आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भारत निर्माण होत आहेत का?:राहुल गांधींचा रघुराम राजन यांना प्रश्न; उत्तर - शेतकरी, गरीब उद्योगपतींमधील वाढती दरी मोठी समस्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यमवर्गीयांच्या फायद्यासाठी धोरणे बनवण्याची शिफारस केली आहे. राजन यांनी भारत जोडो यात्रेतही सहभाग घेतला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या भेटी दरम्यान फार्म हाऊसच्या टेरेसवर रघुराम राजन यांचा वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक समस्यांवर इंटरव्ह्यू घेतला.

राहुल गांधी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना म्हणाले की, आजच्या जगात सर्वत्र द्वेष पसरला आहे. युक्रेनपासून अनेक ठिकाणे पाहिल्यास भारत जगाला यामध्ये दिशा देऊ शकतो. भारत मोठी भूमिका बजावू शकतो. यावर राजन म्हणाले की, लोकशाही हीच आपली ताकद आहे. भारत एक आदर्श ठेवू शकतो, त्यासाठी असे अनेक देश आपल्याकडे बघत आहेत.

माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, आगामी काळात सेवा क्षेत्रात क्रांती होणार आहे. आज भारतात बसून अमेरिकेत काम करता येते.

आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही

माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद पडल्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता आणखी वाढली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, उच्च मध्यमवर्गाला याचा फटका बसला नाही. सर्वात गरीबांना रेशन मिळते. तर श्रीमंतावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, कनिष्ठ मध्यमवर्गाकडे बघावे लागेल, त्यांच्यासाठी धोरण बनवले पाहिजे. आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही.

रघुराम राजन यांच्यासोबत राहुल गांधींचे प्रश्नोत्तरे

राहुल गांधी : तुम्ही ग्रामीण राजस्थान बघायला आलात का?

रघुराम राजन : मी नीमराणाजवळच्या गावात पाहिलं होतं, तिथे खूप कारखाने आले आहेत, इतका विकास झाला आहे. गावाचा कायापालट दिसत आहे.

राहुल गांधी : मला आठवतं मी जेव्हा 9 वर्षांचा होतो, आम्ही नीमरानाला पिकनिकसाठी आलो होतो, तेव्हा आमच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. माझ्या आईने मला ब्लँकेटने झाकून वाचवले?

रघुराम राजन: ते संरक्षणात्मक आहेत.

राहुल गांधी : आजच्या अर्थव्यवस्थेकडे तुम्ही कसे पाहता?

रघुराम राजन : या वर्षी अडचणी आल्या. वाढ मंद आहे, भारताची निर्यात कमी आहे. वस्तूंमध्ये महागाई आहे. महागाई हा विकासाचा अडथळा आहे. समस्या आर्थिक वाढीच्या संख्येची आहे. कोरेना नंतर समस्या वाढल्या आहेत आणि आपला विकास दर कमी झाला आहे. कोरोना महामारीपूर्वीही आपला विकासदर कमी होता. आपणच याला तयार केले आहे.

राहुल गांधी : देशात चार-पाच भांडवलदार सतत श्रीमंत होत आहेत. दोन भारत निर्माण होत आहेत, एक शेतकरी आणि गरीब आणि दुसरा या पाच-सहा भांडवलदारांचा. या वाढत्या विषमतेबद्दल आपण काय करावे?

रघुराम राजन: ही एक मोठी समस्या आहे. कोरोनाच्या काळात श्रीमंत वर्गाचे उत्पन्न वाढले, कारण ते घरून काम करू शकत होते, परंतु गरीब लोकांना कारखाण्यात जायचे होते, ते बंद झाले होते. कारखाना बंद पडल्याने मासिक उत्पन्न बंद झाले. त्यामुळे ही विषमता आणखी वाढली आहे.

कनिष्ठ मध्यमवर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, उच्च मध्यमवर्गाला याचा फटका बसला नाही. गरिबांना रेशन मिळते. श्रीमंतारवर काहीही परिणाम झालेली नाही. कनिष्ठ मध्यमवर्गाकडे बघावे लागेल, त्यांच्यासाठी धोरण बनवले पाहिजे. आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही.

राहुल गांधी : मक्तेदारीच्या विरोधात असू शकतो?

रघुराम राजन : मक्तेदारीच्या विरोधात असू शकतो. छोटा व्यवसाय चांगला आहे, मोठा व्यवसायही चांगला आहे पण कोणाचीच मक्तेदारी चांगली नाही.

