आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघटना राजस्थानच्या सीकरमधील आहे. इथे पवन नावाच्या व्यक्तीने गर्लफ्रेंडसाठी आपली आई आणि बायकोला घराबाहेर काढले. त्याने घर मिळवण्यासाठी दबाव टाकत आईकडून काही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली.
पवन आणि आशाला दोन मुले आहेत. तो आशाला मारहाण करायचा. घरखर्चासाठी पैसेही देत नव्हता. तर पवनची गर्लफ्रेंडही एका मुलाची आई आहे.
आज कामाच्या गोष्टीत पत्नी आणि आईच्या हक्काविषयी बोलूया. जाणून घेऊया की बळजबरी स्वाक्षरी घेण्याविषयी काय कायदा आहे. आईच्या संपत्तीवर मुलाचा किती अधिकार आहे. पत्नी आणि मुलांचे अधिकार काय आहेत...
आमचे तज्ज्ञ आहेत - नवनीत मिश्रा, अॅडव्होकेट लखनौ हायकोर्ट आणि अशोक पांडे, अॅडव्होकेट मुंबई आणि मध्य प्रदेश हायकोर्ट
प्रश्नः आईच्या संपत्तीवर मुलाचा किती अधिकार असतो?
उत्तरः वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगा आणि मुलगी दोघांचा अधिकार असतो. आईने स्वतः संपत्ती मिळवली असेल किंवा जी संपत्ती तिचे पती म्हणजेच मुलाच्या वडिलांची आहे आणि आईच्या नावे आहे त्यावर त्याचा अधिकार नसेल. हे तोपर्यंत असेल जोपर्यंत आई ती संपत्ती स्वतः कुणाच्या नावे करून देत नाही.
यावर सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय आलेला आहे. आई-वडिलांना इच्छा असल्यावर ते आपल्या मुलांना आपली संपत्ती देऊ शकतात.
प्रश्नः आईने एफआयआर केला आहे. कायदेशीररित्या मुलाला घराबाहेर काढल्यास आई आपली संपत्ती सुनेच्या नावे करू शकते?
उत्तरः जर आईने मुलाविरोधात एफआयआर केला आहे आणि आईने स्वतः अर्जित केलेली संपत्ती आहे, तरच ती सुनेच्या नावे करू शकेल.
सुनेचा सासरच्या संपत्तीवर केव्हा आणि कसा अधिकार असतो?
प्रश्नः आई-वडिलांच्या सेवेविषयी देशात कायदा काय म्हणतो?
उत्तरः ज्येष्ठ नागरिक कायदा 2019 नुसार जर मुले आपल्या आई-वडिलांची देखभाल करत नसल्यास ते या आधारे त्यांना आपल्या संपत्तीतून हिस्सा देण्यास नकार देऊ शकतात.
आई-वडिलांकडे त्यांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार आहे. जर आई-वडील शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यास सीनियर सिटिझन मेन्टेनन्स अँड वेल्फेअर अॅक्ट-2007 नुसार ते मुलांकडून पालन-पोषणाची मागणी करू शकतात.
प्रश्नः मुलाने बळजबरी आईची सही घेतली, हे सिद्ध झाल्यास त्याला काय शिक्षा होईल?
उत्तरः जर हे सिद्ध झाले की मुलाने दबाव टाकून आईकडून संपत्तीच्या कागदपत्रांवर सही घेतली आहे, तर यासाठी एक्स्टॉर्शन, क्रिमिनल इंटिमिडेशन, चीटिंग आणि फोर्जरी, ब्लॅकमेलिंग, क्रिमिनल कॉन्स्पिरसीअंतर्गत कायदेशीररित्या शिक्षेची तरतूद आहे.
प्रश्नः जर मुले घरात वृद्ध पालकांची सेवा करत नसल्यास काय होईल?
उत्तरः वृद्ध आई-वडील किंवा ज्येष्ठ नागरिकांची सेवा न करणे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे एक गुन्हा आहे. यासाठी 5000 रुपये दंड किंवा तीन महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते.
