आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Britain's National Anthem To Change After 70 Years, 'God Save The King' Sung For First Time Since 1952

किंग चार्ल्स-III राणी कॅमिलासोबत लंडनमध्ये पोहोचले:70 वर्षांनंतर बदलणार ब्रिटनचे राष्ट्रगीत, 1952 नंतर गुंजणार 'गॉड सेव्ह द किंग'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स नवे राजे झाले आहेत. ते आता राजा चार्ल्स तिसरा म्हणून ओळखले जातील. नवीन राजा म्हणून त्यांना कोणत्या नावाने बोलवले जावे, हा नवीन राजे चार्ल्स III यांचा पहिला निर्णय आहे. परंपरेनुसार, ते चार्ल्स, फिलिप, आर्थर, जॉर्ज या चारपैकी कोणतेही एक नाव निवडू शकतात. शुक्रवारी, किंग चार्ल्स तिसरा आणि राणी कॉन्सॉर्ट कॅमिला लंडनमध्ये आले. ते शोकग्रस्त राष्ट्रांना संबोधित करतील तसेच पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेणार आहेत.

चार्ल्स-III ला मुकुट कसा सुपूर्द केला जाईल, त्याची प्रक्रिया काय असेल, एक एक करून जाणून घेऊया...

सेरेमोनियल सदस्यांमध्ये लंडनमध्ये अधिकृत घोषणा केली जाईल

राणीच्या मृत्यूनंतर 24 तासांच्या आत लंडनमधील सेंट जेम्स पॅलेस येथे आयोजित औपचारिक मंडळात (असोसिएशन कौन्सिल) चार्ल्सला अधिकृतपणे राजा घोषित केले जाईल. कौन्सिलमध्ये ज्येष्ठ संसद सदस्य, वरिष्ठ नागरी सेवक, राष्ट्रकुल उच्चायुक्त आणि लंडनचे लॉर्ड महापौर यांचा समावेश असेल.

साधारणत: 700 हून अधिक लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतात, परंतु यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या येईल, असे वाटत नाही. कारण अल्प कालावधीच्या सूचनेवर कार्यक्रम आयोजित केला जात आहे. 1952 मध्ये एलिझाबेथ-II राणी बनली तेव्हा सुमारे 200 लोक साक्षीदार होते. परंपरेनुसार राजा यात सहभागी होत नाही.

राणी एलिझाबेथ II आणि नवीन राजा यांच्यांच्यातील गुण सर्वांना सांगितले जातील

कार्यक्रमात, प्रिव्ही कौन्सिलचे लॉर्ड प्रेसिडेन्ट पेनी मॉर्डंट हे सर्वात आधी एलिझाबेथ II यांच्या मृत्यूची घोषणा करतील. ही घोषणा मोठ्या आवाजात करण्यात येईल. यानंतर अनेक प्रार्थना होतील, राणीचे कार्य कर्तृत्व सांगितले जाईल. यासोबतच नव्या राजाचे गुणही सांगितले जातील.

या घोषणापत्रावर पंतप्रधान, कँटरबरीचे मुख्य बिशप आणि लॉर्ड चांसलरसह अनेक वरिष्ठ अधिकारी स्वाक्षरी करतील. नव्या राजाने सत्ता हाती घेतल्यानंतर काही बदल केले जातील का, हेही या कार्यक्रमात ठरवले जाणार आहे.

'गॉड सेव्ह द किंग' हे राष्ट्रगीत 1952 नंतर प्रथमच गायले जाईल

साधारणपणे एक दिवसानंतर असेशन परिषदेची पुन्हा बैठक होते. यामध्ये राजाचाही समावेश असतो. यावेळी कोणताही शाही शपथविधी सोहळा होणार नाही. असे असले तरी, 18 व्या शतकातील परंपरेनुसार, राजे चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेतील.

यानंतर सेंट जेम्स पॅलेसच्या बाल्कनीतून जाहीर घोषणा केली जाईल. एक अधिकारी ज्याला गार्टर किंग ऑफ आर्म्स नावाने ओळखले जाते, प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवीन राजे असल्याची घोषणा करेल. यानंतर ब्रिटनचे राष्ट्रगीत गायले जाईल.

