आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही तीन पिढ्यांपासून गुलाम आहोत, पण मजबुरी अशी आहे की, आपण मालकाचे घर सोडू शकत नाही. मालक म्हणायचे की, तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात, तुम्ही कुटुंब आहात, तुम्ही देखील आमचा एक भाग आहे. त्यांची मुले व्यापारी झाली, परदेशात गेली, पण आमच्या मुलांना रोजंदारीही मिळत नाही.
असे म्हणत गुरमेल सिंग भावूक होतात. ते म्हणतात, 'तुम्ही माझी स्थिती जाणून घेण्यासाठी आला आहात, माझा विश्वास बसत नाही. तीन पिढ्यांपासून आमची अवस्था कोणी विचारली नाही. आमची अवस्था उपासमार सहन करण्यापर्यंत खराब झाली आहे.
गुरमेल सिंग हे पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते सिरी-सांझ आहेत. सिरी-सांझ म्हणजे पंजाबीमधील एक भाग. अनेक वर्षापूर्वी पंजाबचे जमीनदार त्यांच्या शेतात आणि घरात काम करण्यासाठी ‘बंधुआ मजुरां’ना कामावर ठेवायचे. ज्यांना सिरी-सांझ म्हणत.
त्या बदल्यात त्यांना जगण्यासाठी उत्पादनातील वाटा आणि अन्न मिळायचे, पण आज त्यांना ना उत्पादनाचा वाटा मिळतो ना जगण्यासाठी छत.
ब्लॅकबोर्ड मालिकेतील त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी मी दिल्लीपासून 251 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील फतेहगढ साहिबच्या छरेडी गावात पोहोचले.
गुरमेल सिंग त्यांच्या सरदार बक्षीश सिंग यांच्यापासून थोड्याच अंतरावर खाली बसलेले होते. मी दोघांना सोबत बसायला सांगितले, पण गुरमेल सिंग तयार झाले नाही. मी म्हणाले की, मला तुम्हा दोघांचा एकत्र फोटो काढायचा आहे. खूप समजावून सांगितल्यावर ते सरदारांच्या शेजारी बसले, पण फोटो काढल्यानंतर लगेचच परत त्यांच्या जागेवर गेले.
ते तिसऱ्या पिढीतील सिरी-सांझ आहेत. त्यांची मुले रोजंदारीवर काम करतात. तर त्यांच्या सरदारांकडे मोठ मोठी घरे आहेत. आलिशान गाड्या आहेत.
गुरमेल सिंग सांगतात, 'सांगायला माझ्याकडे दोन एकर जमीन आहे, पण जमीन नापीक आहे. दोन मुले मजुरीचे काम करतात, मात्र आता परराज्यातील मजुरांमुळे त्यांना कामही मिळत नाही. आम्ही मोठ्या कष्टात जगत आहोत.
आम्ही सरदारांची शेतं नांगरली, घाम गाळला. दरवर्षी पिकातील सातवा किंवा आठवा वाटा मिळत असे. त्यातच आम्ही आनंदी असायचो, पण आता शरीर साथ देत नाही.
याच दरम्यान, सरदार बक्षीश सिंग गुरमेल यांना अडवतात. ते म्हणतात, 'सिरीने जमीनदाराप्रमाणे प्रगती केली नाही हे खरे आहे. त्यांची अवस्था रोजंदारी कामगारांपेक्षाही वाईट झाली आहे, मात्र याला सरकारच जबाबदार आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न घटले. याचा परिणाम या लोकांच्या जीवनावर झाला.
सरकारने पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा बंद केला. सहकारी संस्थांनी त्यांना कर्ज देणे बंद केले. आम्ही काय करू शकतो.'
बक्षीश सिंग सिरि यांच्या परिस्थितीसाठी सरकारला जबाबदार धरत असले तरी, गुरमेल सिंग हळुवार आवाजात सांगतात की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य सरदारांसाठी दिले आहे. त्यांनी आमच्यावर अन्याय केला. जबरदस्तीने बंधूआ मजूर बनवले.
