आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टरक्ताअभावी कोणीही मरू नये:नोकरी सोडून सुरू केले मिशन Walk4Blood, दोन वर्षांत 21,000 किमी चालण्याचे लक्ष्य

नीरज झा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील दोन घटना सांगतो...

पहिली 2016 ची आहे. रायपूरमधील एका महिलेला तिच्या पतीसाठी रक्ताची गरज होती. मी रक्तदान केले. महिलेशी बोलले असता पतीच्या उपचारासाठी आणि रक्ताची व्यवस्था करण्यासाठी तिला शरीर विकावे लागल्याचे समोर आले.

दुसरी - 2017 ची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका 14 वर्षीय मुलाला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. प्लेटलेट्स वेळेवर न मिळाल्याने वडिलांसमोरच वेदनेने तीचा मृत्यू झाला.

माझ्या घरी पण पहिले मूल येणार होते, मग वाटले असे कुणासोबतही होऊ शकते. कदाचीत उद्या माझ्यासोबतही… या दोन घटनांमुळे माझ्या मनाची एवढी घालमेल झाली की, मी नोकरी सोडून 'सिंपली ब्लड' नावाची एनजीओ सुरू केली, यामध्ये 10 हजारांहून अधिक रक्तदाते नोंदणीकृत आहेत.

आता मी देशभरात रक्तदान करण्याच्या मोहिमेसाठी 21,000 किलोमीटरच्या पायी प्रवासावर निघालो आहे. किरण आमच्याशी ऑनलाइन संवाद साधत होते तेव्हा ते 10 राज्यांत फिरून महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये होते.

गेल्या 7 महिन्यांत किरण यांनी 6,500 किमीचा प्रवास केला आहे. ते Walk4Blood मिशनवर आहेत.
गेल्या 7 महिन्यांत किरण यांनी 6,500 किमीचा प्रवास केला आहे. ते Walk4Blood मिशनवर आहेत.

लोकांमध्ये रक्तदानाबाबत एवढी जागरुकता असावी की 2025 पर्यंत वेळेवर रक्त न मिळाल्याने एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, अशी किरण यांची इच्छा आहे. ते म्हणतात, 'सरकार हॉस्पिटल बांधू शकते. रक्तपेढी बनवू शकते, पण रक्त बनवू शकत नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढे यावे लागेल.

किरण वर्माची पुढील कहाणी वाचण्यापूर्वी ही आकडेवारी वाचा...

किरण वर्मा सांगतात, 'मी एका दिवसात 30 किलोमीटर अंतर कापतो. दोन वर्षांत 21 हजार किमी अंतर कापण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत मी 6,500 किमी चाललो आहे. जेव्हा मी या मोहिमेचे नियोजन करत होतो आणि एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्याचे अंतर लक्षात घेऊन संपूर्ण देशाचा नकाशा तयार करत होतो, तेव्हा संपूर्ण देशाचा प्रवास करण्यासाठी मला सुमारे 21,000 किमी अंतर कापावे लागेल, असे लक्षात आले.

किरण हे मूळचे दिल्लीतील मौजपूर भागातील रहिवाशी आहेत. ते म्हणतात, 'डिसेंबर 2021 मध्ये केरळमधून याची सुरुवात झाली. त्यानंतर तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमण बेट येथे गेलो. आता मी पुन्हा गुजरातमधून महाराष्ट्राच्या विदर्भात जाणार आहे.

किरण सांगतात की, 'मी माझा 90 टक्के प्रवास पायी करतो. जिथे जाण्याची परवानगी नाही किंवा लोकवस्ती नाही तिथे मी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतो. लोकांमध्येच खावं, प्यावं आणि राहावं लागतं.

वास्तविक, किरण प्रवासादरम्यान लोकांना भेटतात. ते गावागावात जातात. त्याचे ध्येय आणि रक्तदान करण्याची गरज नागरिकांना सांगतात. तेथील स्थानिक प्रशासकाची भेट घेतात.

आतापर्यंत तुमचे मिशन कसे बदलले आहे? किरण सांगतात की, 'मी 5 लाख शाळकरी मुलांसोबत जनसंपर्क केला आहे. विविध ठिकाणी 43 रक्तदान शिबिरे लावण्यात आली आहेत. 10 हजारांहून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे.

“आदिवासी समाज, जिथे कमी शिक्षित लोकसंख्या आहे. आतापर्यंत त्यांना रक्तदान करण्याबाबत माहितीही नव्हती. माझ्या जनजागृती मोहिमेनंतर लोकांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली आहे.

किरण 7 वर्षांचे असतांना त्यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. आजही ते त्या दिवसांबद्दल सांगतात की, 'मी मोठा झालो तेव्हा आईसाठी रक्ताची व्यवस्था करण्यात खूप अडचणी आल्या असे माझे वडील सांगत.'

किरण यांनी हे अभियान सुरू केले तेव्हा घरच्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की, 'माझी पत्नी ही पहिली व्यक्ती आहे जिने मला पाठिंबा दिला. त्यामुळे मला प्रवास करता येतोय. कितीतरी वेळा मी रडतो, तुटलो त्या वेळी तीच माझ्यातील आत्मविश्वास वाढवते. ती नोकरी करून घरखर्च भागवते.

किरण सांगतात, घरातून बाहेर पडल्यावर बायकोला विचारले घर कसे चालेल? ती म्हणाली, आमचा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे. कमी पैशात कसे जगायचे हे मला माहीत आहे.
किरण सांगतात, घरातून बाहेर पडल्यावर बायकोला विचारले घर कसे चालेल? ती म्हणाली, आमचा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे. कमी पैशात कसे जगायचे हे मला माहीत आहे.

विशेष म्हणजे किरण वर्मा केवळ 10वी पास आहेत. ते सांगातात, 'मी अभ्यासात खूप कमजोर होतो. पहिल्यांदा दहावीच्या परीक्षेला बसलो, नंतर नापास झालो. नंतर डिप्लोमा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही अपयश आले.

कुटुंबाची आर्थिक चणचण लक्षात घेऊन त्यांनी नोकरी सुरू केली. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घेतला. जेव्हा त्यांनी शेवटची नोकरी सोडली तेव्हा ते एका मोठ्या शैक्षणिक गटाचे विपणन प्रमुख होते.

किरणने आपल्या आयुष्यात अनेकांना वेळेवर रक्त न मिळाल्याने मरताना पाहिले आहे. ते सांगतात की, 'यावर्षी आपण 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला, पण 75 वर्षे होऊनही आपण समस्यांपासून मुक्त नाही. या समस्यांचे मूळही आपणच आहोत आणि उपायही… 140 कोटी लोकसंख्येच्या देशात दरवर्षी 50 लाख रक्तदाते तयार केले, तर देशातील एकही माणूस रक्ताअभावी मरणार नाही.

बातम्या आणखी आहेत...