आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Protection From Pests And Diseases From Microbial Biomics; Resources Made By The Department Of Botany At The University Of Agriculture

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:सूक्ष्मजीवांच्या बायोमिक्समधून किडी आणि रोगांपासून संरक्षण; कृषी विद्यापीठामधील वनस्पतिराेगशास्त्र विभागाने केले संशाेधन

रोहन पावडे | परभणी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील बहुसंख्य शेतकरी बायोमिक्सचा वापर हळद या पिकासाठी करत आहेत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाने सन २०१० मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संशोधन केले व शेतीसाठी उपयुक्त बुरशी व सूक्ष्मजीवांच्या बायोमिक्सची निर्मिती केली. याचा वापर करत शेतकरी निरनिराळी फळे, कंदवर्गीय भाजीपाला व इतर सर्व प्रकारच्या पिकासाठी करतात. विशेष म्हणजे हळदीसारख्या पिकातील राेग, किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊन उत्पादनात वाढ नोंदवली गेली आहे.

सन २०२०-२१ या वर्षात मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतील १५ हजार शेतकऱ्यांनी १७५ मेट्रिक टन बायोमिक्स या मिश्रणाचा वापर केला आहे. बायोमिक्समध्ये पिकास उपयुक्त असलेल्या ८ प्रकारच्या बुरशी व ६ प्रकारच्या जिवाणूंचे मिश्रण आहे. याच्या वापरामुळे पिकाची निरोगी वाढ होते. रोग व किडीपासून संरक्षण होते, पिकाची उत्पादन क्षमता वाढते. पिकास नत्र, पालाश, पोटॅश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. २०१० यावर्षी ६७ शेतकऱ्यांनी हळद या पिकात बायोमिक्सचा वापर केला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल आदींच्या मार्गदर्शनाखाली बायाेमिक्स संशोधनावर काम सुरू आहे.

काय हाेताे फायदा

> बायोमिक्स मध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक नाहीत

> हळद व अद्रक पिकात जमिनीतून प्रसार पावणारे कंदसड व पानांवरील ठिपके या रोगांवर नियंत्रण मिळते

> कंदमाशी व हुमणीसारख्या किडींचाही बंदोबस्त होतो

हळदीसह इतर पिकांसाठी वापर

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील बहुसंख्य शेतकरी बायोमिक्सचा वापर हळद या पिकासाठी करत आहेत. शेतकरी टरबूज, द्राक्ष, पेरू, लिंबुवर्गीय पिके, पपई, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकासाठी त्याचा वापर करीत आहेत. डॉ. कल्याण आपेट, विभागप्रमुख, वनस्पतिरोगशास्त्र विभाग.

बातम्या आणखी आहेत...