आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या दिशानिर्देशानुसार दोन विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही ६ फुटांचे अंतर ठेवावे लागेल. तीन तासांच्या दोन शिफ्टमध्ये एक दिवसाआड वर्ग भरवावे लागतील. या नियमाप्रमाणे शाळा सुरू झाल्या तर ६ फूट अंतर राखत २२ बाय २० आकाराच्या वर्गात १२ विद्यार्थी बसू शकतील, अशी माहिती आर्किटेक्ट राधिका देशमुख यांनी दिली. म्हणजेच वर्गात २५ विद्यार्थी असतील तर एका विद्यार्थ्याचा दर तिसऱ्या दिवशी, ५० विद्यार्थी असतील तर ५ व्या दिवशी आणि ७५ विद्यार्थी असतील ७ व्या दिवशी शाळेत येण्यासाठी नंबर लागेल.
शाळा सुरू झाल्या तरी अध्यापनासाठी शिक्षकांची कमी भासणार आहे. राज्यात एकूण ६८६४९५ शिक्षक असून पैकी ६१३१८१ टीचिंग तर ७३३१४ नॉन टीचिंग श्रेणीतील आहेत. यापैकी १ लाख ९० हजार शिक्षकांना काेरोनाची ड्यूटी लावण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कागजीपुरा येथील उर्दू प्राथमिक शाळेला भेट देऊन माहिती घेतली असता, या शाळेत अंगणवाडीपासून ८ पर्यंतचे वर्ग आहेत. एका वर्गात सरासरी १६ ते २७ असे १७२ विद्यार्थी आहेत. नऊ वर्गांसाठी २० बाय २२ आकाराच्या ६ खोेल्या आहेत. त्यात दोन खोल्यांची दुरुस्ती सुरू आहे. सहा फुटांच्या नियमानुसार एका वर्गात फार तर १२ विद्यार्थी बसू शकतील. यामुळे एक दिवसाआडसाठी वेळापत्रकाचे काम सुरू असल्याचे मुख्याध्यापिका शेख आस्माबीबी यांनी सांगितले.
वर्ष गेले तरी बिघडणार नाही
सरकारने वर्ग सुरू करण्याची घाई करू नये. मोठ्या माणसांकडूनही फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसतांना मुलांकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. वर्ष गेले तरी बिघडणार नाही, पण जीव महत्त्वाचा आहे. -लईकुर रहेमान, फेअरनेस इन एज्युकेशन
शिक्षकांचे घरून काम
शिक्षक शाळेत येत नाहीत म्हणजे घरी रिकामे बसले आहेत, असा काहींचा समज आहे. यामुळेच शाळा सुरू करण्याचा घाट घातला जातोय. पण शिक्षक घरून आधीपेक्षा अधिक काम करताेय. आधीतरी केवळ शाळेत मुलं प्रश्न विचारायचे. आता ऑनलाइन असल्याने दिवसभर शंका विचारतात. - सुभाष मेहेर, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.