राहुल गांधी : दुसरी हरित क्रांती होऊ शकते का?

रघुराम राजन : दुसरी हरित क्रांती नक्कीच होऊ शकते. आता नव्या पद्धतीने विचार करायला हवा. प्रक्रियेकडे लक्ष द्यायला हवे. इथल्या कामगारांचा वापर करायला हवे, जे स्वस्तात मिळतात. फार्म प्रोसेसिंग युनिट्स बसवल्या जातील, यामुळे ऊर्जेची बचत होईल, वीज आणि डिझेलचा वापर कमी होईल.

राहुल गांधी : अमेरिका आणि बाकी जगात काय चाललंय?

रघुराम राजन : अमेरिकेत महागाई वाढत आहे. केंद्रीय बँका व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे भारतातून होणारी निर्यात कमी होईल. आपल्या उत्पादन गती कमी होईल.

राहुल गांधी : मी महाराष्ट्रातून आलो, तेव्हा तिथले लोक म्हणत होते की बांगलादेशने निर्यात धोरणात खूप निर्णय घेतले आहे, त्याबद्दल काय करायचे?

रघुराम राजन: त्यांचा एक महत्त्वाचा उद्योग कापड आहे, ते कपडे बनवतात आणि विकतात. बांगलादेशने मोठ्या उद्योगांना परवानगी दिली आहे. कामगार महिला आहेत. भरती मोठ्या प्रमाणावर झाली.

राहुल गांधी : बेल्लारीमध्ये जीन्स उत्पादनाचे मोठे केंद्र आहे, येथे मोठे काम होते. तेथे साडेचार लाखांहून अधिक लोक या कामात गुंतले होते. घरांमध्ये जीन्स शिवायचे, जॉब वर्कवर काम असायचे. जीएसटी नोटाबंदीने हे सर्व संपले. हा इंग्रजांच्या काळापासूनचा उद्योग आहे. आज 50 हजार शिल्लक आहेत.

रघुराम राजन : या क्षेत्राला स्वस्त कर्ज दिले पाहिजे. सरकारी धोरणात एकसूत्रता असली पाहिजे, आज काही आहे आणि नंतर बदलून जाईल, असे होऊ नये.

राहुल गांधी : तुम्ही RBI मध्ये होता, भांडवलदार 2 लाख कोटींचे कर्ज घेऊ शकतो, पण जेव्हा एखादा छोटा व्यावसायिक बँक कर्ज घ्यायला जातो तेव्हा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, असे का होते आणि ते कसे बदलता येईल?

रघुराम राजन: बदलू शकतात, ते छोटे उद्योगपती आहेत, त्यांच्याकडे महसूलाचा प्रवाह आहे. फिनटेकनंतर या दिशेने काम सुरू झाले आहे.

राहुल गांधी : भारतात अशी एकही कंपनी नाही जी आधी छोटी होती आणि आता मोठी झाली आहे. अमेरिकेत छोटी कंपनी पाच-सात वर्षांत मोठी होते. भारतात हे का होत नाही?

रघुराम राजन : तुम्ही जे सांगत आहोत, ते अगदी बरोबर आहे. वाढीसाठी संधी हवी. जेव्हा तुम्ही वाढण्यास सुरुवात करता तेव्हा सरकार लहान व्यवसायांना वाढण्यास मदत करते.

राहुल गांधी : हल्दीराम हे लघुउद्योग वाढवण्याचे सर्वात मोठे उदाहरण?

रघुराम राजन : आम्हाला अनेक हल्दीरामांची गरज आहे. छोट्या कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकतात.

राहुल गांधी : शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांची पिके येताच वाणिज्य मंत्रालय निर्यात-आयात धोरण ठरवते आणि त्यांच्या पिकांचे भाव पडतात.

रघुराम राजन : ही मोठी समस्या आहे, आम्ही शेतकर्‍यासाठी आहोत असे सांगत राहतो, पण निर्यात-आयात धोरण त्यांच्यासाठी नाही. आधी कांद्याचे भाव वाढतात, मग भाव पडतात, गरीब शेतकरी त्रस्त होतो. निर्यात आयातीचे शाश्वत धोरण असावे. भाव जास्त वाढले तर आयात करू शकता, निर्यातीवर बंदी नको, कारण शेतकरी तोट्यात आहे.

राहुल गांधी : बेरोजगारी ही मोठी समस्या आहे, त्यावर उपाय काय?

