आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराड्यूक ऑफ एडिनबरा आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप (99) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी विंडसर कॅसलमध्ये शुक्रवारी सकाळी अंतिम श्वास घेतला. अलीकडेच त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. संसर्गानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 मार्चला त्यांना सुटी मिळाली होती. 10 जून 1921 ला जन्मलेले प्रिन्स फिलिप दोन महिन्यांनी 100 वा वाढदिवस साजरा करणार होते. फिलिप ब्रिटिश इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राजा राहिले. ते नेहमी महाराणींना साथ देत असत, त्यामुळे सर्वात सन्मानित व्यक्ती होते.
प्रिन्स फिलिप यांचे चारही मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांची प्रतिमा आनंदी पण जबाबदार पती आणि पिता अशीच होती. पत्नीचे पद त्यांच्या संबंधांत आड आले नाही. महाराणींसोबत ते 140 देशांत 250 पेक्षा जास्त दौऱ्यांवर गेले. 7 दशके विनाअट सोबत केली. प्रिन्स फिलिप यांना विमान चालवण्याचे वेड होते. क्रिकेट आणि पोलो हे खेळ त्यांना आवडत होते. ब्रिटनच्या अव्वल पोलो खेळाडूंत त्यांची गणना होत होती. टीव्हीवर मुलाखत देणारे पहिले शाही सदस्य फिलिपच होते.
ग्रीसच्या कोर्फूत किचन टेबलवर फिलिप यांचा जन्म झाला होता. 1922 मध्ये त्यांच्या वडिलांवर देशद्रोहाचा आरोप झाल्याने कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. ब्रिटिश युद्धनौकेवर संत्र्याच्या पेटीपासून बनवलेल्या खाटेवर त्यांनी ग्रीस सोडला. आई सिझोफ्रेनियाने आजारी होती. त्यामुळे ती सोबत राहू शकली नाही. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांना ब्रिटनला पाठवण्यात आले. तेथेच शिक्षण झाले. 1939 मध्ये रॉयल नेव्हीत सहभागी झाले. याच काळात त्यांनी 13 वर्षीय राजकुमारी एलिझाबेथ यांचे मन जिंकले होते. लग्नाआधी त्यांनी ग्रीक आणि डॅनिश किताबांचा त्याग करून ब्रिटिश नागरिकत्व घेतले. 1952 मध्ये एलिझाबेथ महाराणी झाल्या तेव्हा साथ देण्यासाठी त्यांनी नेव्ही सोडली.
सडेतोड टिप्पणी केल्यामुळे अनेकदा त्यांच्या प्रतिमेला तडाही गेला. पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही. त्यांनी नेहमी एलिझाबेथ यांना सर्वतोपरी साथ देणे आपले पहिले कर्तव्य मानले. 1965 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत आपले दु:ख व्यक्त करताना म्हटले होते की, मी चित्रपट, नाइट क्लब आणि पबमध्ये जाऊ शकत नाही. पण त्याबदल्यात जे फायदे मिळाले आहेत, त्याद्वारे त्याची भरपाई होते हेही मान्य केले होते. असा स्पष्टवक्तेपणा राजकुटुंबातील सदस्यांमध्ये खूपच कमी पाहायला मिळतो.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी तीन वेळा भारताचा दौरा केला. 1961, 1983 आणि 1997 मध्ये ते भारत भेटीवर आले होते. तथापि, 1961 मध्ये भारत दौऱ्याच्या वेळी एका वाघाची
शिकार केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
राष्ट्रपती भवनच्या आर्काइव्हमधून काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत. एक नजर टाकुयात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.