आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Rafael Jet Flies Twice As Fast As Sound, A Camera Weighing A Ton Is Able To Capture Even A Falling Ball

फीचर्स:आवाजापेक्षा दुप्पट वेगाने उडते राफेल, एक टन वजनाचा कॅमेरा खाली पडलेल्या चेंडूचेही छायाचित्र घेण्यात सक्षम

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 65,000 फूट उंचीवरूनही शत्रूवर हल्ला करण्यात सक्षम
  • 7000 कर्मचारी २ वर्षे सतत काम करतात तेव्हा तयार होते एक राफेल

आकाशातील भारताच्या शक्तीत आणखी वाढ होणार आहे. फ्रान्समधून ५ राफेल लढाऊ विमानांचा पहिला जथ्था भारतासाठी रवाना झाला. ते बुधवारी म्हणजे २९ जुलैला हरयाणातील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरतील. त्यांना पुढील महिन्यात वायुदलात सामील केले जाईल. त्याचा कमाल वेग २१३० किमी प्रतितास आहे म्हणजे आवाजाच्या वेगाच्या दुप्पट. ते अणुहल्ला करण्यातही सक्षम आहे. त्यातील एक टनाचा कॅमेरा एवढा शक्तिशाली आहे की, पूर्ण वेगात असतानाही जमिनीवर पडलेल्या बेसबॉलचेही स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. जाणून घेऊ या काय काय आहेत वैशिष्ट्ये, जी राफेलला आकाशाचा राजा बनवतात...

३ कोटी रुपयांपर्यंतचा लेजर बॉम्ब
- मिका एअर-टू-एअर मिसाइल:
५० किमीच्या रेंजसह लक्ष्यानुसार आपला मार्ग निश्चित करू शकते.
मीटियोर मिसाइलः जगातील अद्वितीय क्षेपणास्त्र. रेंज १०० किलोमीटर. ते अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याने राफेलला शत्रू देशाच्या सीमेत घुसून हल्ला करण्याची गरज भासणार नाही.
- लेजर किंवा जीपीएस गायडेड बॉम्ब : एका बॉम्बची किंमत ५० हजार ते साडेतीन लाख युरो म्हणजे ४४ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. आयएसआयएसवर हल्ल्यात बहुतांशी त्याचाच वापर झाला. राफेलमध्ये या प्रकारचे ६ बॉम्ब लागू शकतात. त्याचे बॉम्ब पॉड्स १० किमीपर्यंत लक्ष्यावर निशाणा साधू शकते.
- अंडर कॅरिजमध्ये एक रिव्हॉल्व्हर कॅनन : हे ३० मिमी गोळीचा १०५५ मीटर प्रति सेकंदच्या वेगाने मारा करते. हे रिव्हॉल्व्हर कॅनन दर मिनिटाला २५०० गोळ्या मारू शकते.
- फायर अँड फॉर्गेट क्रूझ मिसाइल : पायलटने बटण दाबल्यानंतर ते आपोआप लक्ष्याच्या दिशेने जाते.

शत्रूच्या क्षेपणास्त्राचा रस्ता चुकवतो
राफेलमधील स्पेक्ट्रा इंटिग्रेटेड डिफेन्स यंत्रणा शत्रूचे रडार जाम करू शकते आणि त्याच्याकडे येणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत सावध करतो. तो विमानाच्या प्रोटेक्टिव्ह शील्डचे काम करतो. तो छद्म सिग्नल पाठवू शकतो आणि रडार सिग्नल जाम करू शकतो, शत्रूचे सिग्नल निष्क्रीय करू शकतो. तरीही शत्रूने क्षेपणास्त्राने हल्ला केला तर स्पेक्ट्रा डिकॉय सिग्नल सोडून त्या क्षेपणास्त्राचा मार्ग चुकवतो.

फ्लाइट रेंज आणि इंधन क्षमता
- फ्लाइंट रेंज साडेदहा तासांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सतत १० तासांपेक्षा जास्त उडू शकते. या दरम्यान ६ वेळा त्यात इंधन भरण्याची गरज भासते. जे हवेतच भरता येते. यात साडेपाच टन इंधन साठा होऊ शकतो. पूर्ण वेगात ते १० मिनिटात ५ टन इंधन खर्च करते.
- राफेलचे 3 प्रकारः ट्रेनर- दोन आसनी, राफेल सी- सिंगल सीटर, राफेल एम- नेव्हीच्या विमानवाहू जहाजासाठी. ते अण्वस्त्र हल्लाही करता येऊ शकतो. एक राफेल तयार करण्यात सुमारे २ वर्षांचा कालावधी लागतो. यासाठी ७००० कर्मचारी सतत काम करतात.

हे ६ देशही राफेल घेण्याच्या तयारीत : जर्मनी, इटली, स्पेन, ब्रिटन, ऑस्ट्रिया व सौदी अरेबिया. फ्रान्स या ६ देशांना ७०७ राफेल विकणार.