आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलिझाबेथ II यांचा 3 वेळा भारत दौरा:प्रजासत्ताक दिनी होत्या प्रमुख पाहुण्या, काशी नरेश सोबत हत्तीवरुन केली सिंहाची शिकार

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आता या जगात नाहित. 96 वर्षीय राणीने स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ-द्वितीय यांनी तीन वेळा भारताला भेट दिली होती. 1961, 1983 आणि 1997 मध्ये त्या भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. आज आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग पाहूयात निवडक 10 छायाचित्रे...

21 जानेवारी 1961, राणी एलिझाबेथ II आणि प्रिन्स फिलिप यांची पहिली भारत भेट. माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांचे स्वागत करण्यासाठी पालम विमानतळावर गेले होते.

राणी एलिझाबेथ II आणि प्रिन्स फिलिप 1961 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होते. परेडनंतर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत बग्गीमधून परत येतांनाचे हे छायाचित्र.

हा 26 जानेवारी 1961 चा फोटो आहे. राणी एलिझाबेथ-द्वितीय आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती भवनाची पाहणी करतांना. त्याच्या मागे प्रिन्स फिलिप देखील दिसत आहेत.

भारताच्या पहिल्या दौऱ्यावर आलेल्या एलिझाबेथ-द्वितीय या काशीला गेल्या होत्या. त्यांनी काशीचे राजा विभूती नारायण सिंह यांच्यासोबत शाही हत्तीवर सवारी केली.

1961 मध्ये एलिझाबेथ-II सहा आठवड्यांच्या दौऱ्यावर भारतात आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ताजमहाललाही भेट दिली. या वेळी प्रिन्स फिलिप देखील सोबत होते.

1961 मध्ये एलिझाबेथ-II आणि प्रिन्स फिलिप जयपूरला पोहोचले. त्यांच्यासोबत जयपूरचे महाराज आणि महाराणीही छायाचित्रात दिसत आहेत. यादरम्यान प्रिन्स फिलिपने वाघाची शिकार केली होती.

कॉमनवेल्थ देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ब्रिटिश राणी 1983 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. यादरम्यान त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती.

तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी 7 नोव्हेंबर 1983 रोजी राष्ट्रपती भवनात ब्रिटीश शाही जोडप्याच्या सन्मानार्थ समारंभ आयोजित केला होता.

1997 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ब्रिटनच्या राणीने शेवटचा भारत दौरा केला होता. यावेळी राणीला राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

राणी एलिझाबेथ-II 1997 मध्ये अमृतसरला आल्या होत्या. तेथे त्यांनी शिखांचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले.

दिवंगत राणीशी संबंधित आणखी बातम्या नक्की वाचा...

15 देशांच्या प्रतिकात्मक महाराणी होत्या एलिझाबेथ द्वितीय:दर बुधवारी PM सोबत घेत होत्या गुप्त बैठक; सरकारी कामावरही नजर होती

बातम्या आणखी आहेत...