प्रश्नः आई-वडीलंपैकी कुणीतरी एक जिवंत असल्यास, त्या स्थितीत त्यांची संपत्ती कुणी हिरावून घेऊ शकते का? (कागदपत्रे आई-वडिलांकडून हिरावलेली असल्यास)
उत्तरः नाही, जोपर्यंत आई-वडील जिवंत आहे, त्यांच्या संपत्तीवर त्यांच्या इच्छेविरूद्ध कुणीही आपला अधिकार सांगू शकत नाही.
जर कागदपत्रांवर बळजबरीने स्वाक्षरी घेतली असल्यासही याने फरक पडत नाही. कारण संपत्ती हस्तांतरित होण्यासाठी गिफ्ड डीड किंवा सेल डीड, रजिस्ट्री, रेल डीड किंवा मृत्यूपत्र यापैकी कोणत्याही एकाची कायदेशीररित्या गरज असते.
जर बनावट पद्धतीने कागदपत्रे हस्तांतरित केलेली असतील तर याची तक्रार अधिकाऱ्यांकडे करता येते.
प्रश्नः आईने आपल्या मुलाविरोधात एफआयआर केल्यावर बळजबरीने ताब्यात घेतलेले घर पोलिस रिकामे करवून घेऊ शकतात का?
उत्तरः होय, नक्कीच. पोलिसांकडे याचा अधिकार आहे.
जर आईने मुलाविरोधात एफआयआर केली असेल आणि याची तक्रार पोलिसांकडे केली असेल तर असे शक्य आहे.
प्रश्नः या प्रकरणात मुलाने आपल्या पत्नीलाही घराबाहेर काढले आहे, दोघांना मुलेही आहेत. या स्थितीत पत्नीचे अधिकार काय आहेत?
उत्तरः पतीने जर मुलांसह पत्नीला घराबाहेर काढल्यास, त्या स्थितीत कौटुंबिक हिंसेप्रकरणी पत्नी पतीविरोधात खटला दाखल करू शकते.
क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 कायद्यानुसार पत्नी आणि मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी पतीवर असते. CrPC चे कलम 125 नुसार पत्नी पोटगीची मागणी करू शकते. असे न केल्यास पतीला तुरुंगवास होऊ शकतो.
प्रश्नः पत्नीला केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत पोटगी मिळायला हवी?
उत्तरः
प्रश्नः पत्नीला धोका दिल्यावर पतीला काय शिक्षा मिळते?
उत्तरः कौटुंबिक कोर्टात कलम 125 नुसार खटला दाखल करता येतो. पत्नी कौटुंबिक हिंसा, फसवणूक किंवा केलेल्या गुन्ह्याची तक्रार ठाण्यात करू शकते आणि याअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास पतीला शिक्षेची तरतूद आहे.
प्रश्नः पती दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्यास किंवा दुसरे लग्न केल्यास मुलांना कोण सांभाळते? त्यांच्या शिक्षणाचा खर्च देण्याचा नियम काय आहे?
उत्तरः पती जर दुसऱ्या महिलेसाठी आपती पत्नी आणि मुलांना सोडत असेल तेव्हा पत्नी पोटगीसाठी अर्ज करू शकते. खर्च मिळवून देण्याची जबाबदारी कोर्टाची असते.
प्रश्नः पत्नी आणि मुलांना किती पोटगी मिळू शकते?
उत्तरः जर पत्नी आणि मुलांकडून कोर्टात पोटगीचा अर्ज करण्यात आला असेल तर या स्थितीत पतीच्या मासिक उत्पन्नाच्या 20 ते 30 टक्के रक्कम देण्याचा निर्णय कोर्टात होतो.
प्रश्नः पोटगी न दिल्यास काय होते?
उत्तरः पोटगी न दिल्यास पत्नी आणि मुलांच्या नावे रिकव्हरी ऑफ ड्यूस किंवा आरडी पिटिशीन कोर्टात नोंदवली जाते. तेव्हा कोर्ट वसूल वॉरंट त्या व्यक्तीच्या नावे काढते.
तरीही पैसे दिले नाही तर पतीविरोधात अटक वॉरंट निघते.
दिव्य मराठी ओरिजनलमधील ही कामाची गोष्टीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.