आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओरिजिनल:चीनची शक्ती कमी, प्रचार जास्त; २0 % दराने कर्ज वाढतेय, हे जीडीपीच्या तिप्पट अधिक

दिव्य मराठी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ग्लोबल पाॅवर प्ले’मध्ये भारताची महत्त्वाची भूमिका
  • भारत हिंद महासागरातील चीनची अडचण वाढवू शकतो

“चीन नक्कीच शक्तिशाली आहे. परंतु इतकाही नाही की भारत, अमेरिका, जपान सारख्या देशासोबत एकाच वेळी शत्रुत्व पत्करू शकेल. चीन ताकदीपेक्षा जास्त गुंडगिरी करत आहे. तो सुपर पॉवर नाही व बनूही शकत नाही.” ही वाक्ये आहेत प्रो. जॉन ली यांची. प्रा. ली सिडनी विद्यापीठ आणि अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमध्ये चीनची राजकीय अर्थव्यवस्था व इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, आपण येत्या काळातील सुपर पॉवर आहोत हे चीनला दाखवून द्यायचे आहे. पण सत्य वेगळे आहे. येथे लवकरच तरुणांपेक्षा वृद्धांची लोकसंख्या जास्त होईल. भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भास्करचे रितेश शुक्ला यांनी प्रा. ली यांच्याशी संवाद साधला.

> अर्थव्यवस्थेचे पोकळ दावेे: चीनच्या कंपन्यांनी देशाच्या जीडीपीच्या दुप्पट कर्ज घेतले आहे...

चीनकडे ३ लाख कोटी डॉलर्सचे परकीय चलन आहे. लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठीही त्याने त्यातील काही भाग खर्च केला तर अर्थव्यवस्था कोलमडेल. आणखी एक चूक म्हणजे चीनने अमेरिकेला इतके कर्ज दिले आहे की तोे त्याच्या तावडीत सापडू शकतो. प्रत्यक्षात चीनकडे अमेरिकेची आर्थिक सुरक्षा केवळ ५% आहे. जर चीनने अमेरिकेबरोबर वाद वाढवला तर अमेरिका त्यांचे डॉलर अॅसेट गोठवू शकते. जे चीनला परवडणार नाही. चीनची देशांतर्गत अर्थव्यवस्थाही भक्कम नाही. २००० पासून चिनी सरकारने बँकांना कमी आणि निगेटिव्ह दराने कर्ज देण्यास भाग पाडले आहे. म्हणूनच २००८ पासून सरकारी कर्जाचा वृद्धीदर २०% आहे, जो त्यांच्या जीडीपीच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. चिनी कंपन्या देशाच्या जीडीपीच्या दुप्पट कर्ज घेतात. त्यांचे कर्ज जीडीपीच्या तिप्पट जास्त आहे.

> अंतर्गत विरोध दडपण्यासाठी पोलिसांचे बजेट २२० अब्ज डॉलर्स, संरक्षणाचे 200 अब्ज डॉलर्स...

चीन हा एकमेव असा देश आहे, ज्याचे संरक्षण बजेट त्याच्या अंतर्गत सुरक्षा बजेटपेक्षा कमी आहे. त्यांची अंतर्गत व्यवस्था इतकी कमकुवत आहे की, सरकारला सशस्त्र पोलिसांवर वर्षाकाठी २२० अब्ज डॉलर्स खर्च करावा लागतो. संरक्षण बजेट २०० अब्ज डॉलर्स आहे. पोलिसांवरील खर्चाचा यात समावेश नाही. चीनमध्ये सरकारविरोधात १ लाखाहून अधिक हिंसक निदर्शने होतात आणि पोलिस ते दडपून टाकतात. कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व कसे धोक्यात आहे हे जगालाही ठाऊक नाही.

> नियंत्रण रेषेवरील कारवाईने भारताचा संयम मोडला : 

चीनने लडाखमध्ये भारतासोबत वाद ओढवून घेत मोठी चूक केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान भारताला सोबत घेवून चीनला कोंडीत पकडण्याची योजना आखत होते. परंतु भारत या एकमेव आशेवर संयम बाळगत आहे की, तो चीनसह मोठ्या देशांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो. परंतु नियंत्रण रेषेवरील कारवाईने चीनने भारताचा संयम तोडला. आम्हीच भविष्यातील सुपर पॉवर अाहोत, हे चीनला दाखवून द्यायचे आहे. पण सत्य वेगळे आहे. कोणताही देश जगात कोठेही लष्करी कारवाई करण्यास सक्षम आणि आर्थिकदृष्टया मजबूत असतो, तेव्हा तो सुपर पॉवर असतो. या मापदंडावर चीनची वास्तविक स्थिती फारशी चांगली नाही.

> चीन वेगाने वृद्ध होत आहे : 

तरुण आणि वृद्धांमधील समतोल साधण्यासाठी प्रत्येक कुटुंबात सरासरी २.१ मुले जन्मावीत. जेणेकरून दर वर्षी जितके लोक सेवानिवृत्त होतील, त्यापेक्षा जास्त तरुण असतील. २०१७ मध्ये चीनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या लोकांपेक्षा रोजगारक्षम तरुणांची संख्या अतिशय कमी होती. चीनमध्ये प्रत्येक कुटुंबात सरासरी १.५ मुले जन्माला येतात. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी आहे. भारताची सरासरी २.२ आहे. २०३० पर्यंत चीनचे लोकसंख्याशास्त्र पश्चिम युरोप आणि २०४० पर्यंत जपानसारखे होईल. परंतु त्याची संपन्नता या देशांसारखी होणार नाही. श्रीमंत होण्यापूर्वी चीन वृद्ध होईल हे निश्चित आहे. आरोग्य सेवा आणि पेन्शन सुविधांकडे चीनने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या काळात वृद्ध लोकसंख्येला सांभाळण्याची जबाबदारी चिन सरकारला घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत चीनची ताकद कमी होईल.

भारत हिंद महासागरातील चीनची अडचण वाढवू शकतो

भारताने ठरवले तर तो हिंद महासागरात चीनला मोठ्या अडचणीत आणू शकतो. चीन समुद्रीमार्गाने तेल आयात करतो. तसेच आवश्यक ५०% खाद्यपदार्थ याच मार्गावरून येतात. ही भारतासाठी एक अनपेक्षित संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...