1952 नंतर प्रथमच ब्रिटीश राष्ट्रगीतामध्ये 'गॉड सेव्ह द किंग' हा शब्द असेल. त्याआधी गॉड सेव्ह द क्वीन असा शब्द होता. यानंतर हायड पार्क, टॉवर ऑफ लंडन आणि नौदलाच्या जहाजांकडून तोफांची सलामी दिली जाईल.

1969 मध्ये चार्ल्स यांचा प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून राज्याभिषेक झाला. एलिझाबेथ-द्वितीय यांनी मुलगा चार्ल्स याला मुकुट घातला.
1969 मध्ये चार्ल्स यांचा प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून राज्याभिषेक झाला. एलिझाबेथ-द्वितीय यांनी मुलगा चार्ल्स याला मुकुट घातला.

राजा झाल्यावरही मुकुटाची प्रतीक्षा

सध्या, चार्ल्स यांना राज्याभिषेकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण त्याच्या तयारीला वेळ लागेल. यापूर्वी राणी एलिझाबेथ यांनाही जवळपास 16 महिने प्रतीक्षा करावी लागली होती. फेब्रुवारी 1952 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, परंतु जून 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता.

विशेष म्हणजे हा सरकारचा कार्यक्रम असतो आणि त्याचा खर्च देखील सरकारलाच करावा लागतो.

2.23 किलो सोन्याचा मुकुट घातला जाईल

गेल्या 900 वर्षांपासून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक सोहळा होतो. विल्यम द कॉन्करर हा तेथे राज्याभिषेक झालेला पहिला सम्राट होता. चार्ल्स हे 40 वे सम्राट असतील. या वेळी कँटरबरीचे मुख्य बिशप सेंट एडवर्ड्स शाही मुकुट चार्ल्सच्या डोक्यावर ठेवतील. जो सोन्याचा मुकुट आहे.

याचे वजन सुमारे 2.23 किलो आहे. हा मुकुट टॉवर ऑफ लंडनमधील क्राउन ज्वेल्सच्या केंद्रस्थानी आहे. तो राज्याभिषेकाच्या वेळीच राजाला घातला जातो.

आता जाणून घ्या नवीन राजाचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, लग्न, घडामोडी आणि वादाबद्दलही माहिती वाचा.

राणी एलिझाबेथ II आणि त्यांचा मुलगा चार्ल्स तिसरा, आता ते नवीन राजे झाले आहेत.
राणी एलिझाबेथ II आणि त्यांचा मुलगा चार्ल्स तिसरा, आता ते नवीन राजे झाले आहेत.

राजवाड्यात शिक्षक आले नाही तर शाळेत जाऊन अभ्यास केला

चार्ल्सचा जन्म बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाला. ते तरुण असताना, राणी एलिझाबेथ आणि ड्यूक यांनी ठरवले की चार्ल्सला शिकवण्यासाठी कोणीही शिक्षक राजवाड्यात येणार नाही. प्रिन्स स्वतः शाळेत जाातील. चार्ल्सने 7 नोव्हेंबर 1956 रोजी पश्चिम लंडनमधील हिल हाऊस स्कूलमध्ये आपले शिक्षण सुरू केले. यानंतर चार्ल्सने चिम प्रिपरेटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. चार्ल्सचे वडीलही याच शाळेत शिकले होते. चार्ल्सने स्कॉटलंडमधील गॉर्डनटाउन येथे शालेय शिक्षण पूर्ण केले.

शाळेचे संस्थापक आणि अध्यक्ष स्टुअर्ट टाउनेंड यांनी त्याला राजकुमारासारखे नाही तर सामान्य विद्यार्थी म्हणून शिकवले. स्टुअर्टने राणी एलिझाबेथला चार्ल्सला फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. हिल हाऊसचे विद्यार्थी फुटबॉल मैदानावर सर्वांना समान वागणूक देतात. 2 ऑगस्ट 1975 रोजी चार्ल्स यांनी केंब्रिज विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली.