रघुराम राजन : लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. कारण यात नोकरीबाबत सुरक्षा आहे. पण सरकारी नोकरीत फार कमी लोक काम करू शकतात. भरती केली तरी तरी केवळ 1 टक्के रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला खासगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे लागेल. खासगी क्षेत्र आणि शेतीमध्ये तंत्र आणले तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सेवा क्षेत्राकडे पाहिले पाहिजे, तेथे रोजगार निर्माण होईल. कोरोनाच्या काळात अनेक मुले शाळेत गेली नाहीत, ती त्यांच्या वर्गात तीन वर्षे मागे आहेत. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

राहुल गांधी : छोट्या उद्योगांना आधार मिळत नाही?

रघुराम राजन : नोटाबंदीमुळे अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद पडले. जीएसटीमुळेही अडचणी येत आहेत. अर्थव्यवस्था ठप्प झाली. यानंतर मोठ्या कंपन्या चांगले काम करत आहेत, परंतु छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

राहुल गांधी : पहिली श्वेतक्रांती, हरितक्रांती, संगणक क्रांती झाली, पुढे कोणती क्रांती होऊ शकते?

रघुराम राजन : भविष्यात सेवा क्रांती होईल. आम्ही अमेरिकेत गेलो, अमेरिकेत गेल्या शिवाय देखील काम करू शकतो. डॉक्टर इथे बसून टेलीमेडिसिनद्वारे अमेरिकेत उपचार देऊ शकतात. आता आपल्याला नवीन प्रकारच्या हरित क्रांतीची गरज आहे, आपल्याला सौर संयंत्रे, हरित इमारतींची गरज आहे. आपल्याकडे अनेक संधी आहेत.

राहुल गांधी : माझी संसदेच्या सुरक्षा रक्षकांशी मैत्री आहे, मी त्यांना विचारले तुम्ही काय करत आहात? ते म्हणाले की, त्यांनी स्टॉक खरेदी केले आहेत, त्यात ते पैसे कमवत असून त्यांना मजा येतेय. पगारी वर्गाला स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा धोका असतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकही शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. नवीन किरकोळ गुंतवणूकदार पैसे ओतत आहेत, तुम्हाला काय वाटते?

रघुराम राजन: त्यांना यातला धोका समजत नाही. त्यांच्याकडे पैसे कमी आहेत, परतावा चांगला आहे म्हणून ते इथेही गुंतवणूक करत आहेत. चांगल्या रिटर्न्सचे कारण काय ते त्यांना दिसत नाही. क्रिप्टो अमेरिकेत घडले, त्याचे परतावा आश्चर्यकारक होते. बिटकॉइन दोन ते तीन डॉलरवरून 67 हजार डॉलरवर गेले, नंतर खाली आले. बहुतेक गरीब लोक जेव्हा किंमती उच्च पातळीवर असतात तेव्हा खरेदी करतात, श्रीमंत लोक त्या वेळी विकतात.

राहुल गांधी : माहितीचा नसल्याचा प्रश्न गरीब लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे. माहिती दिली जात नाही की मिळात नाही?

रघुराम राजन : ग्राहकाचे हक्क असावेत असे आपण म्हणतो. ग्राहकाला संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे. ग्राहक कायदा अधिक मजबूत केला पाहिजे.

राहुल गांधी : तुम्ही हे सर्व इन्जॉय करत आहात का?

रघुराम राजन: अगदी, करतोय. तुम्ही जातीय सलोखा आणि शांततेसाठी पदयात्रेला जात आहात, देशाला त्याची गरज आहे. भारताला संघटित व्हायला हवे.

राहुल गांधी : शांतता आणि बंधुता फायदेशीर आहे का?

रघुराम राजन : दोन भावांमधील भांडणात घर टिकू शकत नाही, असे तुम्ही एका भाषणात सांगितले होते. अल्पसंख्याकांना दाबायचे असल्याचे अनेक जण सांगतात, हा देखील अंतर्गत संघर्ष आहे.

राहुल गांधी : आजच्या जगात सर्वत्र द्वेष पसरला आहे. युक्रेनपासून अनेक ठिकाणे पाहिल्यास भारत जगाला यामध्ये दिशा देऊ शकतो. भारत मोठी भूमिका बजावू शकतो.

रघुराम राजन : लोकशाही ही आपली ताकद आहे. भारत एक आदर्श ठेवू शकेल, त्यामुळे अनेक देश आपल्याकडे बघत आहेत.

बातम्या आणखी आहेत...