आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टपाऊस आणि दमट उष्णतेमुळे अ‍ॅलर्जी:संसर्गाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक, छोट्या-छोट्या मुरुमांमुळे देखील सडतात हाडे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच मे महिना सुरू झाला आहे. पण यातही ढगांचा गडगडाट आणि आभाळातून बरसणारे पाणी यामुळे पावसाळा आल्याचा भास होतोय.

पाऊस थांबताच कडक उन्हाचा तडाखा जाणवतो. अशा काळात आपण ओले झालो तरी त्याचा त्रास होतो आणि जर आपण कडक उन्हात राहिलो तर आर्द्रता आणि घाम येणे यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

आज कामाची गोष्टमध्ये या अवकाळी पावसामुळे तर कधी कडक उन्हामुळे होणाऱ्या त्वचेशी संबंधित समस्यांबद्दल बोलूयात.

प्रश्न: अवकाळी पावसात खाज का येते?

उत्तर : पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते आणि उष्णतेमुळे घाम येतो. त्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढतात. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.

आता या समस्या सविस्तरपणे समजून घेऊया, हे का होत आहे, ते टाळण्याचे उपाय काय आहेत…

खाज सुटणे

असे का होते : पावसातील आर्द्रतेमुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर दाद, ऍथलीट फूट आणि नखांचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

उपाय काय : त्वचा धुवून स्वच्छ करा आणि कोरडी ठेवा. कोरडी झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा. जर जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटा.

त्वचेवर पुरळ उठणे

असे का होते : भिजल्याने किंवा ओले कपडे घातल्याने त्वचेवर पुरळ उठू लागतात. ज्या लोकांना सिरोसिसचा आजार आहे त्यांना जास्त पुरळ येतात. कधीकधी हे त्वचेचे संक्रमण टाळू आणि नखांपर्यंत देखील पोहोचते.

उपाय काय : हे टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला आणि शरीर कोरडे ठेवा. पुरळ उठलेल्या भागावर पावडर लावा आणि नखे कापून ठेवा. केस स्वच्छ ठेवा.

घामोळ्या

असे का होते: पावसात आर्द्रता वाढल्याने घाम येतो आणि घामोळ्या होतात. अशावेळी स्वच्छतेची काळजी घ्या.

उपाय काय: घामोळ्या असलेल्या भागावर बुरशीविरोधी उत्पादने वापरा. कोरफडीचे जेल घामोळ्या असलेल्या ठिकाणी लावता येईल.

एग्जिमा

असे का होते: पावसात ही समस्या वाढते. खाज आणि जळजळ इतकी होते की शांततेत श्वासही घेता येत नाही. वास्तविक, एग्जिमाची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते.

उपाय काय : प्रतिकारशक्ती मजबूत ठेवा. जेणेकरून पुन्हा पुन्हा संसर्ग होणार नाही. धूम्रपान करू नका आणि निरोगी आहार घ्या. तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी आहे ते लक्षात घ्या आणि त्याच्यापासून दूर राहा.

दाद- खाज

असे का होते: जास्त आर्द्रतेमुळे, जीवाणू आणि जंतू वातावरणात वेगाने वाढू लागतात. त्यामुळे दाद आणि खाज सुटते.

उपाय काय: प्रभावित भागावर बर्फाचा पॅक लावा. हे खाज आणि वेदना कमी करेल. ओले कपडे अजिबात घालू नका. शरीराचे अवयव कोरडे ठेवा.

आजकाल बुरशीजन्य संसर्गाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अंडरआर्म्स, प्रायव्हेट पार्ट आणि साईड एरियामध्ये हे जास्त होत आहे. ज्यामध्ये लाल डाग पडतात. जे दिसून येतात. या ठिकाणी खाज येण्याबरोबरच त्वचेवर पुरळ उठते.

प्रश्न: हा बुरशीजन्य संसर्ग किती धोकादायक आहे?

