आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे भावविश्वहेल्मेट वाटण्यासाठी घरदार विकले:मित्राची आई म्हणाली होती - मुलाला हेल्मेट दिले असते, तर आज तो जिवंत असता

लेखक: राघवेंद्र कुमार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

9 वर्षांपूर्वीच्या एका रस्ते अपघातात मित्राचा मृत्यू झाला. तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक होता. त्याची आई वारंवार म्हणत होती, ‘मुलाला सर्वकाही दिले, पण हेल्मेट देता आले नाही. त्याने हेल्मेट घातले असते तर आज तो जिवंत असता.’

त्याच दिवशी मी आता कोणत्याही आईची कुस सुनी राहू न देण्याचा निश्चय केला. तेव्हापासून मी रस्त्यांवर फिरून हेल्मेट वाटणे सुरू केले. हेच माझ्या जीवनाचे मिशन झाले. यासाठी माझे घरही विकले. पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली.

मी राघवेंद्र कुमार. लोक मला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखतात. 28 एप्रिल 2014 ची गोष्ट आहे. मी कंपनीच्या कामानिमित्त कोलकात्याला गेलो होतो. रूममेट कृष्णाने फोन केला व विचारले - तुम्ही परत कधी येणार. मला एका नातेवाईकाकडे जायचे आहे. मी म्हटले उद्यापर्यंत येईन. तू निवांत नातलगाकडे जा.

दुसऱ्या दिवशी रात्री एका मित्राचा फोन आला की कृष्णाचा अपघात झाला. तो रुग्णालयात आहे. मी विमान पकडले व कोलकात्याहून थेट नोएडा गाठले. कृष्णाच्या डोक्याला खोलवर जखम झाली होती. पण तो बोलत होता.

सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती बिघडत गेली. काही वेळात तो कोमात गेला. त्याला व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले.

तिथे मला समजले की, कृष्णा दुचाकीने यमुना एक्सप्रेस वेवरून जात होता. रस्त्यात एका टँकरने त्याला पाठीमागून ठोकर मारली. त्यात तो जबर जखमी झाला. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो मदतीसाठी हात दाखवत होता. पण कुणीही त्याला रुग्णालयात नेले नाही. सायंकाळी एका कार चालकाने त्याला रुग्णालयात नेले.

कृष्णा अनेक दिवसांपर्यंत शुद्धीत आला नव्हता. उपचाराचा खर्चही वाढला. त्यानंतर आम्ही मित्रांनी पैसे गोळा केले. काही लोकांना मागितले. 20 लाख रुपये त्याच्या उपचारावर खर्च केले. 7 दिवसांपर्यंत तो व्हेंटिलेटवर राहिला. 8 व्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या अंत्यसंस्काराला सर्वच लोक उपस्थित राहिले. माझी हिंमत झाली नाही. तो जळताना पाहण्याचे धाडस माझ्यात नव्हते. 3 महिन्यांपर्यंत मी तो राहत असलेल्या खोलीत गेलो नाही. माझी हिंमतच होत नव्हती.

तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाच्या 20 वर्षांनंतर जन्मला होता. त्याच्या आई-वडिलांची स्थिती पाहून मला फार वेदना होत होत्या.

कृष्णाच्या मृत्यूचा मला जबर धक्का बसला. तो केवळ माझा रूममेट नव्हता, भावासारखा होता. मी बिहारच्या कैमूरचा आहे. तो मधुबनीचा होता. यामुळे दोघांत शानदार ट्यूनिंग होते. तो मला दादा म्हणून हाक मारत होता.

तेव्हा मी लॉ व तो मॅकेनिकल इंजीनिअरिंग करत होता. क्लानंतर मी पार्ट टाईम जॉबही करत होतो. रात्री माझ्यासाठी तोच जेवण बनवत होता. सकाळी माझे कपडेही प्रेस करत होता. छोट्या भावासारखा तो माझी सर्व काळजी घेत होता.

त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी हिंमत करून मी त्याच्या आईला फोन लावला. माझा आवाज ऐकताच त्या रडू लागल्या. त्या खूपवेळ रडल्या. त्या म्हणाल्या - तू तर शेवटच्या वेळीही आला नाहीस. ती वारंवार तक्रार करत होती. त्यावर मी का येऊ शकलो नाही, हे मी त्यांना सांगितले. मी कृष्णाला जळताना पाहू शकत नव्हतो असे मी म्हणालो.

