आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टबँकेने हरवली संपत्तीची कागदपत्रे:ग्राहकाला मिळाले 1.65 लाख रुपये; दागिने हरवल्यास तुम्हाला मिळेल भरपाई?

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

प्रकरण लुधियानातील आहे. राकेश कुमार आणि त्यांच्या पत्नी सरिताने दहा वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ पतियाळाकडून 15 लाख 50 हजारांचे कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या संपत्तीच्या नोंदणीची कागदपत्रे बँकेकडे ठेवली होती.

कर्ज फेडल्यानंतर जेव्हा त्यांनी संपत्तीची कागदपत्रे मागितल्यावर कळाले की बँकेने ती गहाळ केली आहेत. ग्राहक मंचात तक्रार केल्यानंतर बँकेने त्यांची चूक मान्य केली आणि ग्राहकाला 1.65 लाखांची नुकसान भरपाई दिली.

कामाच्या गोष्टीत आज आपण यावरच बोलणार आहोत की, आपण बँकेत ज्या मौल्यवान वस्तू गहाण किंवा सुरक्षित ठेवतो, त्या हरवल्यास आपण काय केले पाहिजे? सोबतच जाणून घेऊया की घरातून संपत्तीची कागदपत्रे हरवल्यास आपण काय करू शकतो? आमच्यासोबत कायदेतज्ज्ञ आहेत - अॅडव्होकेट अशोक पांडे, मध्य प्रदेश हायकोर्ट

प्रश्न 1 - संपत्तीची कागदपत्रे म्हणजेच सेल डीड हरवल्याचे नुकसान काय?

उत्तर - तुम्ही तुमची संपत्ती कुणालाही विकू शकणार नाही. भविष्यात तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास, कागदपत्रांशिवाय कर्ज घेता येणार नाही.

प्रश्न 2 - सध्याच्या प्रकरणात ग्राहक मंचाने बँकेला कोणत्या आधारावर दंड ठोठावला?

उत्तर - दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मंचाचे अध्यक्ष केके करीर आणि सदस्य जसविंदर सिंह यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. कारण सेल डीडशिवाय कोणतीही संपत्ती विकता येत नाही किंवा तिच्यावर कर्ज घेता येत नाही.

बँकेने सेल डीड हरवून ग्राहकाला चांगली सेवा दिली नाही. याच कारणामुळे सेल डीड हरवल्याने 1 लाख 40 हजार दंडाशिवाय 25 हजार रुपये कायदेशीर खर्च तक्रारदाराला देण्याचा निर्णय मंचाने दिला.

प्रश्न 3 - संपत्तीशी निगडित कागदपत्रे हरवल्यानंतर, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी नोटराईज्ड करावे लागते का?

उत्तर - कागदपत्रे नोटराईज्ड करण्याची गरज नाही. तुम्ही निबंधक कार्यालयातून संपत्तीची कागदपत्रे काढून घ्यावी हेच योग्य राहील.

प्रश्न 4 - सर्व नक्कल कागपत्रांचे महत्व मूळ कागदपत्रांइतकेच असते का?

उत्तर - निबंधक कार्यालयातून काढलेल्या प्रमाणित प्रतचे महत्व मूळ कागदपत्राइतकेच असते.

प्रश्न 5 - हल्ली बहुतांश लोक फ्लॅटमध्ये राहतात, यासाठी वेगळे नियम लागू होतात का?

उत्तर - नाही, तसे पाहिल्यास सर्व नियम सारखेच आहेत. जिथे बहुमजली इमारती आहेत त्या शहरात असे नियम लागू होतात. यात संपत्तीची कागदपत्रे किंवा सेल डीड हरवल्यानंतर तुम्हाला FIR करण्यासही याची मदत घ्यावी लागेल.

वेगवेगळ्या राज्यांत फ्लॅट आणि अपार्टमेन्टसाठी कायदे वेगळे आहेत - जसे, मध्य प्रदेशात मध्य प्रदेश सेल ओनरशिप अॅक्ट 2000(अपार्टमेन्ट अॅक्ट), महाराष्ट्रात को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अॅक्ट आणि दिल्लीत दिल्ली अपार्टमेन्ट ओनरशिप अॅक्ट 1986. तुम्ही यानुसारही कायदेशीर मदत घेऊ शकता.

प्रश्न 6 - बँकेच्या लॉकरमध्ये कागदपत्रांऐवजी दागिने आणि दुसऱ्या मौल्यवान वस्तूही ठेवल्या जातात. जर लॉकरमधील सामान हरवले, तर ग्राहक मंचात जाता येते का?

उत्तर - बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने, इतर मौल्यवान वस्तू हरवल्यासही ग्राहक मंचात जाता येते. अमिताभ दासगुप्ता विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या 19 फेब्रुवारी 2021 मधील निर्णयानुसार, ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूच्या रक्षणाची जबाबदारी ही बँकेची आहे. असे न केल्यास ग्राहकाकडे ग्राहक मंचात जाण्याचा पर्याय आहे. तो तिथे बँकेविरोधात दाद मागू शकतो.

बँक लॉकरविषयी सुप्रीम कोर्टाचा आदेश

सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेला हे निर्देश दिले होते की, त्यांनी सहा महिन्यांच्या आत बँक लॉकरसाठी नियम बनवावे. या आधारे सर्व बँकांनी 1 जानेवारी 2023 पर्यंत आपल्या विद्यमान लॉकर ग्राहकांसोबतच्या कराराचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे.