उत्तरः त्याचे निदान अवघड नाही. बुरशीजन्य संसर्गाकडे रुग्ण दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्याचे लवकर निदान होत नाही.

जर ही समस्या 1 ते 2 दिवसात बरी झाली नाही तर लगेच डॉक्टरांना भेटा. दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

जेव्हा ते शरीरात पसरू लागते तेव्हा त्याने टिश्यू आणि हाडांना देखील नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. लहान मुरुमामध्ये पू देखील भरू शकतो आणि आत कुजण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हे होऊ शकते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा धोका जास्त असतो.

प्रश्न: बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?

उत्तर : केवळ त्रास वाढल्यावरच डॉक्टरांकडे जाऊ नका. लक्षात ठेवा ते तुमच्याकडून तुमच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पसरू शकते.

  • त्वचेवर पुरळ उठत असल्यास त्यावर उपचार करा.
  • मनाने औषधी किंवा प्रतिजैविक घेणे टाळा.
  • नखांनी घासून स्क्रॅच करू नका.
  • तुमचा स्वतंत्र टॉवेल वापरा.
  • वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
  • घट्ट आणि ओले कपडे घालू नका.
  • दररोज अंडरवियर बदला आणि कपडे चांगले धुवा.

प्रश्न: घामोळ्या, दाद, खाज सुटणे अशा वेळी त्वचेवर थंड टॅल्कम पावडर लावल्याने चांगले वाटते, पण ते योग्य आहे का?

उत्तर: त्याला घामोळ्याचे पावडर म्हणतात. यामुळे त्यावेळी आराम मिळतो, पण काही वेळाने पुन्हा खाज सुटू लागते.

वास्तविक ही पावडर त्वचेची छिद्रे बंद करते. त्यामुळे घाम येणे बंद होते. छिद्रे बंद झाल्यावर ही समस्या अधिक गंभीर होते.

प्रश्न: मला खाज येत असल्यास काय करावे?

उत्तर : दाद पासूनन आराम मिळवण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतो.

लसूण : लसणात अजोइना नावाचे नैसर्गिक बुरशीविरोधी घटक असतात. हे बुरशीजन्य संसर्ग बरा करण्यास मदत करते. लसूण सोलून त्याचे पातळ काप करा किंवा तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता. दाद झाले त्या भागावर लावा. नंतर पट्टी बांधून रात्रभर तशीच राहू द्या.

हळद : हळदीमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात. हळद आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि दादच्या भागावर लावा. यामुळे बुरशीजन्य संसर्ग लवकर बरा होतो.

सफरचंदाचे साल : कापसाच्या मदतीने प्रभावित भागावर सफरचंदाचे साल लावा. दिवसातून 4-5 वेळा ते लावा. यामुळे बॅक्टेरिया लवकर नष्ट होतात.

टी ट्री ऑइल : टी ट्री ऑइल त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करते. प्रभावित भागात दिवसातून 3-4 वेळा लावल्याने बुरशीजन्य संसर्ग कमी होतो.

टीप: जर दाद बराच काळापासून असेल आणि त्याचा संसर्ग वेगाने पसरत असेल, तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटा.

प्रश्न: आयुर्वेदात खाज सुटणे आणि त्वचेशी संबंधित समस्यांवर काय उपाय आहेत?

उत्तर : पतंजलीचे बाबा रामदेव यांच्यानुसार खाज सुटणे आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खालील गोष्टींचे रोज सेवन करावे. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात.

  • कडुलिंबाचा रस
  • कोरफड रस
  • गिलोय रस
  • आवळा रस

तज्ज्ञ: डॉ. भावुक धीर, त्वचारोगतज्ज्ञ, आरएमएल हॉस्पिटल, दिल्ली

डॉ. उत्कर्ष श्रीवास्तव, त्वचारोगतज्ज्ञ, डर्मा सोल्युशन्स, भोपाळ

स्वामी रामदेव, पतंजली योगपीठ, हरिद्वार