आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे भावविश्ववडील इतके मारायचे की कित्येक दिवस उठता येत नव्हते:फाटके बूट घालून फुटबॉल खेळलो, 40 रुपयांसाठी नॅशनल प्लेअरचे स्वप्न भंगले

लेखक: राहुल चावरिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपडपट्टीत जन्मलो. झोपडपट्टीतच वाढलो. लहानपणापासून एकच स्वप्न होतं की, देशासाठी फुटबॉल खेळायचं. पण असं म्हणतात की आपण जगाशी लढू शकतो, पण आपल्या माणसांशी नाही.

घरातील लोकांना मी फुटबॉल खेळावे असे वाटत नव्हते. जेव्हाही मी खेळायला जायचो, घरी परतल्यावर मला खूप मारहाण व्हायची. असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा मला खेळण्यासाठी मार खावा लागला नाही, पण मीही जिद्दी होतो. मारहाण आणि घरच्यांच्या दमदाटीनंतरही मी खेळणे सोडले नाही.

एक दिवस राष्ट्रीय संघासाठी चाचणी होती. तिथे जाण्यासाठी 40 रुपये भाडे होते. आईकडे पैसे मागितले. आईने नकार दिला. रडलो, याचना केल्या, खाणे-पिणे बंद केले, पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

त्यामुळे नॅशनल खेळण्याचे माझे स्वप्न भंगले. शिकलेलोही नव्हतो आणि कुठूनही उत्पन्नाचा स्रोतही नव्हता. एकच फुटबॉलच्या भरवशावर होतो. ती संधीही हातातून निघून गेली. असं वाटलं माझं जगच संपलंय.

मी राहुल चावरिया आहे, मी चंदीगड-पंचकुला सीमेवर मनीमाजरा भागात राहतो. 2008 ची गोष्ट आहे. टीव्हीवर फुटबॉलची मॅच पाहत होतो. फुटबॉलपटू होण्याची उर्मी माझ्यातही जागृत होऊ लागली. मीही देशासाठी फुटबॉल खेळेन, असे वाटू लागले. त्यानंतर प्रत्येक क्षणी फुटबॉलचेच स्वप्न पाहू लागलो.

तेव्हा ८वीत होतो. पप्पा ऑटो चालवायचे. आई घर सांभाळायची. पाच भावंडांमध्ये मी सर्वात लहान होतो. घरी काही गायी होत्या. त्यांना चारापाणी करणे दूध काढण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. एके दिवशी शाळेतून आल्यानंतर पटकन आपले काम उरकून जवळच्या मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेलो. घरी परतल्यावर मला खूप मारहाण झाली.

वडील म्हणू लागले की तू खेळायला गेलास तर घरातली कामे कोण करणार. खेळून काय मिळते? खेळून पोट भरेल का? दुसऱ्या दिवशी मी पुन्हा खेळायला गेलो. परत आल्यावर पुन्हा मारहाण झाली. त्यानंतर हे रोजचेच झाले. रोज खेळणे आणि परतल्यावर मार खाणे.

तसेही, रोज मार खाल्ल्याने मला फारसे वाईट वाटत नव्हते. मला वाटायचे की उद्या मी चांगले खेळायला सुरुवात केली तर घरच्यांचे मन परिवर्तन होईल. ते मला साथ देतील, पण तसे झाले नाही.

एके दिवशी ग्राउंडवरून आल्यावर माझ्या वडिलांनी मला एवढी मारहाण केली की मी बरेच दिवस जखमी राहिलो. पण मीही जिद्दी होतो. वडिलांच्या माराने तर मरणार नाही, मात्र खेळणे बंद केले तर जगू शकणार नाही. त्यामुळे काहीही झाले तरी मी खेळणे थांबवणार नाही.

एकटे असताना खूप रडायचो. रात्रभर झोप येत नव्हती. बाहेरचे लोक माझ्या खेळाचे किती कौतुक करतात आणि माझे घरचे लोक मला मारतात ही माझ्या मनात एक वेदना होती. खेळणे एवढे मोठे पाप आहे का...

मला कोणीतरी सांगितले की इन्स्पेक्टर रमेश कुमार चंदीगड पोलिस अकादमीत फुटबॉल शिकवतात. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याकडे जाऊ लागलो. मी दररोज दोन तास सायकल चालवून त्यांच्याकडे फुटबॉल खेळण्यासाठी जायचो. हळूहळू त्यांनाही माझा खेळ आवडू लागला. ते माझ्या खेळाचे कौतुक करू लागले.

झोपडपट्टीतल्या मुलांसाठी खेळाडू होणे सोपे नाही. मैदान आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी त्यांच्यासोबत भेदभाव होतो. मी अशा मुलांना प्रशिक्षण देतो.
झोपडपट्टीतल्या मुलांसाठी खेळाडू होणे सोपे नाही. मैदान आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी त्यांच्यासोबत भेदभाव होतो. मी अशा मुलांना प्रशिक्षण देतो.

