आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंथश्री अकाल तख्तची कहाणी:मुस्लिम मुलीवर प्रेम केल्याने महाराजा रणजीत यांना 100 फटके मारण्याची शिक्षा

अमृतसर येथून मनीषा भल्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 1994, ठिकाण अमृतसरचे श्री अकाल तख्त साहिब. राजीव गांधी सरकारमध्ये शक्तिशाली गृहमंत्री असलेले बुटा सिंग गळ्यात माफीचे फलक लटकवून भांडी धुत होते आणि बूट साफ करत होते.

असे करण्याची त्यांना शीखांची सर्वात मोठी धार्मिक संस्था श्री अकाल तख्तने शिक्षा दिली होती. हे तेच श्री अकाल तख्त आहे, ज्याने महाराजा रणजित सिंग यांना मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याबद्दल 100 फटके मारण्याची शिक्षा दिली होती. जिथे माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंह यांना देखील हजेरी लावावी लागली.

याची स्थापना शिखांचे सहावे गुरु हरगोविंद साहिब यांनी केली होती. हे शिखांचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. शिखांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय येथून घेतले जातात.

पंथ मालिकेतील याच श्री अकाल तख्तची कथा जाणून घेण्यासाठी मी दिल्लीपासून 450 किमी अंतरावर असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचले.

छायाचित्रात समोर अमृतसरचे सुवर्ण मंदिर. त्याच्या मागे श्री अकाल तख्त साहिब आहे, ज्यावर एक सोनेरी रंगाचा घुमट चमकत आहे.
छायाचित्रात समोर अमृतसरचे सुवर्ण मंदिर. त्याच्या मागे श्री अकाल तख्त साहिब आहे, ज्यावर एक सोनेरी रंगाचा घुमट चमकत आहे.

आधी ही कथा वाचा....

घटना त्या वेळेची आहे, जेव्हा पंजाबचे शासक महाराजा रणजीत सिंग यांचे हृदय एका 13 वर्षांच्या नाचणाऱ्या मुलीवर जडले. त्या मुलीचे नाव मोहरान होते. महाराजांना तिला आपली प्रेमिका म्हणून ठेवायचे होते, पण तिला ते मान्य नव्हते. मोहरानने महाराजांना सांगितले की, मी मुस्लिम आहे, प्रेमिका म्हणून जगू शकत नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही माझ्याशी लग्न करू शकता.

रणजित सिंग यांनी लग्नाला होकार दिला. दरम्यान मोहरानच्या वडिलांनी एक अट घातली. ते म्हणाले की, आमच्याकडे एक प्रथा आहे. जो जावई झाला त्याला सासरच्या घरी चूल पेटवावी लागते.

मोहरानच्या वडिलांना वाटले की, महाराज यासाठी तयार होणार नाहीत, पण रणजितसिंग यांनी पापणी न लवता आपल्या भावी सासऱ्याची अट मान्य केली.

महाराजांच्या या निर्णयावर शीखांची धार्मिक संघटना श्री अकाल तख्तने नाराजी व्यक्त केली. महाराजांना श्री अकाल तख्तासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला. रणजित सिंग पहिल्यांदा हजर झाले नाही.

यानंतर अकाल तख्तचे त्यावेळचे जथेदार अकाली फुला सिंग यांनी आदेश दिला की, कोणताही शीख महाराजांना वंदन करणार नाही किंवा सुवर्ण मंदिरात त्यांचा प्रसाद स्वीकारणार नाही. लोकांनी महाराजांना नमस्कार करणे बंद केले. त्यांनी दिलेला प्रसादही स्वीकारणे बंद झाले.

अखेरीस रणजितसिंग हे श्री अकाल तख्तसमोर हजर झाले. रणजित सिंग यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. याबद्दल त्यांनी माफी मागितली. त्यांना जी काही शिक्षा होईल, ती त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रणजीत सिंग यांना 100 फटके मारण्याची शिक्षा झाली. यासाठी त्यांचा शर्ट काढून चिंचेच्या झाडाला बांधण्यात आले.