चार्ल्स यांनी वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि रॉयल एअर फोर्समध्ये सामील झाले. केंब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांनी प्रशिक्षण घेतले.

चार्ल्सचे लग्न आणि घटस्फोट

24 फेब्रुवारी 1981 रोजी ब्रिटिश राजघराण्याने एक घोषणा केली. त्यात असे म्हटले की, 32 वर्षीय चार्ल्सची एंगेजमेंट झाली आहे.

लोकांच्या मनात प्रश्न होता कोणाशी?

उत्तर आले - माझ्यापेक्षा 13 वर्षांनी लहान, डायना स्पेन्सर या 19 वर्षांच्या मुलीशी.

डायना आणि चार्ल्स 24 जुलै 1981 रोजी पती-पत्नी बनले होते.
डायना आणि चार्ल्स 24 जुलै 1981 रोजी पती-पत्नी बनले होते.

चार्ल्सने फेब्रुवारी 1981 मध्ये डायनाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि डायनाने होकार दिला. या दिवसापासून लोकांना डायनाबद्दल माहिती झाली. त्यावेळी डायनाची सर्वाधिक चर्चा होती ती तिच्या व्हर्जिनिटीची.

चार्ल्सचे अनेक प्रेमप्रकरण होते, पण त्याची भावी पत्नी लग्नाच्या वेळेपर्यंत कुमारी असणे ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट मानली गेली. ब्रिटीश राजघराण्याची सून, पुढची राणी होण्यासाठी डायनाची कौमार्य ही सर्वात मौल्यवान पात्रता होती. डायना आणि चार्ल्स 24 जुलै 1981 रोजी पती-पत्नी बनले.

डायनाशी लग्न करण्यापूर्वी प्रिन्स चार्ल्सचे कॅमिलासोबत होते अफेअर

चार्ल्सचे कॅमिला पार्कर बोल्झ नावाच्या महिलेवर प्रेम होते, दोघांनाही लग्न करायचे होते, परंतु कॅमिला आधीच विवाहित होती. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याने या लग्नाला विरोध केला होता. चार्ल्सने मजबूरीने डायनाला शोधले होते, असेही मानले जाते. डायनाला लग्नापूर्वीच या अफेअरबद्दल शंका आली होती. तिला हे लग्न मोडायचेही होते, पण लग्नाची इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की, डायना हिम्मत करू शकली नाही.

चार्ल्स आणि कॅमिलाचे लग्न

चार्ल्स आणि कॅमिला पार्कर-बोल्स यांच्या एंगेजमेंटची घोषणा 10 फेब्रुवारी 2005 रोजी क्लेरेन्स हाऊस येथे करण्यात आली. यावेळी प्रिन्स चार्ल्सने कॅमिलाला घातलेली अंगठी ही त्याच्या आजीची अंगठी होती. 2 मार्च रोजी झालेल्या प्रिव्ही कौन्सिलच्या बैठकीत लग्नाला राणीची संमती नोंदवण्यात आली.

कॅमिला आणि चार्ल्सने 9 एप्रिल 2005 रोजी विंडसरमध्ये लग्न केले.
कॅमिला आणि चार्ल्सने 9 एप्रिल 2005 रोजी विंडसरमध्ये लग्न केले.

कॅमिलाने 1995 मध्ये पती अँड्र्यू यांना घटस्फोट दिला होता. एका वर्षानंतर, 1996 मध्ये, प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचाही घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आता प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला लग्नाशिवाय पती-पत्नी म्हणून एकत्र राहू लागले. कॅमिला आणि चार्ल्स दोघेही 1999 मध्ये सार्वजनिकपणे एकत्र दिसले. दोघांनी 9 एप्रिल 2005 रोजी विंडसरमध्ये लग्न केले.