इन्स्पेक्टर रमेश कुमार यांना माझी परिस्थिती माहीत होती. अनेकदा म्हणायचे की काहीही झाले तरी खेळणे सोडू नको. खेळ हीच तुझी ओळख आहे. जर तु खेळणे बंद केले तर तुझे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यांनी मला फुटबॉल कसा खेळायचा हे देखील शिकवले आणि आमच्यासाठी स्पर्धाही आयोजित करायचे. खेळाडूंना दुधाची पाकिटे, केळी, जिलेबी द्यायचे.

आता मी दहावीत गेलो होतो. शाळेतील काही मुलांसोबत मी एक टीम बनवली. त्यानंतर आम्ही इतर शाळांसोबत सामने खेळू लागलो. आम्ही अनेक सामने जिंकले. आमच्या टीमचे चांगले नाव झाले. आता एक नवोदित फुटबॉलपटू म्हणून माझी ओळख होऊ लागली. आजूबाजूच्या लोकांना माझे नाव कळू लागले.

आता खेळण्याबरोबरच मी मुलांना फुटबॉल खेळायलाही शिकवू लागलो. काही वर्षांतच शाळेत 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघ तयार केले.

घरून कसलाही आधार नव्हता. उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते. कधी कधी असे व्हायचे की आमच्याकडे घालायला शूज नसायचे. मग कोणाकडून मागून किंवा वर्गणी गोळा करून बूट विकत घ्यायचो. त्यानंतर मी काही खासगी क्लबसाठी खेळू लागलो. यातून थोडाफार पैसा मिळायचा.

मला आठवतंय 2011 ची गोष्ट आहे. फुटबॉलच्या नॅशनल ट्रायल होत्या. माझ्या घरापासून ट्रायल साइटपर्यंतचे भाडे 40 रुपये होते. मी आईला भाड्यासाठी 40 रुपये मागितले असता तिने साफ नकार दिला. मी एका मित्राकडे गेलो आणि म्हणालो की मला 40 रुपये हवे आहेत. मी नंतर तुला परत करेन. मित्राने होकार दिला.

तो मातीच्या पिगी बँकेत पैसे साठवायचा. त्याने त्याची पिगी बँक फोडली. त्यातून 240 रुपये निघाले. त्याने मला 40 रुपयांऐवजी 50 रुपये दिले. आता माझी निवड होणार याचा मला खूप आनंद झाला. मला खेळायला पैसे मिळाले तर मी माझ्या मित्राकडून घेतलेले पैसे परत करीन, पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच होते.

मी जेव्हा चाचणीसाठी पोहोचलो तेव्हा खूप उशीर झाला होता. चाचण्या संपल्या होत्या. खेळाडूंची निवड झाली होती. जे खेळाडू माझे ज्युनियर होते. मी ज्यांना खेळायला शिकवले होते त्यांचीही निवड झाली. मला खूप त्रास झाला. मैदानात बसून अनेक तास रडलो. काय करावे समजत नव्हते.

बरं तिथून घरी परतलो. रोजच्या प्रमाणे सरावाला जायला लागलो. पुढे जाण्यासाठी माझ्याकडे कोणतेही कनेक्शन किंवा नेटवर्क नव्हते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंब माझ्यासोबत नव्हते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर किती पुढे गेलो असतो?

जेव्हा जेव्हा खुला सामना असायचा तेव्हा मला शेवटचा खेळाडू म्हणून ठेवले जायचे. मी सर्वांपेक्षा चांगला खेळायचो तरिही. पण झोपडपट्टी भागातील मुलांच्या कलागुणांना लोक कुठे जागा देतात. आतून तुटलो होतो.

वरून अनेकांना भेटल्यावर ते विचारायचे की तू कधीपासून फुटबॉल खेळत आहेस, तुला कोणतेही मेडल मिळाले नाही. यामुळे मला अधिक त्रास व्हायचा.

लोकांचे टोमणे ऐकून कंटाळा आला होता. यानंतर मी तीन वर्षे स्वत:ला सर्वांपासून वेगळे केले. स्वतःला त्याच्या कुटुंबापासून आणि घरापासून दूर केले. दिवस-रात्र मैदानात खेळायचो. 2015 मध्ये फुटबॉलच्या स्टेट चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण त्यानंतर आमचा संघ पराभूत झाला.

ही मुले माझी संपत्ती आहेत. मला नेहमी वाटते की मी तर खेळाडू होऊ शकलो नाही. पण ही मुले नक्कीच पुढे जातील.
ही मुले माझी संपत्ती आहेत. मला नेहमी वाटते की मी तर खेळाडू होऊ शकलो नाही. पण ही मुले नक्कीच पुढे जातील.