यावेळी उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दरम्यान, महाराजांनी आपली चूक मान्य केल्याचे श्री अकाल तख्तच्या जथेदारांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांची शिक्षा माफ झाली आहे.

पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी वयाच्या 18 व्या वर्षी लाहोर जिंकले होते. त्यांनी 40 वर्षे राज्य केले. 27 जून 1839 रोजी त्यांचे निधन झाले. - स्रोत गुगल
पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी वयाच्या 18 व्या वर्षी लाहोर जिंकले होते. त्यांनी 40 वर्षे राज्य केले. 27 जून 1839 रोजी त्यांचे निधन झाले. - स्रोत गुगल

सकाळी 8 वाजेची वेळ. सुवर्ण मंदिराच्या पांढर्‍या संगमरवरावर अनवाणी चालताना बर्फावर चालल्यासारखे वाटत होते. मुख्य गेटमधून काही पायऱ्या चढून आत पोहोचले. गुरु ग्रंथसाहिबजवळ भाविक बसलेले होते. वाचक पाठ करत होते. येथे नतमस्तक होऊन बाहेर आले.

या मंदिर संकुलाच्या मागेच पाच मजली श्री अकाल तख्त साहिब आहे. सकाळी सर्व व्यस्त आहेत. लोक दर्शनासाठी येत आहेत. दुसऱ्या मजल्यावर गुरु ग्रंथ साहिब आहे. जवळच सोन्याच्या घुमटासारखी चौकी आहे, ज्यामध्ये शीख सेनापतींचे शस्त्र ठेवलेले आहे.

त्याच्या समोरच व्हरांडा आहे. येथूनच श्री अकाल तख्तचे जथेदार निकाल देतात.

छायाचित्र गेल्या वर्षीचे आहे. श्री अकाल तख्त साहिबचे विद्यमान जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग हे शिक्षा सुनावत आहेत. खाली बसलेले लोक त्यांचा निकाल ऐकत आहेत.
छायाचित्र गेल्या वर्षीचे आहे. श्री अकाल तख्त साहिबचे विद्यमान जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग हे शिक्षा सुनावत आहेत. खाली बसलेले लोक त्यांचा निकाल ऐकत आहेत.

श्री अकाल तख्त साहिबच्या समोर मखमली गालिचा आहे, तिथे काही इंग्रजही बसले आहेत. ते ढाढी संगीत सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. शीखांचे सहावे गुरू, श्री गुरु हरगोविंद साहिब जी यांनी शिखांना उत्साह वाढवण्यासाठी याची सुरुवात केली होती. यामध्ये शहीद झालेल्या शीखांच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या जातात.

9 वाजताच तरुण गुरसेवक त्यांच्या टीमसह ढाढी संगीताला सुरूवात करतात. हातात सारंगी आणि डमरू. मुघल शासकांनी शिखांवर केलेल्या हल्ल्यांच्या कथा किस्से सांगितल्या जातात.

अहमदशहा अब्दालीने सुवर्ण मंदिर कसे ताब्यात घेतले. शीख कसे मारले गेले. शिखांनी त्याचा मुकाबला कसा केला, त्यांनी मुघलांना कसे पराभूत केले… मध्ये मध्ये ‘बोले सो निहाल सत श्री अकाल’ हा नारा गुंजत होता.

ढाढी संगीत पंजाबी भाषेत असले तरी ते ऐकून मन रोमांचित होते. तिथे उपस्थित लोकांमध्ये उत्साह संचारतो.

दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत ढाढी संगीत असते, जे ऐकण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात.
दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत ढाढी संगीत असते, जे ऐकण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात.

ढाढी संगीताच्या काही ओळी अशा आहेत...