आजही आम्ही त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाही, कारण त्यांनी आम्हाला अशा स्थितीत ठेवले आहे की, आम्ही गप्प राहिलो तर आमचे शोषण होईल आणि आम्ही बोललो तर काम मिळणार नाही. त्यामुळे गप्प बसलेलेच बरे.
यानंतर आम्ही खजानसिंग यांना भेटतो. नाथ सिंग जुने सिरी आहेत. त्याच्या घरात सात जण आहेत. प्रत्येकजण मजूर म्हणून काम करतो.
नाथ सिंग म्हणतात, “पंजाबमधील प्रत्येक गावात तीन प्रकारची जमीन आहे. शामलाट, खासगी जमीन आणि जुमला-मुस्तरका-मालकीची जमीन. तिसऱ्या प्रकारची जमीन गावातील सर्व लोकांमध्ये वाटली जाते. यामध्ये सिरी यांचाही वाटा असतो, मात्र आता केंद्र सरकारने ही जमीन ताब्यात घेण्यासाठी पंचायतींना नोटीस दिली आहे. यामुळे आमची शेवटची आशाही संपुष्टात येईल.
पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील शेतजमिनीवर बांधलेल्या विमानतळाच्या रस्त्यावरून गेल्यास तुम्हाला एकाच ओळीत डझनभर गावे सापडतील. यापैकी एका गावात मला गावातील मोठे जमीनदार गुरुप्रताप सिंग भेटले.
गुरू प्रताप सिंग यांनीच शेतकरी आंदोलनात सर्वप्रथम आपल्या ट्रॅक्टरने सिंघू सीमेवर आंदोलनाचा झेंडा फडकवला. संपूर्ण आंदोलनात बटाट्याचे पराठे आणि रायता यांचे लंगर लावले होते.
मी विचारते की, सीरि लोकांचे शोषण का होत आहे?
गुरुप्रताप सिंग सांगतात की, ‘येथील जमीनदारांना यूपी आणि बिहारमधील मजुरांचा फायदा झाला आहे. त्यांना यापुढे सिरी लोकांचे नखरे सहन करण्याची आवश्यकता राहणार नाही. थोडेफार पैसे देऊन ते मजुरांकडून सहज काम करून घेतात.
मात्र, बाहेरून मजूर येत असल्याने अनेक गुन्हे घडत असल्याची अडचण आहे. त्यांच्यावर सहजासहजी विश्वास ठेवता येत नाही. आम्ही सीरि लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवत होतो.
गुरुप्रताप सांगतात की, 'सिरी-सांझमध्ये खूप चांगले संबंध होते, जे आता शेवटच्या घटीका मोजत आहे. त्यांची लोकसंख्या फक्त 5 टक्के उरली आहे. जमीनदार आणि सीरी यांच्यातील नात्याचा उरलेला भाग इतका कमकुवत झाला आहे की, येत्या काही वर्षांत ते केवळ पुस्तकी मुखपृष्ठच राहील.
संत रामदासी नावाचे एक पंजाबी कवी झाले होते. त्यांचे सिरीवर एक गाणे आहे- 'गल लग के सारे दे जट्ट दी पया, फुलां विचों नीर वगेया, लेया दंगली नसीबां नू फरोलिए मिट्टी विचों पुत्त जगेया...' म्हणजे सरदार भावूक होतो आणि त्याच्या सिरीला मिठी मारतो. त्याच्या सिरीचे नखरे झेलतो. सिरीही त्याच्यावर दादागिरी करतो. कधी कधी भांडून निघून जातो, मग स्वतःहून परत येतो.
गुरू प्रताप यासंदर्भात एक प्रसंग सांगतात - 'ही माझ्या बालपणीची घटना आहे. माझ्या घरी एक सिरी राहत असे. शेतीची सगळी कामे तो करायचा. नंतर काही कारणास्तव ते घर सोडून गेले. 25 वर्षांनी ते पुन्हा आमच्या घरी आले. घरी आल्यानंतर ते म्हणाला की, इथेच राहणार, कुठेही जाणार नाही. तो म्हातारा झाला होता. त्याचे शरीर साथ देत नव्हते. तरीही आम्ही त्याला ठेवले.