अनेक प्रेमप्रकरणांचीही चर्चा

आपल्या तरुण जीवनात चार्ल्सचे नाव अनेक स्त्रियांशी जोडले गेले. उदा. जॉर्जियाना रॅचेल, स्पेनमधील ब्रिटीश राजदूत यांची मुलगी, आर्थर वेलस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टनची मुलगी लेडी जेन वेलेस्ली, डेविना शेफील्ड, मॉडेल फिओना वॉटसन, सुसान जॉर्ज, लेडी सारा स्पेन्सर, लक्झेंबर्गची राजकुमारी मारिया अ‍ॅस्ट्रिड, डेल, बॅरोनेस जेन टायरोन, जॅनेट आणि जेन वॉर्ड.

आता जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी निगडित वाद

चार्ल्सची धर्मादाय संस्था आहे - प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड. पैसे घेऊन सन्मान देण्याच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप त्यांच्या संस्थेवर आहे. गेल्या वर्षी हा मुद्दा चर्चेत आला होता. 'द संडे टाईम्स' आणि 'द डेली मेल' या दोन ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रिन्स चार्ल्सची संस्था इतर देशांतील धनाढ्यांकडून पैसे घेऊन त्यांना नाईटहूड आणि नागरिकत्व मिळवून देण्यात गुंतल्याचे उघड केले आहे. सौदी अरेबियाच्या नागरिकाची कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. या आरोपांमुळे प्रिन्स संस्थेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला राजीनामा द्यावा लागला होता.

चार्ल्सवर 2013 मध्ये ओसामा बिन लादेनच्या कुटुंबाकडून देणग्या स्वीकारल्याचाही आरोप आहे. प्रिन्स चार्ल्सने लंडनमध्ये अल-कायदा संस्थापकाचे सावत्र भाऊ शेख बकर आणि शफीक बिन लादेन यांची भेट घेतली आणि दहा लाख पौंड घेतले, असा आरोप आहे.

पॅराडाईज पेपर्सच्या कागदपत्रात चार्ल्सने गुपचूप आपला पैसा एका ऑफशोअर कंपनीत गुंतवल्याचे उघड झाले आहे. ही कंपनी हवामान बदलावर काम करते.

80 च्या दशकात पद्मिनीचे नाव प्रिन्स चार्ल्ससोबत जोडले गेले होते. प्रिन्स चार्ल्स 1980 मध्ये भारताच्या दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान पद्मिनीला प्रिन्स चार्ल्सला फुलांचा हार घालायचा होता. पद्मिनीने राजकुमाराचे स्वागत केले आणि त्याच वेळी त्याचे चुंबन घेतले.

पद्मिनीने चार्ल्सला किस केले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले होते, त्यांना अशी अपेक्षा नव्हती.
पद्मिनीने चार्ल्सला किस केले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले होते, त्यांना अशी अपेक्षा नव्हती.

त्यावेळी पद्मिनी फक्त 15 वर्षांची होती. प्रिन्स तीच्यापेक्षा दुप्पट वयाचा होता. जेव्हा पद्मिनीने हे केले तेव्हा राजकुमारालाही आश्चर्य वाटले. आजही ही घटना वादग्रस्त मानली जाते.

राजवाड्यात राहण्याची इच्छा नाही

अलीकडेच 'द संडे टाईम्स'ने राजघराण्यातील व्यक्तींचा हवाला देत म्हटले आहे की, प्रिन्स ऑफ वेल्सला राजा झाल्यावर लंडनमधील ऐतिहासिक शाही घरात राहण्याची इच्छा नाही. वास्तविक, 775 खोल्यांच्या या राजवाड्यात राहणे आधुनिक जीवनासाठी योग्य वाटत नाही.

1837 पासून बकिंगहॅम पॅलेस हे ब्रिटीश राजघराण्याचे अधिकृत घर आहे. राणी व्हिक्टोरिया येथे प्रथमच आली होती. त्याचे मूळ नाव बकिंगहॅम हाऊस होते आणि ते 1703 मध्ये बांधले गेले. 1761 मध्ये राजा जॉर्ज तिसरा याने त्याचा ताबा घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...