इक्क मीरी दी, इक्क पीर दी,

इक्क अजमत दी, इक्क राज दी,

इक्क राखी करे वजीर दी,

हिम्मत बांहा कोटगढ़,

दरबाजा बलख बखीर दी,

नाल सिपाही नील नल,

मार दुष्टां करे तागीद दी,

पग तेरी, की जहांगीर दी

(शेवटच्या ओळीचा अर्थ होतो, गुरु हरगोविंद साहिब जी, दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या जहांगीरची पगडी तुमच्या पगडीच्या पुढे काहीच नाही.)

दररोज या शैलीत शीख सेनापतींचे शस्त्र दाखवले जातात.
दररोज या शैलीत शीख सेनापतींचे शस्त्र दाखवले जातात.

ढाढी संगीतानंतर मी धर्म प्रचारक समितीचे प्रचारक सरदार हरदीप सिंग यांना भेटले. ते म्हणतात की, 'संपूर्ण जगात शीख धर्म हा एकमेव धर्म आहे ज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने श्री अकाल तख्त साहिब, माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग, माजी गृहमंत्री बुटा सिंग, पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजित सिंग बर्नाला यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना शिक्षा सुनावली आहे.

प्रत्येकाला त्यांच्या समोर हजर व्हावेच लागते, मग तो कोणताही पदावर असो.

जर एखाद्याला श्री अकाल तख्त साहिबवर बोलावले गेले आणि तो पहिल्यांदा आला नाही तर त्याला दुसऱ्यांदा बोलावले जाते. जर तो दुसऱ्यांदाही हजर झाला नाही तर तिसऱ्यांदा त्याला तनखइया म्हणून घोषित केले जाते.

तनखइया याला पंथातून बाहेर टाकले जाते. म्हणजे आता कोणत्याही शीख व्यक्ती त्याच्याशी संबंध ठेवणार नाहीत. त्याला त्यांच्या घरी आमंत्रित करणार नाही. त्याला शिखांच्या कोणत्याही मोठ्या व्यासपीठावर जाता येणार नाही. त्याच्या घरी कोणीही आपल्या मुलांचे लग्न लावणार नाही, कोणतीही गुरुद्वारा समिती त्याला त्यांच्या ठिकाणी येऊ देणार नाही.

देशभरातील गुरुद्वारांची काळजी घेणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अर्थात SGPC चे सचिव सरदार गुरचरण सिंग ग्रेवाल म्हणतात की, 'श्री अकाल तख्त साहिबकडून जारी केलेले आदेश आणि नियम जगभरातील शीखांना लागू होतात. व्यक्तींना बोलावण्यासोबतच हे तख्त शिखांशी संबंधित संघटनांनाही शिक्षा करते.

माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग आणि माजी गृहमंत्री बुटा सिंग यांनाही लावावी लागली हजेरी.

ग्यानी झैल सिंग हे भारताचे सातवे राष्ट्रपती होते. 1982 ते 1987 पर्यंत ते या पदावर होते.
ग्यानी झैल सिंग हे भारताचे सातवे राष्ट्रपती होते. 1982 ते 1987 पर्यंत ते या पदावर होते.

श्री अकाल तख्त साहिब सचिवालयाचे सेवक जसपाल सिंग म्हणतात की, '1984 मध्ये शीख दंगलीच्या वेळी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग आणि गृहमंत्री बुटा सिंग होते. श्री अकाल तख्तने ग्यानी झैल सिंग आणि बुटा सिंग यांना निरोप पाठवला की त्यांनी इथे येऊन आपली बाजू मांडावी.

प्रत्युत्तरात ग्यानी झैल सिंग यांनी राष्ट्रपती या नात्याने ते अकाल तख्त साहिबला उपस्थित राहू शकत नाहीत असा संदेश पाठवला. त्यांच्या बाजूने एक शिष्टमंडळ तेथे येणार होते. ग्यानी झैल सिंग यांच्या वतीने त्यांच्या शिष्टमंडळाने श्री अकाल तख्त साहिबसमोर आपली बाजू मांडली.

