आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. मंगळवारी शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता त्यांचा सामना एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांच्याशी होणार आहे.
यशवंत सिन्हा यांची बंडखोर वृत्ती 1958 मध्ये पाटणा विद्यापीठाचे प्राध्यापक बनण्यापासून ते 2022 मध्ये राष्ट्रपदीपदाचे उमेदवार बनण्यापर्यंतच्या राजकीय प्रवासात अनेकदा दिसून आली आहे.
अशा परिस्थितीत यशवंत सिन्हा यांच्या राजकीय प्रवासाशी निगडित रंजक आणि बंडखोर किस्से आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
पहिले यशवंत सिन्हा यांची संपूर्ण कारकिर्द जाणून घेऊया....
1964 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री महामाया यांनी लोकांसमोरच यशवंत यांना विचारले होते प्रश्न
यशवंत सिन्हा यांनी 1960 मध्ये IAS परीक्षेत देशभरातून 12 वा क्रमांक मिळवला होता. प्रशिक्षणानंतर त्यांची बिहारच्या संथाल परगणा येथे डीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डीसी म्हणजे जिल्हाधिकारी. 1964 मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री महामाया प्रसाद सिन्हा हे संथाल परगणा दौऱ्यावर गेले होते.
यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे यशवंत सिन्हा चर्चेत आले. त्यावेळी लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोरच यशवंत सिन्हा यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी यशवंत सिन्हा त्रस्त झाले होते.
मंत्र्यांनी आवाज वाढवल्याने सिन्हांनी मुख्यमंत्र्यांसोबतच घातला वाद
यशवंत सिन्हा आपल्या उत्तराने मुख्यमंत्र्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पाटबंधारे मंत्र्यांनी सिन्हांना बोलण्यावरून जास्त टोकले. यानंतर सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं आणि म्हणाले की सर, मला अशा वागणूकीची सवय नाही.
यशवंत यांचे हे उत्तर ऐकून मुख्यमंत्र्यांनी त्यांना एका खोलीत नेले. तिथल्या एसपी आणि डीआयजींसमोर महामाया प्रसाद यांनी मंत्र्यासोबत तुम्ही असे वागायला नको होते, असे सांगितले. यानंतर यशवंत म्हणाले की, तुमच्या मंत्र्यानेही माझ्याशी अशा प्रकारे वागायला नको होते.
सिन्हा यांचे हे उत्तर ऐकून महामाया प्रसाद संतापले. मुख्यमंत्र्यांशी असे बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? तसेच तुम्ही दुसरी नोकरी शोधा, असे त्यांनी आयएएस सिन्हा यांना सांगितले.
हे ऐकून यशवंत सिन्हा महामाया प्रसाद यांना म्हणाले, 'सर, तुम्ही आयएएस होऊ शकत नाही, पण मी मात्र एक दिवस मुख्यमंत्री बनू शकतो.
कॅबिनेट ऐवजी दिले राज्यमंत्री पद तर 10 सेकंदात दिला नकार
जेपी म्हणजेच जयप्रकाश नारायण यांच्यापासून प्रभावित होऊन यशवंत सिन्हा यांनी सेवानिवृत्तीच्या 12 वर्षांपूर्वी आयएएसची नोकरी सोडली. या नंतर काही महिन्यांनी ते जनता दलात सामील झाले आणि चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा चांगला संपर्क झाला.बोफोर्स घोटाळ्यावरून झालेल्या गदारोळात व्हीपी सिंग 1989 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी यशवंत यांना राज्यमंत्री पदाची ऑफर दिली.
तत्कालीन कॅबिनेट सचिव टीएन सेशन यांनीही यशवंत यांना मंत्री बनवण्याचे पत्र सुपूर्द केले, मात्र अवघ्या 10 सेकंदात यशवंत यांनी ते पद नाकारले. सिन्हा यांना कॅबिनेट मंत्री व्हायचे होते. तेव्हा सिन्हा यांच्या मते, त्यांची ज्येष्ठता आणि निवडणूक प्रचारातील काम पाहता व्हीपी सिंह यांनी त्यांना राज्यमंत्रीपद देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे.
व्हीपी सिंह यांचे सरकार 343 दिवस टिकले. यानंतर नोव्हेंबर 1990 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सिन्हा यांना अर्थमंत्री केले. हे सरकारही केवळ 223 दिवस टिकले. सरकार पडल्यानंतर काही दिवसांनी यशवंत सिन्हा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अटल बिहरी वाजपेयी सरकारमध्ये ते अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री झाले.
यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारविरोधात घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव
दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी यशवंत सिन्हा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण मोदी सरकारविरोधात खटला दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मोदी सरकारच्या काळात राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यासोबतच राफेल प्रकरणी मोदी सरकारविरोधात सीबीआयमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यावेळी यशवंत सिन्हा यांनी केली होती. यशवंत सिन्हा यांची ही बंडखोर वृत्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.