आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पदासाठी भाजपची तयारी:महिला की आदिवासी यावर मंथन; आनंदी, अनसुया आणि द्रौपदी यांची नावे आघाडीवर

प्रेम प्रताप सिंह8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील महिन्याच्या 25 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. यासाठी नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली असून 29 जून फॅार्म भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, सरकार आणि विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर मंथन सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधकांकडून अनेक नावांवर चर्चा होत असली तरी कोणत्याही नावावर एकमत झालेले नाही. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर सत्ताधारी पक्षाने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.

2022-23 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडनुकीत फायदा व्हावा यासाठी महिला, मूस्लिम, दलित किंवा दक्षिण भारतातील एखाद्या व्यक्तीच्या नावाचा विचार भाजपकडून केला जात आहे. आता चर्चेत असणाऱ्यापैकी एखाद्या व्यक्तीचे नाव पुढे येते की, गेल्यावेळीप्रमाणे या वेळीही पक्षाकडून नव्याच नावाची घोषणा होते, हे पाहणे अत्सुक्तेचे ठरणार आहे.

दिव्य मराठीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या समुदायांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. वाचा सविस्तर...

आदिवासी: आजपर्यंत देशात आदिवासी समाजातील एकही व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकला नाही. महिला, दलित, मूस्लिम आणि दक्षिण भारतातून आलेले व्यक्ती राष्ट्रपती झाले असले तरी आदिवासी समाज मात्र त्यापासून वंचित राहिला आहे. अशा परिस्थितीत आदिवासी समाजातील व्यक्तीलाच देशातील सर्वोच स्थानावर बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकसभेच्या 543 जागांपैकी 47 जागा एसटी प्रर्वगासाठी राखीव आहेत. 60 हुन अधिक जगांवर आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, छत्चीसगडमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी मतदार निर्णायक स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत आदिवासीच्या नावावरही चर्चा सुरू आहे.

महिला: महिला भाजपच्या कोअर व्होट बँक बनल्या आहेत. या व्होटबँकचा फायदा घेण्यासाठी भाजपने आता प्रयत्न सुरू केले आहेत. महिलांच्या नावाचा जास्त विचार केला जात असल्याचे सांगितले जात असून यामध्ये यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचाही समावेश आहे. पटेल या नरेंद्र मोदींच्या अगदी जवळच्या आहेत.

पटेल यांच्याशिवाय माजी राज्यपाल द्रौपदी मूर्मू, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके यांचाही या शर्यतीत सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघींपैकी एकीला राष्ट्रपती बनवल्यास भाजप एका बाणाने दोन निशाणे साधू शकेल. पहिला म्हणजे आदिवासी समाजाला आपलेसे करणे सोपे होऊ शकेल आणि दूसरे म्हणजे महिलांमध्येही यामुळे सकारात्मक संदेश जाईल.

दक्षिण भारत: दक्षिण भारतात भाजप आपले अस्तित्व लाढवू पाहत आहे. त्यासाठी पक्षाकडून दक्षिण भारतातील एखाद्याला राष्ट्रपती करून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशात आंध्र प्रदेश मधून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सर्वात मजबूत पर्याय असले तरी दक्षिण भारतातील आणखी काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

मूस्लिम: गेल्या काही दिवसांपासुन हिंदू-मूस्लिम वाद सुरू आहे. हा वाद संपवण्यासाठी भाजप माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच्या सारख्या उमेदवाराच्या शोधात आहे. मात्र, अद्याप तरी तसा चेहरा पक्षाला दिसला नाही. तरी केरळचे राज्यपाल आरिफ मोहमद खान यांचे नाव चर्चेत आहे. ते य़ूपीतील बुलंदशा शहरातील रहिवासी आहेत. तिहेरी तलाक, सीएए सारख्या मुद्यांवर आरिफ नेहमीच भाजपसाठी ढाल बनले होते, परंतू सूत्रांच्या मते, राष्ट्रपती ऐवजी भाजप त्यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवू शकते. या माध्यामातून हा पक्ष मूस्लिमविरोधी नसून तृष्टीकरणाविरोधी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

25 जुलैला संपणार राष्ट्रपतींचा कार्यकाळ

नीलम संजीन रेड्डी यांनी 25 जुलैला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासुन, प्रत्येक वेळी 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती कार्यकाळ सांभाळतात. रेड्डी यांच्या पाठोपाठ ज्ञानी झैल सिंह, आर वेंकटरमन, शंकरदयाल शर्मा, के आर नारायनण, एपीजे अब्दूल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घतली होती.

दोन राष्ट्रपतींचा पदावर असताना झाला होता मृत्यू

देशात असे दोन राष्ट्रपती झाले आहेत ज्यांचे राष्ट्रपतीपदावर असताना निधन झाले आहे. यात तिसरे राष्ट्रपती झाकीर हूसैन आणि फखरूद्दीन अली अहमद यांचा समावेश आहे. झाकीर हूसैन हे 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत राष्ट्रपती होते. त्यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती करण्यात आले होते. तसेच राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रूवारी 1977 या काळात पदावर राहिले त्यांच्या निधनामुळे बी.डी जट्टी यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवावे लागले.

विरोधकांकडे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही

विरोधकांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मिळालेला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दूल्ला आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यानंतर आता महात्मा गांधींचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांनीही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याचा विरोधकांचा प्रस्ताव फेटाळला आहे. तर आपण विरोधीपक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होणार नसल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत विरोधीपक्षाकडून पूढचे नाव कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवारीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश आले नसून काँग्रसनेही अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...