त्यांच्या उत्तरावर समाधानी झाल्यानंतर ग्यानी झैल सिंग यांना माफी देण्यात आली. मात्र, नंतर ग्यानी झैल सिंग यांनीही श्री अकाल तख्तसमोर हजर राहून माफी मागितली.

तर बुटा सिंग 1994 मध्ये श्री अकाल तख्तसमोर हजर झाले होते. शिक्षा म्हणून, पाच तख्तांमध्ये प्रत्येकी एक आठवडा लंगरमध्ये भांडी साफ करणे, झाडू मारणे आणि शूज साफ करणे असे काम त्यांना मिळाले. यावेळी त्यांच्या गळ्यात माफीचा फलकही लटकवण्यात आला.

ही तीच जागा आहे (गोल्डन चौकीच्या एकदम समोर) जिथून एखाद्याला शिक्षा दिली जाते.
ही तीच जागा आहे (गोल्डन चौकीच्या एकदम समोर) जिथून एखाद्याला शिक्षा दिली जाते.

श्री अकाल तख्त साहिबचे सध्याचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती म्हणजेच SGPC, जी देशभरातील गुरुद्वारांवर देखरेख करते, 160 सदस्य आणि 15 लोकांची कार्यकारी समिती श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदाराची निवड करते. त्यांच्या कार्यकाळासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही.

मी जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांना विचारले, तुमच्याकडे तक्रारी कशा येतात?

जथेदार हरप्रीत सिंग यांनी सांगितले की, “आम्हाला ई-मेल आणि पत्रांद्वारे तक्रारी येतात. लोक येथे येऊनही आपल्या तक्रारी नोंदवतात. तक्रार आल्यानंतर आम्ही शिष्टमंडळ तयार करतो. शिष्टमंडळ तक्रारीची सर्व प्रकारे चौकशी करते. त्यानंतर दोन्ही पक्षांना बोलावले जाते. त्याची बाजू ऐकून घेतली जाते. त्यानंतर निकाल दिला जातो.

किरकोळ बाबींमध्ये श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार एकटेच निर्णय घेतात. मोठ्या प्रकरणांमध्ये पाच तख्तांचे जथेदार भेटून शिक्षेचा निर्णय घेतात. मात्र, शिक्षा सुनावण्याचा अधिकार श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना आहे.

ते कायदेशीर आहे का?

ग्यानी हरप्रीत सिंग स्पष्ट करतात, 'कायदेशीर मान्यताऐवजी त्याला धार्मिक मान्यता आहे. शीख समाजातील कोणीही श्री अकाल तख्त साहिबच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जो निर्णय मान्य करत नाही त्याला शीख समाजातून बहिष्कृत केले जाते. त्याच्याशी कोणत्याही शीखांचा संबंध नाही.

मुघलांनी 3 फुटांपेक्षा उंच सिंहासन बनवायचे नाही असे फर्मान काढले होते, हरगोबिंदजींनी 12 फूट उंच सिंहासन बनवले

ही घटना सुमारे 17 व्या शतकातील आहे. मुघलांचा जुलूम शिगेला पोहोचला होता. मुघल सम्राट जहांगीरने लाहोरमध्ये शिखांचे पाचवे गुरू अर्जुन देव यांच्याशी क्रूरपणे वर्तन केले आणि त्यांचा अतोनात छळ केला. गुरु अर्जुन देव यांनी तेथून गुरू हरगोविंदजींना सांगण्यासाठी निरोप पाठवला की, शस्त्र उचलण्याची वेळ आली आहे. 1606 मध्ये गुरु अर्जुन देव यांची हत्या झाली.

त्या वेळी मुघलांचा आदेश असा होता की, कोणीही बहिरी ससाणा पाळू शकत नाही, घोडा ठेवू शकत नाही, शिकार करू शकत नाही आणि मुघलांच्या सिंहासनापेक्षा उंच म्हणजे तीन फूट उंच सिंहासन बांधू शकत नाही.

