आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरीराहुल गांधींच्या 'भारत यात्रेने' सत्ता येणार का?:रथयात्रेमुळेच भाजप 85 वरुन 120 जागांवर पोहोचला होता

अनुराग आनंद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा सुरू होणार आहे. 12 राज्यांतून सुमारे 3,500 किमी अंतर पार करणाऱ्या या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत.

भारतीय राजकारणात एखाद्याने पदयात्रा किंवा रथयात्रा काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील राजकारणात अशा यात्रा म्हणजे जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा यशस्वी मंत्रच आहे.

1930 मध्ये महात्मा गांधींच्या दांडीयात्रेने जगाला पदयात्रांच्या राजकीय सामर्थ्याची जाणीव करून दिली. त्याच वेळी, 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेने, काँग्रेसनंतर भारतीय जनता पक्ष भारतातील दुसरी मोठी राजकीय शक्ती बनली. त्यांच्या खासदारांची संख्या 85 वरून 120 झाली. या दोन राजकीय घटना केवळ उदाहरण म्हणून दिल्या आहेत.

आजच्या मंडे मेगा स्टोरीमध्ये अशाच काही रंजक राजकीय प्रवासाची कहाणी जाणून घेऊया ज्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला.

इंग्रजांनी दांडी गाठण्यापूर्वीच मिठात संपूर्ण चिखल मिसळला होता

गांधीजी दांडीला येण्यापूर्वीच इंग्रजांनी समुद्रकिनाऱ्यावर साठलेले मीठ आणि वाळू मिसळून चिखल तयार केला होता. हे पाहून गांधीजींच्या चेहऱ्यावर किंचीतही आठी पडली नाही. कारण जिभूभाई केशवलजी नावाच्या माणसाने आधीच थोडे मीठ लपवून ठेवले होते. त्यातूनच बापूंनी चिमूटभर मीठ उचलले आणि म्हणाले- 'याने मी ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला धक्का देत आहे.'

राजीवच्या रागाला मुद्दा बनवून सुरू झाली 'चैतन्य रथम यात्रा'

1982 मध्ये एके दिवशी राजीव गांधी हैदराबादला आले. मुख्यमंत्री टी. अंजय्याही त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. गर्दी पाहून राजीव गांधी चिडले आणि त्यांनी लोकांसमोरच मुख्यमंत्र्यांना चांगलेच सुनावले. हा मुद्दा रामारावांनी आंध्र प्रदेशच्या स्वाभिमानाशी जोडला आणि नवा पक्ष काढला तसेच राज्यभर यात्रा काढली.

1990 मध्ये रथयात्रेदरम्यान अडवाणींना अटक करण्यास डीसीचा नकार

मुख्यमंत्री लालू यादव यांनी धनबादचे उपायुक्त अफझल अमानुल्ला यांना 19 ऑक्टोबरला रथयात्रा बिहारमध्ये दाखल होताच अडवाणींना अटक करण्याचे आदेश दिले, परंतु धार्मिक मुद्दा बनण्याच्या भीतीने त्यांनी तसे करण्यास नकार दिला. नंतर 23 ऑक्टोबरला समस्तीपूर जिल्ह्याचे डीएम आर. के. सिंग यांनी अडवाणींना अटक केली, आता तेच आर.के. सिंह हे भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत.

आंध्र प्रदेशातील पदयात्रेमुळे रेड्डींना मजुरांच्या हृदयात मिळाले स्थान

यात्रेदरम्यान, एके दिवशी राजशेखर रेड्डी यांना सरकारी कामावर असलेल्या मजुरांनी सांगितले की, त्यांना कामाच्या बदल्यात फक्त अन्न मिळत आहे. केवळ तीन किलो तांदूळासाठी काम करणाऱ्या मुलांना पाहून ते भावूक झाले. त्यांनी ठेकेदाराला खडसावले आणि मुलांना काम न करू देण्यासत आणि मजूरांना किमान वेतन देण्यास सांगितले. या घटनेमुळे रेड्डी तेथील कामगारांच्या मनात घर करून गेले.

प्रजा संकल्प यात्रेमुळे जगनमोहन यांचीही पित्यासारखी देवदूताची प्रतिमा निर्माण केली

जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेलुगु देसम पक्ष आणि काँग्रेससोबत 10 वर्षे राजकीय संघर्ष केला, तुरुंगातही गेले. 2019 मध्ये त्यांनी वडिलांच्या पदयात्रेचा फॉर्म्युला वापरला. जनतेने वायएसआर रेड्डी यांना देवदूत मानले, या यात्रेमुळे पुन्हा एकदा जगनमोहनची यांची तीच प्रतिमा तयार झाली.

तुम्ही आतापर्यंत भारतीय राजकारणातील 5 यात्रेच्या कथा वाचल्या आहेत. आता जाणून घ्या काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेबद्दल...

ग्राफिक्स: हर्ष साहनी, सहयोग: अरशद मिशाल

बातम्या आणखी आहेत...