एके दिवशी मला जाणीव झाली की माझ्यात खूप स्टॅमिना आहे. मी वेगाने धावतो. तर मग अ‍ॅथलीटच बनावे. यामुळे मला काही पदकेही मिळतील. यानंतर फुटबॉलच्या सरावासोबत मी धावूही लागलो. हळूहळू मी यातही पारंगत झालो.

2014 मध्ये राज्यस्तरावर 400 मीटर आणि 1500 मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली.

अशातच मी बारावी पूर्ण केली. पुढे शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण घरचा आधार नव्हता. मलाही वाटले की आता जेवढे शिकाये होते तेवढे शिकले. मी खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, पण हा प्रवास तितका सोपा नव्हता.

पुढे जाण्यासाठी माझ्याकडे कोणतेही कनेक्शन किंवा नेटवर्क नव्हते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंब माझ्यासोबत नव्हते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो किती पुढे गेलो असतो?

केवळ प्रतिभेच्या जोरावर खेळाडू घडवता येत नाही यावर माझा विश्वास आहे. किमान फुटबॉल खेळाडू तरी नाही.

दरम्यान, मला उत्तराखंड आणि पंजाबमधील मुलांना फुटबॉल शिकवण्याची संधी मिळाली. पंजाबमध्ये जॉली नावाचा एक खेळाडू खेळायला यायचा. खूप प्रतिभावान होता. काही दिवसांनी तो इंग्लंडला गेला. त्याच्या कारकिर्दीबद्दल मला आनंद आहे, पण एक प्रतिभावान खेळाडू गेल्याचे दु:खही आहे.

या मुलांकडे बघा. यांच्याकडे खेळण्यासाठी भलेही संसाधने नसतील. यांना समाज आणि कुटुंबाचा पाठिंबा नसेल. पण एक दिवस हे नाव कमावणार.
या मुलांकडे बघा. यांच्याकडे खेळण्यासाठी भलेही संसाधने नसतील. यांना समाज आणि कुटुंबाचा पाठिंबा नसेल. पण एक दिवस हे नाव कमावणार.

वर्षभरानंतर पंजाबमधून घरी परतलो. इथे मला जाणवलं की माझ्यासारखी अनेक मुलं आहेत जी प्रतिभावान आहेत पण त्यांना संधी मिळत नाही. मला वाटले की मी राष्ट्रीय खेळाडू होऊ शकलो नाही तरी निदान या मुलांसाठी काहीतरी करू शकेन.

मला इतकं तर खेळता येतं की मी कोणाला तरी शिकवू शकेन. यानंतर मी माझी स्वतःची अकादमी काढली. त्याला द जॉली फुटबॉल अकादमी असे नाव दिले. यामुळे जॉली कायम लक्षात राहील.

मात्र, काही काळानंतर मला पैशांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. खेळायला येणाऱ्या मुलांकडे शूज नव्हते.

कधी कधी फुटबॉलचाही तुटवडा यायचा. यानंतर मी काही बड्या लोकांना संपर्क साधला. त्यांच्या मुलांना वैयक्तिक फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यातून मला काही पैसे मिळू लागले. मग मी मुलांना उपकरणे द्यायला सुरुवात केली.

येथे मुलांना फुटबॉल खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर इतर शहरातील मुलेही खेळायला येऊ लागली. इतकेच नाही तर माझ्यासोबत अनेक फुटबॉलपटूही सामील झाले, ज्यांनी मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे आमचा ताफा वाढतच गेला. आता आमच्या अकादमीत 80 मुले आहेत.

मी झोपडपट्टी भागातील आहे त्यामुळे येथील मुलांचे जीवन कसे आहे हे मला माहीत आहे. त्यांच्याकडे अभ्यासासाठी पुरेसे पैसे नाहीत. खेळण्याऐवजी पालक त्यांना कामावर पाठवतात. याचा परिणाम असा होतो की मूल चुकीच्या कामात अडकते. नशा करायला लागते.

म्हणूनच मी खेळाचा आग्रह धरला. लहान मूले काही कारणाने खेळण्यात चॅम्पियन झाले नाही तरी निदान ती चुकीच्या फंदात अडकणार नाही याची खात्री असते. नशेचा बळी होणार नाही. कारण त्यांना खेळण्याखेरीज इतर कशाचाही विचार करायला वेळ मिळणार नाही.

आज माझ्या अकादमीत जवळपास 60 मुले आहेत. आत्तापर्यंत मी 500 हून अधिक मुलांना प्रशिक्षण दिले आहे. यातील अनेक मुले राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.

राहुल चावरियांनी दिव्य मराठी नेटवर्क रिपोर्टर मनीषा भल्लांसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत...

बातम्या आणखी आहेत...