त्यानंतर मी कृष्णाच्या गावी जाऊन त्याच्या आई-वडिलांना भेटण्याचा निर्णय घेतला. एका मित्रासोबत मी कारने नोएडातून मधुबनीला गेलो. घरी जाताच कृष्णाची आईने मला जवळ घेऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती एवढी रडली की मी सांगू शकत नाही.

कृष्णाचे घर ओसाड झाले होते. पूजा घरातील देव इतरत्र पडले होते. त्यांच्यावर धूळ जमली होती. अंगणातील आंब्याचे झाडही मोडून पडले होते. त्याच्या आईने सांगितले की, कृष्णाला आंबे खूप आवडत होते. तोच राहिला नाही, तर हे झाड काय कामाचे. ते पाहून त्रास होत होता. त्यामुळे आम्ही ते तोडले.

कृष्णाची आई वारंवार म्हणत होती की, मुलाला दुचाकी दिली, पण हेल्मेट दिले नाही. हेल्मेट दिले असते तर कदाचित आज तो जिवंत असता. त्यांचे बोलणे मला आतून पिळवटून टाकत होते. त्याच दिवशी मी कोणत्याही आईला आपले मूल गमवावू लागू नये म्हणून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

हे छायाचित्र माझा रूममेट कृष्णाचे आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये त्याचा फोटो लावला आहे.
हे छायाचित्र माझा रूममेट कृष्णाचे आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये त्याचा फोटो लावला आहे.

4 दिवस कृष्णाच्या घरी राहिलो. त्याच्या आईने माझ्यावर आपल्या मुलासारखे प्रेम केले. त्यांनी हाताने मला जेवण चारले. मी नोएडाला परत जाऊ नये असे त्यांना वाटत होते. पण मी तिथे आणखी किती दिवस राहू शकलो असतो?

नोएडात परतल्यानंतरही कृष्णाच्या आठवणींनी माझा पिच्छा सोडला नाही. कृष्णाने दादा म्हणून हाक मारणे, त्याच्या आईचे अश्रू, त्याच्या वडिलांचे रडणे. सर्वकाही माझ्या डोळ्यापुढे नाचत होते.

मी रस्त्याने कुठेतरी जायचो तेव्हा मला बरेच लोक हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसायचे. त्यांना पाहून मला कृष्णाची व त्याच्या आईच्या हेल्मेटची गोष्ट आठवायची. लोक स्वतःच्या जीवाशी का खेळत आहेत, स्वतःला मरणाच्या खाईत का ढकलत आहेत, असे मला वाटायचे. अखेरीस हे कसे थांबवता येईल?

अनेकदा टीव्ही व वर्तमानपत्रांत रस्ते अपघातांत जीव गमावणाऱ्यांच्या बातम्या यायच्या. त्यामुळे मी लोकांना हेल्मेट वाटण्याचा निश्चय केला. तेव्हा मला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती. ट्रेडिंगही करत होतो. चांगले उत्पन्नही होते.

विना हेल्मेट दुचाकीस्वारांना मी हात दाखवून थांबवतो व हेल्मेट घालतो.
विना हेल्मेट दुचाकीस्वारांना मी हात दाखवून थांबवतो व हेल्मेट घालतो.

दुसऱ्या दिवशी हेल्मेट घेण्यासाठी दुकानात गेलो. मला 1 लाख 46 हजार रुपयांचे हेल्मेट हवेत, असे दुकानदाराला सांगितले. दुकानदाराला धक्काच बसला. मला एवढ्या हेल्मेटची गरज का आहे, हे त्याला समजत नव्हते.

सुरुवातीला त्याला थट्टा वाटली. पण मी पैसे काढल्यावर तो म्हणाला -तुला माझे दुकान रिकामे करायचे आहे की, स्वतःचे दुकान उघडायचे आहे. मी सांगितले की मला लोकांना हेल्मेट वाटायचेत. त्यानंतरही त्याचा विश्वास बसत नव्हता.

अखेर मी हेल्मेट घालून पाटण्याला पोहोचलो. तिथे चौकाचौकात थांबून लोकांना हेल्मेट वाटू लागलो. त्यांना हात जोडून दादा हेल्मेट घाला असे सांगू लागलो. लोक येत होते. ते आपल्या मित्रांनाही येथे हेल्मेट वाटले जात असल्याचे सांगत होते. हळूहळू गर्दी वाढू लागली.

हेल्मेट वाटप हे माझे मिशन झाले. देशातील विविध शहरांमध्ये हेल्मेट वाटप सुरू केले. उद्यानात जाऊन तरुणांना उद्या मित्रांना घेऊन येऊन हेल्मेट घेऊन जा असे सांगू लागलो.

