आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Production Of Sanitizer And Installation Of Oxygen Plant Within The University Campus Is Suggested, Now Studies Will Be Done Through Blended Education Model

भास्कर एक्सक्लूझिव्ह:UGC ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सुरु करु शकते विद्यापीठे, कॅम्पसमध्येच सॅनिटायझर प्रॉडक्शन आणि ऑक्सिजन प्लांट लावण्याच्या सूचना

संध्या द्विवेदीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • UGC ने कॅम्पस उघडण्यासाठी ICMR चे संचालक बलराम भार्गव यांच्यासह अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेतली आहे.

कोविडमुळे देशभरातील विद्यापीठे बंद आहेत. तज्ज्ञ म्हणतात की, कोरोनाचा काळ अजून बराच मोठा असेल. त्यामुळे आता आपल्याला त्याबरोबर जगण्याची सवय लागावी लागेल. पण आता कोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि आणि UGCने कोरोना दरम्यान कॅम्पस अनलॉक करण्यासाठी काय करावे याचा विचार करण्यास सुरवात केली आहे.

UGC सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'विद्यापीठे उघडण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु आमचा प्रयत्न आहे की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठे पुर्णवेळ नाही परंतु काही वर्गांसाठी उघडली जावीत. यापूर्वी, कॅम्पसमध्ये कोरोना रोखण्यासाठी काय करावे याबद्दल गाइडलाइन तयार केल्या जातील.'

UGC ने कॅम्पस उघडण्यासाठी ICMR चे संचालक बलराम भार्गव यांच्यासह अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेतली आहे. या व्हर्च्युअल सेशनमध्ये एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, WHOच्या सदस्या सौम्या स्वामीनाथन, मेदांताचे डॉ. नरेश त्रेहन यांच्यासह अनेक तज्ज्ञ सहभागी झाले होते. या वर्कशॉपमधील मुख्य मुद्दा म्हणजे विद्यार्थी आणि कर्मचा-यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवत कॅम्पस कसे अनलॉक केले जाऊ शकतात हा होता.

कॅम्पस सुरु झाल्यावर काय बदल होऊ शकतात
UGC ने अद्याप यासंदर्भात कोणतेही मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केलेले नाही, परंतु कोरोना दरम्यान विद्यापीठे सुरु झाल्यास, कॅम्पसमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था करता येईल याविषयी यूजीसीच्या कार्यशाळेत तज्ज्ञांशी बोलताना काही गोष्टी समोर आल्या आहेत -

  • UGC चे अतिरिक्त सचिव पंकज मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, 'कॅम्पस उघडल्यावर विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही सर्वात मोठी समस्या असेल. म्हणूनच, कॅम्पस उघडल्यावरही सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले जाऊ शकत नाही. या प्रकरणात, शिक्षणाची ब्लेंडेड मेथड वापरली जाईल. म्हणजेच ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे मिक्स मॉडेल अवलंबले जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल असलेले विषय आहेत किंवा ज्यांना क्लास रुम टीचिंग आवश्यक आहे त्यांना कॅम्पसमध्ये बोलावले जाऊ शकते आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरु ठेवता येतील.'
  • कोरोना काळ लक्षात घेता UGC नेही परीक्षेसाठी नवीन नियम बनवला आहे. यानुसार विद्यार्थी ज्या विषयाची निवड करतो त्याच्या 40 टक्के सिलॅबसची तो ऑनलाइन परीक्षा देऊ शकतो. ब्लेंडेड मेथड अंतर्गत व्हिडिओ लेक्चर्स, पॉडकास्ट, ऑनलाइन मटेरियलसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या SWAYAM MOOCs प्लॅटफॉर्मवर 2000 हून अधिक ऑनलाईन विनामूल्य कोर्स आहेत. दुर्गम भागात राहणारे विद्यार्थी हे पोर्टल वापरू शकतात. यासाठी फक्त विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
  • भागलपूरच्या तिलका मांझी विद्यापीठाच्या कुलगुरू नीलिमा गुप्ता सांगतात की, 'यावर्षी मार्चपूर्वी मी कानपूर विद्यापीठात होते. तेथे मी विद्यापीठ परिसरातील फार्मा विभागांतर्गत सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले. माझ्या मते, निवासी विद्यापीठ कॅम्पसमध्ये हजारो लोक राहतात. कोरोना पाहता तेथे शहरासारखी योजना बनविली पाहिजे. सॅनिटायझरशिवाय या महामारीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. अशा परिस्थितीत जिथे शक्य असेल त्या कॅम्पसमध्ये ऑक्सिजन प्लांट लावले पाहिजेत.'

विद्यापीठांचा निधी वाढवावा लागेल
निहु विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. एस.के. श्रीवास्तव म्हणतात की, 'भारत सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, मास्क लावण्याबरोबरच सामाजिक अंतर आणि व्हेंटिलेशन देखील आवश्यक आहे. परंतु अशी अनेक विद्यापीठे आहेत जिथे वसतिगृहे, वर्गखोल्या, बाथरूम, मेस, ग्रंथालयांमध्ये व्हेंटिलेशनची योग्य व्यवस्था नाही. त्यात संरचनात्मक बदल करावे लागतील. या व्यतिरिक्त, कोरोना दरम्यान कॅम्पस उघडण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता असेल.'

UGC चे अतिरिक्त सचिव पंकज मित्तल निधीच्या प्रश्नावर म्हणतात की, 'हे सर्व बदल दोन महिन्यांत होणार नाहीत, याची योजना आखल्यानंतर चर्चा होईल. यानंतर यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड कॅम्पसमधील बदल हे नियोजन अंतर्गत असतील. सॅनिटाइजेशन, मास्किंग, सामाजिक अंतर हे विद्यापीठाच्या निकषांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत, परंतु जेव्हा सर्व विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतील तेव्हा खरे आव्हान असेल.'

बातम्या आणखी आहेत...