आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • If A Child Is Born In 'Live In', Property Will Have To Be Given, Even Children Born Through Rape, Illicit Relationship

शारीरिक संबंध महागात पडणार:'लिव्ह इन'मध्ये मुल जन्मल्यास मालमत्ता द्यावी लागेल, अवैध संबंधातून जन्मलेले मुलेही वाटेकरी

अलिशा सिन्हा12 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

केरळ उच्च न्यायालयाने एका तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नाही, कारण त्याच्या पालकांचे लग्न झालेले नाही. लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान या तरुणाचा जन्म झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला असून, यामध्ये म्हटले की,

 • दोघांचेही लग्न झाले नसेल, पण दोघेही पती-पत्नी म्हणून बराच काळ एकत्र राहत होते.
 • अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा पूर्ण हक्क आहे.

हा मुद्दा झाला लिव्ह-इन रिलेशनशिप दरम्यान जन्मलेल्या मुलाचा. मात्र, ज्या मुलांचा जन्म लग्नाशिवाय, घटस्फोटानंतर किंवा दुसर्‍या लग्नानंतर झाला आहे, त्यांच्या मालमत्ता अधिकारांचे काय? मुलांच्या संदर्भात मालमत्ता अधिकारांवर कायदा काय म्हणतो? आम्ही कौटुंबिक आणि फौजदारी कायदे तज्ञ वकील सचिन नायक यांच्याशी याबाबत संवाद साधला.

चला तर मग जाणून घेऊया एकामागून एक प्रश्नांची उत्तरे...

1. प्रश्न: पती-पत्नी एकत्र राहतात. जर पतीचे दुस-या स्त्रीशी प्रेमसंबंध असेल आणि तिच्यापासून मूल झाले तर मालमत्तेचे विभाजन कसे होईल?

उत्तर: या प्रकरणात 2 प्रकारच्या मालमत्तेची गणना केली जाईल

 • पहिली जी वडिलांनी (पतीने) स्वतः बनवली आहे.
 • दुसरी जी वडिलांना आईवडिलांकडून मिळाली आहे.

लग्नानंतर जन्मलेली मुले...

 • वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल.
 • आजी-आजोबांच्याही संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल.

अफेअर दरम्यान जन्मलेली मुले…

 • हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 अन्वये फक्त वडिलांच्या मालमत्तेवर हक्क असेल.
 • या मालमत्तेवर आजी-आजोबांचा हक्क असेल की नाही, हे अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

2. प्रश्न: पहिल्या पत्नीपासून 2 मुले आहेत आणि घटस्फोट नाही. दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तिच्यापासून 1-2 किंवा अधिक मुले झाल्यास काय होईल?

उत्तर- अशा परिस्थितीत वर लिहिलेल्या नियमांनुसार मालमत्तेची विभागणी केली जाईल आणि वडिलांच्या मालमत्तेत सर्व मुलांना समान वाटा मिळेल, परंतु जर वडिलांनी इच्छापत्र लिहिले असेल तर ज्यांचे नाव त्यामध्ये लिहिलेले असेल त्यांचाच मालमत्तेवर हक्क असेल.

जसे-

 • मृत्यूपत्रात वडिलांनी संपूर्ण मालमत्ता पत्नीच्या मुलांना दिली आहे. मग लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलांना मालमत्ता मिळणार नाही.
 • जर वडिलांनी संपूर्ण संपत्ती लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलांच्या नावावर लिहून ठेवली असेल तर पत्नीच्या मुलांचा मालमत्तेवर अधिकार राहणार नाही.

3. प्रश्न: मला पहिल्या पत्नीपासून 1 मूल आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीला 2 मुले असतील तर वडिलांच्या मालमत्तेचे विभाजन कसे होईल?

उत्तर: कायदेशीर विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्या मालमत्तेवर समान हक्क असतील. कुणाला कमी मिळणार नाही की कुणाला जास्त संपत्ती मिळणार नाही.

4. प्रश्न: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये मूल असेल आणि नंतर त्या पुरुषाने दुसऱ्या महिलेशी लग्न केले, तर वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा हक्क असेल?

उत्तरः विवाहातून जन्मलेल्या मुलाचा वडिलांच्या मालमत्तेवर आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलाचा समान हक्क असेल. मात्र, आजी-आजोबांच्या मालमत्तेवर त्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.

5. प्रश्न: बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाचा बायोलॉजिकल वडिलांच्या मालमत्तेवर काय अधिकार आहे?

उत्तर : 2015 मध्ये एक प्रकरण समोर आले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आपल्या एका आदेशात म्हटले होते की, बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाचा त्याच्या जैविक वडिलांच्या मालमत्तेत हक्क आहे. मात्र, हा अधिकार वैयक्तिक कायद्याचा विषय आहे. मुलगा किंवा मुलगी हे केवळ त्या जैविक वडिलांचे अवैध मूल म्हणून पाहिले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुलगा किंवा मुलगी एखाद्याने दत्तक घेतल्यास त्याचा जैविक वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क संपतो.

हे देखील महत्त्वाचेच, जाणून घ्या

ज्यांना आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या दोन्ही मालमत्तेवर आपला हक्क आहे, असे वाटते, त्यांनी आधी हे वेगवेगळे आहेत, हे समजून घ्यावे. दोन्ही मालमत्ता वेगवेगळ्या आहेत.

पालकांची मालमत्ता- याला स्व-अधिग्रहित मालमत्ता असेही म्हणतात. आई-वडील त्यांना हवी असलेली मालमत्ता देऊ शकतात. किंवा तुम्ही मुलांना तुमच्या मालमत्तेतून बेदखल करू शकता. ते फक्त मुलांनाच देण्याची गरज नाही. जर आई-वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी मालमत्ता कुणाला हस्तांतरित केली नसेल, तर मुलगा आणि मुलगी यांना त्यात समान अधिकारी आहेत.

आजी-आजोबांची मालमत्ता- याला वडिलोपार्जित मालमत्ता असेही म्हणतात. आजी-आजोबांच्या नावावर मालमत्ता असेल, तर त्यामध्ये नातू, नात, नात किंवा नातवाचा समान हक्क आहे. वडिलोपार्जित मालमत्ता विकली किंवा वाटून घेतली तर त्यात मुलींनाही वाटा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन झाल्यावर, प्रत्येक वारसाला मिळालेला हिस्सा ही त्याची स्वतःची अधिग्रहित मालमत्ता होईल.

बातम्या आणखी आहेत...