मी शालेय विद्यार्थी व पोलिसांच्या मदतीने नागरिकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रेरीत करतो.
मी शालेय विद्यार्थी व पोलिसांच्या मदतीने नागरिकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रेरीत करतो.

एकदा पाटण्यात हेल्मेट वाटत होतो. काही पोलिस माझ्याकडे हेल्मेट मागू लागले. मी दिले. पण काही दिवसांनी त्यांनी मला हेल्मेट वाटण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. अन्यथा गर्दीवर नियंत्रण कोण ठेवणार?

मी म्हटले ठीक आहे. भविष्यात परवानगी घेऊन वाटेन. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे परवानगी घ्यायला गेलो. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मी कोण आहे? मी हेल्मेट का वाटतो? मी कोणत्या संघटनेचा आहे? कुणातर्फे वाटप करतो? काही षडयंत्र आहे का? आदी...

मी हेल्मेट वाटप करायचो व बातम्या पोलिस हेल्मेट वाटप करत असल्याच्या यायच्या. या गोष्टींचा मला खूप त्रास व्हायचा.

कोविडमध्ये लोक मास्क व अन्नांचे लंगर लावत होते. मला वाटले घरी परतणाऱ्यांनाही हेल्मेटची गरज आहे. मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून 2 ट्रक हेल्मेट विकत घेतले. 1 ट्रक बनारसला व 1 ट्रक नोएडाला पाठवला. दोन्ही ठिकाणी वाटसरूंना हेल्मेट वाटले.

त्यानंतर मी लस घ्या व हेल्मेट न्या मोहीम सुरू केली. लस घेऊन येणाऱ्यांना मी हेल्मेट देत असे. त्यामुळे लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीही वाढली.

आता मी हेल्मेट बँक बनवत आहे. हेल्मेट घ्या व 8 दिवसांनी स्वच्छतेसाठी परत करा. मी मशाल यात्राही काढतो. 4 वर्षांच्या मुलालाही हेल्मेट देतो. याद्वारे तो आपल्या वडिलांना हेल्मेट घालण्यास प्रेरीत करेल असे मला वाटते.

आतापर्यंत मी देशभरात 56 हजार हेल्मेट वाटलेत.
आतापर्यंत मी देशभरात 56 हजार हेल्मेट वाटलेत.

उत्तराखंड सरकारसोबत मिळून काम करत आहे. बिहार सरकारने मला द हेल्मेट मॅन ऑफ इंडिया ही पदवी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेता सोनू सूद यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. सोशल मीडियावर मला हजारो लोक प्रोत्साहन देतात. माझ्या वाढदिवशी मला हेल्मेट पाठवतात. यामुळे मला ते नागरिकांना वाटण्यास मदत मिळते.

अनेक मुली मला राखी पाठवतात. मी त्यांना हेल्मेट पाठवतो. हेल्मेट खरेदी करता न येणाऱ्यांना मी त्यांच्या घरी कुरिअरने हेल्मेट पाठवतो.

मी आणखी एक मिशन सुरू केले आहे. मी रोज कुठे ना कुठे पार्क आणि चौकांमध्ये हेल्मेटचा स्टॉल लावतो. लोक येतात, जुनी पुस्तके देतात व बदल्यात हेल्मेट घेतात. ही पुस्तके गरजूंना दिली जातात. मी गरीब मुलांसाठी 1400 लायब्ररी तयार केल्या आहेत.

राघवेंद्र कुमार यांनी या सर्व गोष्टी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्यासोबत शेअर केल्या आहेत...

अशीच एक खालील बातमी वाचा...

संडे भावविश्व:माझ्या डोळ्यांपुढे मुलांनी जीव सोडला, आता आहेत त्यांच्याशी कुणी लग्नही करत नाही; लोक म्हणतात- दिव्यांग मुले होतील

माझ्या डोळ्यापुढे माझा जवान मुलगा व मुलगी तडफडत मरण पावले. सासुसासऱ्याचाही जीव गेला. आता एक जवान मुलगा व मुलगी आहे. पण त्यांना ना नोकरी आहे, ना त्यांच्याशी कुणी लग्न करत आहे. मी आजारी असते. नवऱ्याला दम लागतो. श्वास गुदमरतो. पण रोजी-रोटीसाठी घाम गाळावाच लागतो.

औषधोपचार एवढे महाग आहेत की आम्ही खरेदी करू शकत नाही. माहिती नाही आयुष्य कसे कटेल? येथे वाचा संपूर्ण बातमी...