शिखांचे सहावे गुरू हरगोविंद जी यांनी सिंहासन ग्रहण करताच सांगितले की, आम्ही सिंहासन बनवू. त्यांनी 1609 मध्ये श्री अकाल तख्त साहिब बांधले. तेव्हा त्याची उंची 12 फूट होती. यासोबतच त्यांनी 4000 तरुणांची फौज तयार केली. बहिरी ससाणा पाळला, घोडे पाळले आणि पगडीही सजवली. ते रोज त्याच सिंहासनावर बसत असे. तेथूनच सर्व निर्णय घेतले जात होते.

हरगोविंदजी रोज सकाळी हरमंदिर साहिब मंदिरात जात असत. त्यानंतर तो शिकारीसाठी जात असे. मग दुपारी ते गादीवर बसून लोकांच्या समस्या ऐकत असत. जे न्यायासाठी यायचे, त्यांनाही न्याय मिळायचा. त्यांची आज्ञा सर्वात वर होती. आजही तीच परंपरा पाळली जात आहे.

श्री अकाल तख्त साहिबचेही अनेकदा नुकसान झाले

1984 मध्ये शीख दंगलीनंतर श्री अकाल तख्त साहिबचे नुकसान झाले होते.
1984 मध्ये शीख दंगलीनंतर श्री अकाल तख्त साहिबचे नुकसान झाले होते.

श्री अकाल तख्त साहिबवर मुघलांनी अनेकदा हल्ले केले. अठराव्या शतकात अफगाण शासक अहमद शाह अब्दाली याने ते ताब्यात घेतले आणि सिंहासनाचे नुकसान केले. त्यानंतर महाराजा रणजित सिंग यांनी ते बांधले. 1982 मध्ये पंजाबच्या स्वायत्ततेचे कट्टर सशस्त्र समर्थक जनरेलसिंग भिंद्रनवाले सुवर्ण मंदिरात राहू लागले. काही महिन्यांनंतर त्यांनी श्री अकाल तख्तवरून आपल्या समर्थकांना संबोधित करण्यास सुरुवात केली.

यानंतर, 6 जून 1984 रोजी, सैन्याने, ऑपरेशन ब्लूस्टार चालवून, श्री अकाल तख्त आणि सुवर्ण मंदिर परिसर भिंद्रनवाले आणि त्यांच्या सशस्त्र समर्थकांपासून मुक्त केले. यादरम्यान श्री अकाल तख्तचेही नुकसान झाले.

नंतर सरकारने ते बांधले, पण शिखांना ते बांधकाम मान्य नव्हते. शिखांनी स्वतः ते बांधले.

आता पंथ मालिकेच्या खालील कथा देखील वाचा...

माणसाचे मांस आणि विष्ठाही खातात अघोरी:स्मशानभूमीत कवटीमध्ये जेवण, अनेकांची कोंबडीच्या रक्ताने साधना

रात्रीचे 9 वाजले आहेत. आणि स्थळ आहे, बनारसचा हरिश्चंद्र घाट. आजूबाजूला असलेल्या ज्वालांनी परिसरातील उष्णता निर्माण केली आहे. ज्वाळांमुळे डोळ्यांची जळजळ होतेय तर दुसरीकडे धुरामुळेही त्रास होतोय. अंत्यसंस्कर करण्यात आलेल्या चितेजवळ कोणी नामजप करत आहेत, तर कोणी जळत्या चितेच्या राखेने मालिश करत आहेत, तर कोणी कोंबड्याचे डोके कापून त्याच्या रक्ताने आध्यात्मिक साधना करत आहेत. मानवी कवटीत इन्न खाणारे आणि त्यातूनच मद्य पिणारेही अनेक आहेत. त्यांना पाहून मन थरथर कापायला लागते.

हे आहेत अघोरी. म्हणजेच त्यांच्यासाठी काहीच अपवित्र नाही. ते माणसाचे कच्चे मांसही खातात. अनेक अघोरी मलमूत्र आणि लघवी देखील पितात. आज पंथ या सिरीजमध्ये वाचा अघोरींची कथा…वाचा पूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...