माझ्या घरात त्याच्यासाठी विशेष काम नव्हते. तो म्हशींना चारा द्यायाचा. त्याला हवे असल्यास झोपत होता. त्याला थोडी नशा करण्याचीही सवय होती. त्याला कोणी काही बोलत नव्हते. तो आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि जबाबदारी देखील आहे.
गुरुप्रताप यांच्यापासून थोड्या अंतरावरच शेतात बनवलेल्या ढिगाऱ्यावर त्यांचा सिरी बसलेला आहे. मी बोलायचा प्रयत्न केला तर ते म्हणतात, 'सरदारची सगळी कामं सिरी करत असे, पण नवीन मशीन आल्यापासून सिरीची गरज नाहीशी होत आहे.
पूर्वी मी लहान असताना खूप काम करायचो, पण आता म्हातारपणात काम मिळत नाही. आता मी माझ्या सरदाराकडे आलो आहे. म्हातारपणात कुठेही जाणार नाही.
पंजाबमधील चित्रकार शब्दीश म्हणतात की पंजाबमध्ये सिरी-सांझ वर्गापेक्षा जात हा मुद्दा जास्त आहे. शतकानुशतके सीरि लोकांना असे वाटते की त्यांचे स्थान सरदारांच्या बरोबरीचे नाही, त्यांना सरदारांच्या खाली राहावे लागेल.
सरदारांनी सीरि लोकांची अशी मानसिकता केली आहे की त्यांना आपले शोषण होत आहे असे वाटत नाही. दलित समाजासाठी वापरली जाणारी भांडी वेगळी ठेवली जातात. त्यातच ते डाळ, लस्सी, चहा, पाणी प्यायचे. ज्याला घराबाहेर ठेवले जाते.
हे सिरी-सांझ बाबत झाले. पंजाबप्रमाणेच देशातील इतर राज्यातही लोकांना असेच काम करावे लागत आहे. एका अहवालानुसार, देशात अजूनही एक लाखांहून अधिक ‘बंधुआ मजूर’ आहेत. अलीकडेच गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधून 20 हून अधिक मजुरांची सुटका करण्यात आली होती.
ब्लॅकबोर्ड मालिकेत आणखी अशाच बातम्या वाचा...
मुलीचे लग्न होणार होते, तिरडी उचलावी लागली:25 वर्षांपासून चित्रपट बघितला नाही, सिनेमाचे नाव ऐकताच भीती वाटते
13 जून 1997 रोजी दिल्लीतील उपहार सिनेमाला आग लागली होती. ज्यामध्ये 59 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यात नीलम कृष्णमूर्ती यांच्या दोन मुलांचाही सहभाग होता. आता यावर एक वेब सिरीज आली आहे - 'ट्रायल बाय फायर'. या आगीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ब्लॅकबोर्डमध्ये त्याच कुटुंबांची गोष्ट… वाचा सविस्तर वृत्त
महिलांना बांधून 200 पायऱ्यांवरून ओढतात:भूतबाधेच्या नावाखाली लाथा- बुक्क्यांनी मारले जाते, थंड पाण्यात अंघोळ घालतात
राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एक मंदिर आहे - बंक्याराणी माता मंदिर. येथे भूतबाधा आणि उपचाराच्या नावाखाली महिलांना चामड्याच्या शूजमधून पाणी पिण्यास लावले जाते. उलटे पाडून त्यांना मंदिराच्या पायऱ्यांवरुन ओढले जाते. थंड पाण्याने आंघोळ घालतात, केस ओढतात आणि लाथा-बुक्क्यांनी मारतात. प्रशासनाने यावर बंदी घातली असली तरी येथे दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. या महिलांचे कुटुंबीयच त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत.
ब्लॅकबोर्ड मालिकेतील या महिलांची अवस्था जाणून घेण्यासाठी मी जयपूरपासून 279 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसिंदच्या बंक्याराणी मंदिरात पोहोचले. दिवसभर आणि संपूर्ण रात्र म्हणजे सुमारे 24 तास तिथे राहिले. त्यावेळी मी माझ्या डोळ्यांनी काय पाहिले ते वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.