी असे सगळे मुद्दे असूनही भाजपने 5 पैकी 4 राज्ये जिंकली, मग पंतप्रधान मोदींची लोकप्रियता एवढी आहे की, त्यांच्यासमोर महागाई, बेरोजगारी हे मुद्दे अनावश्यक ठरतात, असे मानायचे का?
उत्तर : महागाई, बेरोजगारी असे कोणतेही प्रश्न नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. 38% मते मिळाल्यानंतर जर कोणाला वाटत असेल की संपूर्ण देश आपल्यासोबत आहे, तर ते योग्य नाही, कारण देशातील 100 पैकी केवळ 38 लोक आपल्यासोबत आहेत. 62 लोकांसाठी महागाई आणि बेरोजगारी हे मोठे प्रश्न आहेत. फरक एवढाच की, त्यांची मते विभागली जात आहेत.
प्रश्न : 5 राज्यांचे निकाल लागल्यानंतर तुम्ही ते 2024 शी जोडू नका असे सांगितले होते. जर आपण फक्त यूपीचा विचार केला, जिथे लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले आहे, तर त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होईल, नाही का?
उत्तर: फायदा मिळू शकेल, पण एक मत असेही असू शकते की लोकसभा निवडणुकीत भाजपला 10 वर्षांच्या अँटी इन्कम्बेन्सीचा सामना करावा लागेल. राज्यापासून केंद्रापर्यंत भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत 2024 मध्ये विरोधकांकडेही ही एक संधी असेल.
प्रश्न : मग आता पंतप्रधान मोदींची लोकप्रियता टिकून आहे असे मानायचे का?
उत्तरः पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम आहे, पण तुम्ही लोकप्रिय होऊनही निवडणूक हरू शकता, जसे बंगालमध्ये भाजपचे झाले. त्याचप्रमाणे यूपीमध्ये अखिलेशच्या सभांना खूप गर्दी होत असल्याचं बोललं जात होतं, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 30 टक्के मते मिळवूनही त्यांचा पराभव झाला.
प्रश्न : हिंदू-मुस्लिम राजकारणासमोर सगळे मुद्दे फिके पडले आहेत का?
उत्तर: अजिबात नाही. ध्रुवीकरणाला मर्यादा असते. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तुम्ही समाजाचे ध्रुवीकरण करू शकत नाही. समाजाचे मतदान कसे होते हे जाणून घेण्यासाठी आम्ही गेल्या 30 वर्षांत झालेल्या सर्व निवडणुकांची आकडेवारी पाहिली. आम्हाला आढळले की 50 ते 55% नंतर समुदायाचे ध्रुवीकरण होत नाही. असे असते तर भाजपला केवळ 40% मते का मिळाली असती.
प्रश्न: पण हिंदुत्व हा एक मोठा घटक तर आहेच ना?
उत्तर: होय, अर्थातच, हिंदुत्व हा एक मोठा घटक आहे. ज्याचा निवडणुकीत परिणाम होतो.
प्रश्न : तुम्ही ज्या पक्षांसोबत कँपेनिंग करता, त्यांच्याशी तुम्ही बार्गेनिंग कशी करता?
उत्तरः बार्गेनिंगसारखे काही नाही. टेबल किंवा खुर्चीवर बसून हिशेब होत नाही. होय, प्रत्येक पक्षाला कँपेनिंगवर खर्च करायचा असतो, पण त्यासाठी मी वेगळे शुल्क घेतो, असे काही नाही. 10 वर्षे हे काम केले. शिकायला आलो होतो. शिकून घेतले आणि आता सोडूनही दिले. कोणी काही म्हणो, पण मला आता तुम्ही माझ्या जुन्या भूमिकेत पाहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.