लॉकरमध्ये सामान ठेवण्याचे नवे दिशानिर्देश

 • एखाद्या बँकेत आग, चोरी, दरोडा, इत्यादी कारणामुळे ग्राहकाच्या लॉकरमधील सामान गायब झाल्यास बँकेला त्या लॉकरच्या भाड्याच्या 100 पटीत दंड द्यावा लागेल.
 • हा नियम नव्या आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या लॉकर ग्राहकांसाठी लागू आहे.
 • बँक हा दावा करू शकत नाही की आग, चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळल्याने किंवा बँक कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे ते लॉकरमधील सामानाच्या नुकसानीसाठी जबाबदार नाही.

या परिस्थितीत भरपाई मिळणार नाही

 • रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, वीज कोसळणे अशा कारणांनी जर लॉकरमधील सामानाचे नुकसान झाले तर यासाठी बँक जबाबदार नसेल. ग्राहकाला कोणतीही भरपाई मिळणार नाही.
 • याचा अर्थ असा नाही की बँकेने त्यांची जबाबदारी झटकावी. अशा आपत्तीतही लॉकर सुरक्षित ठेवण्याची पुरेशी व्यवस्था बँकेला करावी लागेल.

आता जुन्या नियमावर एक नजर टाकूया

रिझर्व्ह बँकेच्या 2017 मधील दिशानिर्देशांनुसार...

 • अशा घटनेसाठी बँक कदापिही जबाबदार नाही.
 • लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान सामानाची चोरी झाल्यास बँक भरपाई देणार नाही.
 • दरोडा, आग लागल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बँक करणार नाही.
 • या गोष्टींचा उल्लेख बँकेत लॉकर उघडताना ज्या करारावर तुम्ही स्वाक्षरी करता, त्यात असतो.
 • बँक असाही सल्ला देते की, जे सामान तुम्ही बँकेत ठेवत आहात, त्याचा विमा उतरवून घ्या.

बँकेच्या लॉकरमधून सामान गायब झाल्यास काय करू शकता?

 • जर तुम्हाला वाटते की बँकेच्या लॉकरमधून गायब झालेल्या सामानासाठी बँक जबाबदार आहे आणि बँक भरपाई देत नाही, तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकता.
 • लॉकरमध्ये तुम्ही जे सामान ठेवले आहे, त्याची यादी तयार करा. सोबतच त्या सामानाचे बिलही जवळ जपून ठेवा. पुरावा म्हणून याची गरज पडू शकते.
 • सर्वात महत्वाचे ज्या बँकेत तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवणार आहात, त्याचे स्थान, तेथील सुरक्षा व्यवस्था, दुसऱ्या ग्राहकांचे अनुभव नक्कीच जाणून घ्या.
 • लॉकर घेताना करार वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका, लक्षपूर्वक वाचल्यानंतरच स्वाक्षरी करा.

जाता-जाता

कोणत्या मंचात किती रकमेपर्यंतच्या सेवेसाठी तक्रार करता येईल हे कसे ठरवले जाते?

उत्तर - ग्राहक मंचात तक्रारीसाठी एक नियम आहे. एका निश्चित रकमेच्या सेवेच्या आधारेच फोरम ठरवण्यात आले आहेत.

जिल्हा ग्राहक मंच

1 कोटी रुपयांपर्यंतच्या सेवेचे प्रकरण असल्यास याची तक्रार जिल्हा ग्राहक मंचात करता येते.

राज्य ग्राहक मंच

1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतच्या सेवेचे प्रकरण असल्यास राज्य ग्राहक मंचात तक्रार करता येते.

राष्ट्रीय ग्राहक मंच

10 कोटींपेक्षा जास्त सेवेच्या प्रकरणासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते.

कामाच्या गोष्टीतील या बातम्याही वाचा...

1. उंदीर मारल्याने FIR, शवविच्छेदनासाठी आणला मृतदेह:उंदीर कपडे कुरतडत असेल किंवा धान्य खात असेल तर, काय करावे?

उत्तर प्रदेशातील बदंयूमध्ये एका तरुणाने उंदीराला मारले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुमारे 10 तास त्याची चौकशी केली.​​​​​​​(वाचा पूर्ण बातमी)

2. बायकोशी रोज भांडण होते:मुलांचा राग येतो, हिवाळ्यात शरीरासह मेंदूही आजारी पडू शकतो

हिवाळा सुरु झाला आहे. या ऋतूत तुमचे शारीरिक आरोग्य बिघडते. जसे की - सर्दी, खोकला आणि कोरडी त्वचा. याशिवाय हिवाळ्यात सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजेच SAD होते. हे एक प्रकारचे नैराश्य आहे, जे हवामान बदलासह होते. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत याची लक्षणे दिसतात आणि नंतर नाहिशी होतात. SAD ची सामान्य लक्षणे आहेत - चिडचिडेपणा, चिंता, औदासिन्य, थकवा आणि आत्मविश्वास कमी होणे.​​​​​​​(वाचा पूर्ण बातमी)

3. तुम्ही खात असलेला गूळ, मध नकली तर नाही?:भेसळयुक्त पदार्थांनी व्हाल आजारी; असा तपासा अस्सलपणा

​​​​​​​

थंडी वाढल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. प्रतिकारशक्ती कमजोर होते. शरीराची उष्णता कायम ठेवण्यासह निरोगी राहण्यासाठी मध, अंड्यासारख्या पदार्थांचे आपण सेवन करतो. मात्र बाजारात या वस्तू नकलीही मिळतात. त्यामुळे खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

आज कामाच्या गोष्टीत आपण मध, गूळ, अद्रक आणि अस्सल अंडे कसे ओळखावे ते सांगणार आहोत. हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हेही सांगणार आहोत.(वाचा पूर्ण बातमी)

बातम्या आणखी आहेत...